पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या या नेत्याची होणार रवानगी?, शहबाज, मुनीर यांच्या अडचणी वाढणार?
Xi Jinping: चीनमध्ये सत्ता बदल होण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. कम्युनिस्ट पक्ष नवीन नेत्याचा शोध घेत आहेत. जिनपिंग यांच्या पर्यायाचा विचार केल्यास झांग यूक्सिया हे नाव समोर येत आहे. त्यांच्यावर पक्ष विश्वास टाकू शकतो.

Xi Jinping China: पाकिस्तानचे नेहमी समर्थन करणाऱ्या चीनच्या नेत्याची लवकरच सुट्टी होणार आहे. चीनचे राष्ट्रपीत शी जिनपिंग यांना सत्तेतून घालवण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात आलेल्या एका रिपोर्टनुसार चीनमधील कम्युनिस्ट पार्टी शी जिनपिंग यांना पर्याय शोधत आहे. जिनपिंग यांची वैचारिक कठोरता आणि आंतरराष्ट्रीय अतिक्रमणामुळे कम्युनिस्ट पक्षात नाराजी असल्याचे म्हटले जात आहे. जिनपिंग यांची सत्ता गेल्यास पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांच्या अडचणी वाढणार आहेत.
कम्युनिस्ट पार्टी देणार नवीन चेहरा?
सीएनएनमधील एका रिपोर्टनुसार, चीनमधील कम्युनिस्ट पार्टी जिनपिंग यांच्या पर्यायाचा शोध घेत आहेत. पक्षाला नवीन चेहरा हवा आहे. कम्युनिस्ट पक्ष जिनपिंग यांचे आंतरराष्ट्रीय धोरण आणि विचारसरणीमुळे नाराज आहे. पद सोडण्यासाठी जिनपिंग यांच्यावर प्रचंड दबाव आहे. त्यामुळे सध्या चीनचे राष्ट्रपती असलेल्या जिनपिंग यांची सत्ता येत्या काळात जाण्याची शक्यता वाढली आहे. रिपोर्टनुसार, चीनी कम्युनिस्ट पार्टी (सीसीपी) मध्ये जिनपिंग यांच्यासंदर्भात नाराजी आहे. पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी जिनपिंग मॉडेल आता अमान्य असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पर्याय शोधण्याची गरज व्यक्त केली आहे.
कम्युनिस्ट पार्टीकडे काय आहे पर्याय?
जिनपिंग यांच्या पर्यायाचा विचार केल्यास झांग यूक्सिया हे नाव समोर येत आहे. त्यांच्यावर पक्ष विश्वास टाकू शकतो. झांग सेंट्रल मिलिट्री कमीशनचे प्रथम उपाध्यक्ष जनरल आहेत. ते पीपुल्स लिबरेशन आर्मीच्या मागे खूप मोठी ताकद म्हणून समोर आले आहे. कधीकाळी ते जिनपिंग यांचे सर्वाधिक विश्वासू होते. परंतु आता परिस्थिती बदलली आहे.
पाकिस्तानला का बसणार धक्का?
चीन आणि पाकिस्तान दरम्यान चांगली मैत्री आहे. भारताने पाकिस्तानविरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या प्रसंगी चीनने पाकिस्तानला मदत केली होती. त्यात जिनपिंग यांची महत्वाची भूमिका होती. चीनच्या पाठिंब्याच्या जोरावर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्कर प्रमुख आसिम मुनीर भारताला धमक्या देत होते. पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर चीनकडून शस्त्रे मिळतात. जिनपिंग यांची सत्ता गेल्यास चीनच्या पाकिस्तान धोरणात बदल होऊ शकतो. त्यामुळे शरीफ, मुनीर अडचणीत येऊ शकतात.
