मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानं जगभरात खळबळ, आता तर थेट म्हणाले भारतानं…
मोठी बातमी समोर येत आहे, डोनाल्ड ट्रम्प यांनी आता पुन्हा एकदा भारताबद्दल मोठा दावा केला आहे, भारतच नाही तर चीनबद्दल देखील त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून अमेरिकेनं भारतावर टॅरीफ लावला आहे. भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो आणि रशिया तो पैसा युक्रेनविरोधातील युद्धामध्ये वापरत आहे, असा आरोप देखील ट्रम्प यांनी केला आहे. मात्र त्यानंतर आता ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताबद्दल बोलताना मोठा दावा केला आहे, ट्रम्प यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.
नेमकं काय म्हणाले ट्रम्प?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी भारताबाबत बोलताना मोठा दावा केला आहे, अमेरिकेनं रशियाच्या तेल कंपन्यांवर घातलेल्या प्रतिबंधानंतर भारतानं रशियाकडून सुरू असलेली तेल खरेदी पूर्णपणे थांबवल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. तसेच चीनने देखील रशियाकडून सुरू असलेली कच्च्या तेलाची आयात मोठ्या प्रमाणात कमी केली आहे. अमेरिकेनं रशियाच्या तेल कंपन्यांवर नव्यानं अनेक प्रतिबंध लागू केले आहेत, त्यानंतर लगेचच डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हा दावा करण्यात आला आहे.
पुढे बोलताना ट्रम्प यांनी म्हटलं की, रशिया आणि युक्रेन युद्ध थांबावं यासाठी आता आमचा रशियाच्या अर्थव्यवस्थेवर वित्तीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यासाठी आता आम्ही रशियन तेल आयात धोरणांबाबत अधिक आक्रमक भूमिका घेत आहोत. अमेरिकेकडून रशियाच्या रोसनेफ्ट आणि लुकॉइल या दोन तेल उत्पादक कंपन्यांवरील प्रतिबंध अधिक कडक करण्यात आले आहेत. रशियाचा अर्थ पुरवठा बंद झाल्यास रशिया आणि युक्रेन युद्ध थांबू शकतं असं ट्रम्प यांना वाटत आहे.
दरम्यान ही ट्रम्प यांची असा दावा करण्याची पहिलीच वेळ नाहीये, तर त्यांनी यापूर्वी देखील दोनदा भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी कमी केल्याचा दावा केला होता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला रशियाकडून तेल खरेदी कमी करण्याचं आश्वासन दिलं होतं असा दावा देखील काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांच्याकडून करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून नवा दावा करण्यात आला आहे.
