AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! खासदाराच्या घरात घुसून अंदाधुंद गोळीबार, महिला खासदारासह पतीचा मृत्यू

अमेरिकेमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, मिनेसोटामधील दोन खासदारांवर घरात घुसून हल्ला करण्यात आला आहे. हल्लेखोरांनी जॉन हॉफमन आणि मेलिसा हॉर्टमन यांच्यावर त्यांच्या घरात घुसून हल्ला केला

मोठी बातमी! खासदाराच्या घरात घुसून अंदाधुंद गोळीबार, महिला खासदारासह पतीचा मृत्यू
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 14, 2025 | 10:05 PM
Share

अमेरिकेमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, मिनेसोटामधील दोन खासदारांवर घरात घुसून हल्ला करण्यात आला आहे. हल्लेखोरांनी जॉन हॉफमन आणि मेलिसा हॉर्टमन यांच्यावर त्यांच्या घरात घुसून हल्ला केला, हल्लेखोरानं केलेल्या गोळीबारात मेलिसा हॉर्टमन आणि त्यांच्या पतीचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा खासदार जखमी झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हल्लेखोर हा पोलिसांच्या वेशात घरात घुसला त्यानंतर त्याने हल्ला केला. हा हल्ला पूर्वनियोजित होता असा संशय येथील पोलिस अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे. मात्र या हल्ल्यामागचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये.या घटनेनं खळबळ उडाली असून हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

या हल्ल्यामध्ये मेलिसा हॉर्टमन आणि त्यांच्या पतीचा मृत्यू झाला आहे, तर दुसरे खासदार जॉन हॉफमन हे गंभीर जखमी झाले आहेत, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या हल्ल्यानंतर मिनेसोटाच्या गव्हर्नर टिम वॉल्ज यांनी तातडीने पत्रकार परिषद बोलावली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी या हल्ल्याचा निषेध करताना म्हटलं की, केवळ मिनेसोटोमध्येच नाही तर संपूर्ण देशात सुरू असेल्या अशा राजकीय हल्ल्यांविरोधात आता आपल्याला खंबीरपणे उभे राहण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ज्या लोकांनी अशा प्रकारचा भ्याड हल्ला केला आहे, त्यांना कडक शिक्षा केली जाईल असा इशारा देखील या हल्ल्यानंतर वॉल्ज यांनी दिला आहे.

दरम्यान या हल्ल्यानंतर संपूर्ण राज्य हादरलं आहे. पोलिसांनी हल्लेखोराचा शोध सुरू केला आहे. नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये, घरातच राहावं असं आवाहन पोलीसांकडून करण्यात आलं आहे. हल्लेखोर पोलिसांच्या वेशात आला, खासदारांच्या घरात घुसला आणि त्याने हल्ला केला, हल्ल्यानंतर तो फरार झाला आहे. त्याने दोन खासदारांवर हल्ला केला आहे. यातील एका महिला खासदार आणि त्यांच्या पतीचा या घटनेत मृत्यू झाला आहे, तर दुसरे खासदार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान पोलिसांकडून या हल्लेखोराचा शोध सुरू आहे.

दरम्यान हल्लेखोराचा शोध सुरू असतानाच पोलिसांना एका गाडीमध्ये काही संशयित कागदपत्रं सापडली आहेत, ज्यामध्ये ज्या खासदारांवर हल्ले होणार आहेत. अशा खासदारांच्या नावाची लिस्ट आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता खासदारांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली असून, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....