
इस्त्रायलचे संरक्षण मंत्री इसरायल कॅट्ज यांनी मोठे वक्तव्य केले आहे. इराण-इस्त्रायल युद्धात, अयातुल्ला खामेनी यांना ठार मारण्याची योजना असल्याचे ते म्हणाले. पण तो टप्प्यात आला नाही. टप्प्यात आला असता तर तो मारल्या गेला असता, असे मोठे वक्तव्य कॅट्ज यांनी केले आहे. स्थानिक चॅनल 13 ला दिलेल्या मुलाखतीत कॅट्ज यांनी ही माहिती दिली. जर तो आपल्या रेंजमध्ये आला असता, आमचे लक्ष्य स्पष्ट होते. पण तशा कोणतेच्या ऑपरेशनची संधी मिळाली नाही. या कारवाईसाठी अमेरिकेकडून परवानगी घेतली होती का? त्यावेळी कॅट्ज यांनी रोखठोक त्याला उत्तर दिले. अशा प्रकरणात आम्ही कोणाची परवानगी घेत नाही, असा उत्तर मंत्र्यांनी दिले.
खामेनी हा तर आधुनिक हिटलर
इस्त्रायलचे मंत्री योआव गॅलेंट यांनी खामेनीची यांची तुलना हिटलरशी केली आहे. खामेनी हे आधुनिक हिटलर असल्याचा आरोप त्यांनी केला. या युद्धाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी हा आधुनिक हिटलर जिवंत राहता कामा नये असे निर्देश इस्त्रायली लष्कराला दिल्याचा दावा गॅलेंट यांनी केला. सूत्रांच्या दाव्यानुसार, खामेनी आपल्या कुटुंबासह तेहरान येथील एका भूमिगत बंकरमध्ये लपले होते. त्यामध्ये त्यांचा मुलगा मोजतबा खामेनी हा सुद्धा सहभागी होता. 13 जूनरोजी इस्त्रायलने जे हवाई हल्ले केले त्यानंतर हे भूमिगत झाल्याचा दावा मंत्री गॅलेंट यांनी केला.
खामेनी पुन्हा आले समोर, अमेरिका, इस्त्रायलला इशारा
गुरुवारी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी 19 जूननंतर पहिल्यांदा सार्वजनिक मंचावर दिसले. इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीवर त्यांनी एक व्हिडिओ संदेश राष्ट्राच्या नावाने प्रसारित केला. कतारमधील अमेरिकेच्या हवाई तळावर क्षेपणास्त्र डागून त्यांनी अमेरिकेच्या कानशिलात लगावल्याचा दावा खामेनी यांनी केला. जर पुन्हा आगळीक केली तर इराण प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा ही त्यांनी इस्त्रायल आणि अमेरिकेला दिला.
86 वर्षांचे खामेनी यांनी 10 मिनिटांचे भाषण केले. त्यात त्यांनी इस्त्रायल आणि अमेरिकेला गुडघ्यावर आणल्याचे सूतोवाच केले. इराणच्या अणू प्रकल्पावर अमेरिकेने हल्ले केल्याचा दावा त्यांनी खोडून काढला. या हल्ल्यातून त्यांच्या हाती काहीच लागले नाही. इराणच्या अणू क्षमता कार्यक्रमाला अमेरिकेने उद्धवस्त केले या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याची त्यांनी खिल्ली उडवली. त्यांना काहीच साध्य करता आले नाही असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.