
अनेक शतकापासून सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित मानली जात आहे. गेल्या काही दिवसात सोन्याचे दर इतक वाढत चालले आहेत. सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर सोने जात आहे. साल २०२३-२४ पर्यंत ७० हजार रुपयांच्या खाली असणारे सोने २०२५ मध्ये सवा लाखाच्या पार जाईल याची कोणीही कल्पना केलेली नव्हती. या वाढत्या दरामागे लोकांद्वारे सोन्याची खरेदी नसून मोठ – मोठ्या देशांद्वारे सोन्याचा साठा वाढवणे कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या २ ते ३ वर्षात अनेक देशांच्या रिझर्व्ह बँकेने सोने खरेदीचा सपाटा लावला आहे. सर्वाधिक सोने खरेदीत चीनचे नाव टॉपवर आहे. चीन गेल्या काही वर्षांपासून लागोपाठ सोने खरेदी करत आहे.परंतू का ? जाणून घेऊयात…
चीनच्या सेंट्र्ल बँक म्हणजे पीपल्स बँक ऑफ चायनाने २०२५ मध्येही सोने खरेदी सुरुच ठेवली आहे. जानेवारी ते सप्टेंबर २०२५ दरम्यान चीनने ३९.२ टन सोने खरेदी केले आहे. ८ ऑक्टोबर २०२५ पर्यंत चीनच्या जवळ एकूण २,२९८.५ टन सोने जमा झाले आहे. चीनने गेल्या ११ महिन्यात ब्रेक न घेता सोने खरेदी सुरु ठेवली आहे. दर महिन्यास सरासरी २ ते ५ टन सोने खरेदी चीन करत आहे. सप्टेंबर महिन्यात यात थोडी कमतरता आली, या सप्टेंबरात चीनने केवळ ०.४ टन सोने खरेदी केले होते.
चीन इतके सोने खरेदी का करत आहे. याचे पहिले कारण आहे अमेरिकन डॉलरवरील आपले अवलंबित्व चीन कमी करु इच्छीत आहे. चीनच्या जवळ मोठ्या प्रमाणात डॉलरचा साठा आहे. परंतू चीन त्याचे भविष्य डॉलरवर विसंबून देऊ इच्छीत नाही. डॉलर केवळ अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर टीकून आहे.परंतू सोने कोणा देशाच्या चलनावर अवलंबून नाही. त्यामुळे त्याला सुरक्षित पर्याय मानले जात आहे.
दुसरे कारण आहे जगात वाढत चाललेला तणाव आणि अनिश्चतेचे वातावरण म्हटले जात आहे. रशिया- युक्रेन युद्धानंतर चीन सारखे देश त्यांचा पैसा अशा ठिकाणी गुंतवत आहेत, ज्यास कोणी सहजासहजी खेचू शकत नाही. रशियासोबत जे झाले त्याने अनेक देशांना सर्तक केले आहे.
तिसरे मोठे कारण म्हणजे वाढती महागाई आहे. २०२५ मध्ये सोन्याची किंमत सुमारे ३,९०० डॉलर प्रति औंसापर्यंत पोहचली होती. जेव्हा वस्तूंचे दर वाढतात, तेव्हा सोने त्याची किंमत कायम ठेवते आणि पैशांची ताकदीला ती कोसळण्यापासून वाचवते. त्यामुळेच चीन सोन्याला मजबूत आर्थिक कवच म्हणून पाहात आहे. तसेच चीनला त्याच्या स्वत:च्या चलनाची ताकद जगात वाढावी असे वाटत आहे. सोन्याचा मोठा साठा त्याची ही इच्छा पूर्ण करण्यास मदत करु शकतो.
सोन्याची खरेदी करणारा चीन एकटाच नाही. भारत, रशिया आणि तुर्की यांसारखे अनेक देशातील सेंट्रल बँका देखील अलिकडच्या काळात लागोपाठ सोने जमा करत आहेत. २०२२ पासून दरवर्षी जगातील सेंट्रल बँका १,००० टनाहून अधिक सोने खरेदी करत आहेत. याचे कारण देखील तेच आहे की डॉलर पासून अंतर राखणे, जागतिक तणाव, महागाई आणि दीर्घकालिन रणनिती. देशांना आता कळेल आहे की सोने केवळ दागिन्यांसाठी नव्हेतर आर्थिक सुरक्षेसाठी देखील महत्वाचे आहे.
भारताचा विचार करता आरबीआयच्या जवळ देखील मोठा सोन्यचा साठा आहे. ८ ऑक्टोबर २०२५ पर्यंत भारताकडे ८८० टन सोने जमा आहे. यात सुमारे ५१२ टन सोने देशातील नागपूर आणि मुंबईच्या आरबीआयच्या तिजोरीत ठेवले आहे. उर्वरित सोने विदेशी बँकांकडे ठेवले आहे. उदा. बँक ऑफ इंग्लंड आणि बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स, भारताचा एकूण विदेशी चलनसाठ्यात सोन्याचा वाटा ११.७ टक्के इतका आहे.