मुस्लीम देशांमध्ये मंदिर बांधण्यास परवानगी नाही, पाकिस्तानमधील मंदिर हल्ल्याचं झाकिर नाईकडून समर्थन

| Updated on: Jan 02, 2021 | 11:48 PM

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत राहणाऱ्या कथित इस्लाम प्रचारक झाकिर नाईकने (Zakir Naik) मंदिरावरील हल्ल्याचं समर्थन केलंय.

मुस्लीम देशांमध्ये मंदिर बांधण्यास परवानगी नाही, पाकिस्तानमधील मंदिर हल्ल्याचं झाकिर नाईकडून समर्थन
Follow us on

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील (Pakistan) खैबर पख्तूनख्वा भागात मागील काही दिवसांपूर्वी एका जमावाने एका हिंदू मंदिरावर (Temple) हल्ला केला होता. या जमावाने मंदीर तोडून तेथे आग लावली. यानंतर या घटनेचा पाकिस्तानसह जगभरातून निषेध व्यक्त करण्यात आला. खैबर पख्तूनख्वाच्या मुख्यमंत्र्यांनी देखील मंदिराचं पुनर्निर्माण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, दुसरीकडे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत राहणाऱ्या कथित इस्लाम प्रचारक झाकिर नाईकने (Zakir Naik) या हल्ल्याचं समर्थन केलंय (Zakir Naik support attack on Temple in Pakistan).

झाकिर नाईकने मंदिर तोडण्याच्या कृती योग्य असल्याचं म्हटलं. तो म्हणाला, “कुणालाही इस्लामिक देशांमध्ये मंदिर बांधण्याची परवानगी दिली जाऊ नये.” 30 डिसेंबरला पाकिस्तानमध्ये पाडण्यात आलेल्या मंदिर घटनेवर बोलताना झाकिरने हे वक्तव्य केलंय. झाकिर नाईक भारतातून फरार असून सध्या तो मलेशियात लपला आहे. त्याच्यावर बेकायदेशीर आर्थिक व्यवहार (मनी लॉन्ड्रिंग) प्रकरणी गुन्हा दाखल आहे. तो 2016 पासून मलेशियात आहे. तो नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असतो. याआधीही त्याने इस्लामाबादमध्ये कृष्ण मंदिर बांधण्याला ‘पाप’ म्हटलं होतं.

पाकिस्तानमधील मुख्यमंत्र्यांकडून मंदिराच्या संरक्षणाची शपथ

खैबर पख्तूनख्वामधील करक जिल्ह्यातील टेरी गावातही बुधवारी जमावाने एका मंदिरावर हल्ला केला. शुक्रवारी (1 जानेवारी) खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री महमूद खान यांनी हेल्थ कार्ड वितरण कार्यक्रमात संबंधित मंदिराच्या पुनर्निर्माणाचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांनी अल्पसंख्यकांच्या धार्मिक स्थळांचं संरक्षण करण्याची शपथही घेतली. मंदिरांवर हल्ला करणाऱ्या 45 हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केले आहे.

स्थानिक मौलवी आणि जमीयत उलेमा-ए-इस्लाम पार्टीच्या (फजल उर रहमान समूह) समर्थकांच्या जमावाने या जुन्या मंदिरासोबतच नवीन सुरू असलेल्या मंदिरांवरही हल्ला चढवला. यात ही मंदिरं उद्ध्वस्त झाली. विशेष म्हणजे यानंतर पाकिस्तानमधील सुप्रीम कोर्टानेही या हल्ल्यांची स्वतः दखल घेत स्थानिक अधिकाऱ्यांना 5 जानेवारीला कोर्टात हजर होण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा : 

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड जकीउर रहमान लखवी जेरबंद; टेरर फंडिंग प्रकरण भोवणार?

पाकिस्तानचे बासमती तांदूळ मुस्लिम देशांना ‘नकली’ का वाटतात?; वाचा स्पेशल रिपोर्ट!

पाकिस्तानात भ्रष्टाचाराची बजबजपुरी; सीपीईसी प्रकल्प रखडला; चीनची डोकेदुखी वाढली

Zakir Naik support attack on Temple in Pakistan