जगातील पहिली खळबळजनक घटना, रोबोटने उचलले टोकाचे पाऊल, कामाचा होता दबाव

एका आत्महत्येच्या घटनेमुळे जगात खळबळ उडली आहे. ही आत्महत्या माणसाने नाही तर रोबोटने केली आहे. पायऱ्यांवरून खाली झोकून देत या रोबोटने आत्महत्या केली आहे. ही जगातील पहिलीच घटना आहे.

जगातील पहिली खळबळजनक घटना, रोबोटने उचलले टोकाचे पाऊल, कामाचा होता दबाव
WORLD ROBOTImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jul 04, 2024 | 10:01 PM

रोजच्या धकाधकीच्या जीवनाला कंटाळून किंवा अन्य अनेक कारणांमुळे मनुष्यच नव्हे तर पशुपक्षीही आपले आयुष्य संपवून घेतात. परंतू, दक्षिण कोरियात अशी एक आत्महत्येची घटना घडली की ज्यामुळे जग हादरले आहे. ही आत्महत्या कुणी व्यक्तीने केली नाही तर ती एका रोबोटने केली आहे. कामाचा ताण आल्याने त्याने कंटाळून हे पाऊल उचलले आहे. मध्य दक्षिण कोरियाच्या म्युनिसिपल विभागात हा रोबोट सहाय्यक म्हणून काम करत होता. रोबोटच्या आत्महत्येला मध्य दक्षिण कोरियाच्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे.

मध्य दक्षिण कोरियातील नगर पालिकेने याबाबत माहिती देताना या रोबोटने स्वत:ला जिन्याच्या पायऱ्यांवरून खाली पाडले असे सांगितले. गेल्या वर्षभरापासून हा रोबोट गुमी शहराच्या नागरिकांना प्रशासकीय कामांमध्ये मदत करत होता. काम करत असताना तो अचानक पायऱ्यांवरून खाली पडला. यानंतर सर्वांनी त्याला जाऊन पाहिले असता तो सक्रिय नव्हता. तो ‘मृत’ झाला होता. एवढेच नाही तर अधिकाऱ्याने आत्महत्येच्या घटनेपूर्वी ज्या प्रकारे त्रासलेली व्यक्ती इकडे तिकडे फिरते तसा फिरत होता. काहीतरी गडबड असल्यासारखे वाटत होते, असे सांगितले.

नगर पालिकेने या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे जाहीर केले आहे. या संपूर्ण प्रकरणाचे खरे कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू असले तरी सध्या तणाव हेच प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे. जेव्हा रोबोट पायऱ्यांवरून खाली पडला तेव्हा त्याच्या शरीराचे सर्व अवयव इकडे तिकडे विखुरले होते. अधिकाऱ्यांनी रोबोट डिझाइन करणाऱ्या कंपनीकडे त्याचे अवयव पाठवले आहेत. ही कंपनी आता पुढील तपास करणार आहे. आत्महत्या केलेला रोबोट सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत पालिकेच्या शिफ्टमध्ये काम करत होता.

रोबोटच्या आत्महत्येनंतर इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रोबोटिक्सने एक निवेदन जारी केले आहे. यात त्यांनी दक्षिण कोरियामध्ये रोबोट्सचे प्रचंड आकर्षण आहे हे जगभर प्रसिद्ध आहे. अशा परिस्थितीत एका रोबोटने स्वतःची हत्या करणे ही जगासाठी धक्कादायक बातमी आहे.जर रोबोट कामाला कंटाळून आत्महत्या करत असतील तर माणसांची काय अवस्था असेल? असे या निवेदनामध्ये म्हटले आहे. दक्षिण कोरियामध्ये जगातील सर्वाधिक रोबोट वापरले जातात. तिथे 10 कर्मचाऱ्यांमागे एका रोबोट असतो. स्थानिक वृत्तपत्रांनीही या घटनेचे वृत्तांकन केले आहे.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.