NASA vs Boeing : प्रतिष्ठेचा विषय, सुनीता विलियम्स नसल्या तरी बोईंग आज स्वत:ला सिद्ध करणार का?

NASA vs Boeing : बोइंग ही जगातील विमान निर्मिती क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. बोइंगकडे प्रवासी आणि फायटर विमान निर्मितीचा मोठा अनुभव आहे. नासाने बोइंगवर अविश्वास दाखवलाय. आज त्याच बोइंगला स्वत:ला सिद्ध करुन दाखवायच आहे. कारण भविष्यातील मोठा बिझनेस त्यावर अवलंबून आहे.

NASA vs Boeing : प्रतिष्ठेचा विषय, सुनीता विलियम्स नसल्या तरी बोईंग आज स्वत:ला सिद्ध करणार का?
sunita williams
Follow us
| Updated on: Sep 06, 2024 | 11:44 AM

अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर स्टारलायनर यानाने आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर गेले होते. पण आता ते स्पेसएक्सच्या क्रू 9 मिशनने पृथ्वीवर परतणार आहेत. स्टारलायनरमध्ये बिघाड झाल्यामुळे नासा कुठलाही धोका पत्करायला तयार नाहीय. त्यामुळे स्टारलायनर आता सुनीता आणि बुच यांच्याशिवाय रिकामीच पृथ्वीवर येणार आहे. स्टारलायनरला ISS वरुन अनडॉक करण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. शुक्रवारी संध्याकाळी ते पृथ्वीच्या दिशेने उड्डाण करेल. स्टारलायनरला 13 जूनला पृथ्वीवर परतायच होतं. पण हेलियम लीकेज आणि थ्रस्टरमधील बिघाडामुळे हे शक्य झालं नाही. त्यामुळे सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर हे अवकाशात अडकून पडले.

बोइंगच हे ऑटोमेटेड कॅप्सूल न्यू मेक्सिकोच्या व्हाइट सँड मिसाइल रेंजवर उतरणार आहे. सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर ISS च्या ऑर्बिटिंग लॅबमध्ये राहतील. पुढच्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलने पृथ्वीवर परत येतील. स्टारलायनरच्या परतीच्या प्रवासाबद्दल नासाचे कमर्शियल क्रू प्रोग्रॅम मॅनेजर स्टिव स्टिच यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मोठा प्रवास करावा लागला आहे. स्टारलायनरच्या परतीबद्दल आम्ही खूप उत्सुक आहोत” असं ते म्हणाले. गुरुवारी सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांनी स्टारलायनर आणि स्पेस स्टेशनच्यामधला दरवाजा बंद करतील.

बोइंगच किती मोठं नुकसान?

बोइंग या अमेरिकेतील खासगी कंपनीने स्टारलायनर यान बनवलं. मिशनच्या सुरुवातीपासून हे यान तांत्रिक समस्यांचा सामना करत आहे. यापूर्वी 2019 साली स्टारलायनरची पहिली टेस्ट फ्लाइट पूर्णपणे अपयशी ठरली होती. बोइंगच हे कॅप्सूल सॉफ्टवेयर एररमुळे स्पेस स्टेशनवर पोहोचू शकलं नव्हतं. 3 वर्षानंतर पुन्हा एकदा हे मिशन करण्यात आलं. त्यात आणखी समस्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे बोइंगला 1 अब्ज डॉलरच नुकसान झालं.

प्रतिष्ठेचा विषय

बोइंगने सतत थ्रस्टरची टेस्टिंग केली. डाटाच विश्लेषण केलं. स्टारलायनर सुरक्षितपणे दोन्ही अंतराळवीरांना घेऊन येईल असा विश्वास व्यक्त केला. पण NASA ने विश्वास दाखवला नाही. NASA ने स्पेसएक्सच्या क्रू 9 मिशनद्वारे दोघांना पृथ्वीवर आणण्याचा निर्णय घेतला. बोइंग ही जगातील एक अग्रगण्य विमान निर्मिती कंपनी आहे. प्रवासी आणि फायटर दोन्ही विमान बनवण्याचा बोइंगकडे मोठा अनुभव आहे. स्टारलायनरला सुरक्षित पृथ्वीवर आणण्याच बोइंगसमोर आव्हान आहे. कंपनीसाठी हा प्रतिष्ठेचा विषय आहे. त्यामुळे स्टारलायनर रिकामी येणार असलं, तरी त्यात भविष्यातील मोठा बिझनेस आहे.

'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ...
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ....
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ.
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख.
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?.
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.