भारत रशियाकडून तेल आयात करणार की नाही? पंतप्रधान मोदी देवाणघेवाणीबाबत म्हणाले…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांच्यात नुकतीच चर्चा झाली. या चर्चेत नेमकं काय झालं हे अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्लादीमीर पुतीन यांनी फोनवरून चर्चा केली आहे.

भारत रशियाकडून तेल आयात करणार की नाही? पंतप्रधान मोदी देवाणघेवाणीबाबत म्हणाले...
Image Credit source: TV9 Network/File
| Updated on: Aug 18, 2025 | 7:00 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांच्यात अलास्कामध्ये चर्चा झाली. त्यानंतर या दोन्ही देशातील चर्चेचा भारतावर काय परिणाम होणार? याकडे लक्ष लागून होते. कारण या भेटीपूर्वी अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला होता. तसेच रशियाकडून तेल आयात करू नका असा दबावही टाकला होता. टॅरिफमुळे भारताच्या निर्यातीवर परिणाम होणार यात काही शंका नाही. कारण भारतीय वस्तू अमेरिकेत महाग मिळतील. त्यामुळे तिथल्या लोकांना कल देशी वस्तूंकडे झुकेल. त्याचा थेट परिणाम भारताच्या निर्यात अर्थव्यवस्थेवर होणार आहे. अशा पार्श्वभूमीवर ट्रम्प आणि पुतीन यांची भेट झाली. त्यामुळे या भेटीकडे लक्ष लागून होतं. असं असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा झाली. याबाबत पंतप्रधान मोदी यंनी स्वत: एक्स हँडलवर माहिती दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की, ‘माझ्या मित्राचे, राष्ट्रपती पुतिन यांचे त्यांच्या फोन कॉलबद्दल आणि अलास्का येथे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी झालेल्या अलिकडच्या भेटीबद्दल माहिती शेअर केल्याबद्दल आभार. भारताने युक्रेन वादावर शांततापूर्ण तोडगा काढण्याची मागणी सातत्याने केली आहे आणि या संदर्भातील सर्व प्रयत्नांना पाठिंबा दिला आहे. येत्या काळात आमच्या सततच्या देवाणघेवाणीची मी अपेक्षा करतो.’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या ट्वीटमुळे भारत आणि रशिया यांच्यातील तेल आयात करार सुरुच राहील हे स्पष्ट दिसत आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये जेव्हा रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष सुरू झाला तेव्हा भारताच्या तेल आयातीत रशियाचा वाटा 2 टक्क्यांपेक्षा कमी होता. पाश्चात्य देशांनी रशियाकडून तेल खरेदी करणे बंद केल्यानंतर रशियाने भारताला मोठी सवलत दिली. रशिया भारताच्या तेलाच्या गरजांपैकी 35 टक्के ते टक्के गरजा पूर्ण करतो. दुसरीकडे, अमेरिकेच्या आणि खासकरून डोनाल्ड ट्रम्पच्या रोषाला सामोरं जावं लागू शकतं. सुरुवातीला अमेरिकेने भारतावर 25 टक्के टॅरिफ लादला होता. त्यानंतर हा टॅरिफ आणखी 25 टक्क्यांनी वाढवून 50 टक्क्यांवर नेला.