भारतीयांनो परत जा… या देशात भारतीय महिलेवर अत्याचार, जगात खळबळ, हल्लेखोरांनी थेट…
गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय लोक नोकरी आणि व्यवसायासाठी विदेशात जाताना दिसत आहेत. विशेष म्हणजे विदेशात देखील चांगल्या मोठ्या पदावर भारतीय लोक बघायला मिळतात. मात्र, काही महिन्यांपासून विदेशात भारतीय लोकांवरील हल्ले वाढली आहेत.

विदेशात भारतीय लोकांवरील हल्ले वाढली आहेत. अमेरिकेत कुटुंबियांसमोर भारतीय नागरिकाची हत्या करण्यात आली. आता अमेरिकेनंतर ब्रिटनमध्येही भारतीय लोक सुरक्षित नसल्याचे स्पष्ट होताना दिसतंय. काही दिवसांपूर्वीच ब्रिटनमध्ये एका शीख महिलेवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असतानाच अजून एक धक्कादायक प्रकार पुढे आला. आता परत उत्तर इंग्लंडमध्ये भारतीय वंशाच्या महिलेवर अगोदर हल्ला करून शिव्या देण्यात आल्या आणि त्यानंतर बलात्कार केला. याबाबतची माहिती ब्रिटिश पोलिसांनी दिली. वेस्ट मिडलँड्स पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जारी केले असून त्यामध्ये आरोपी स्पष्टपणे दिसतोय. पोलिसांनी संबंधित व्यक्तीबद्दल अधिक माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन केले आहे. पोलिसांकडून त्या व्यक्तीचा शोध घेतला जातोय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी वॉल्सॉलच्या पार्क हॉल परिसरातून एका महिलेचा फोन आला. त्यानंतर घटनेची सर्व माहिती पोलिसांना मिळाली. वेस्ट मिडलँड्स पोलिसांनी संशयिताचे सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज जारी केले आहे आणि या संबंधित व्यक्तीबद्दल कोणतीही माहिती असल्यास पोलिसांना कळवावे, असे आवाहन नागरिकांना त्यांनी केले. या घटनेच्या तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने हा सर्वात भयंकर हल्ला असल्याचे म्हटले.
आरोपींना अटक करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत असून लवकरात लवकर त्याला अटक करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आम्ही आरोपीविरोधात पुरावे गोळा करत असून एक स्वतंत्र पथक तयार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्लेखोराची प्रोफाइल सध्या तयार केले जात आहे, जेणेकरून त्याला ताब्यात घेता येईल. मात्र, या घटनेने चांगलीच मोठी खळबळ उडाली आहे.
महिलेवर हल्ला करणारा व्यक्ती साधारणपणे 30 वर्षाचा असल्याचा अंदाज आहे. शीख फेडरेशन यूके आता आक्रमक भूमिक घेताना दिसत आहे. रिपोर्टनुसार, वॉल्सॉलमध्ये ज्या तरुणीवर हल्ला झाला ती एक पंजाबी महिला होती. हल्लेखोराने ती राहत असलेल्या घराचा दरवाजा तोडला असे दिसून येते. यापूर्वी ब्रिटेनमध्ये गेल्या महिन्यात वेस्ट मिडलँड्स पोलिसांच्या हद्दीत ओल्डबरीमध्ये एका शीख महिलेवर बलात्कार झाला होता. 9 सप्टेंबर 2025 रोजी ही घटना घडली होती, त्यानंतर आता पुन्हा एकदा असाच प्रकार पुढे आला.
