मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड जकीउर रहमान लखवी जेरबंद; टेरर फंडिंग प्रकरण भोवणार?

26/11च्या मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड जकीउर रहमान लखवी याला अखेर पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. (Zaki-ur-Rehman Lakhvi arrested in Pakistan)

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड जकीउर रहमान लखवी जेरबंद; टेरर फंडिंग प्रकरण भोवणार?

इस्लामाबाद: 26/11च्या मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड जकीउर रहमान लखवी याला अखेर पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. त्याला टेरर फायनान्सिंग प्रकरणात अटक करण्यात आली असल्याची माहिती एआरवाय न्यूजने दिली आहे. (Zaki-ur-Rehman Lakhvi arrested in Pakistan)

मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 मध्ये हल्ले झाले होते. या हल्ल्यात 166 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 300 लोक जखमी झाले होते. जकीउर रहमना लखवी हा या हल्ल्याचा मास्टरमाइंड असून त्याचा मुंबई पोलीस शोध घेत होती. भारत सरकारने त्याला सप्टेंबर 2019मध्ये यूएपीए अंतर्गत दहशतवादी घोषित केलं होतं. तर UNSC मध्ये त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलं होतं. 26/11च्या हल्ल्याच्या तपासात लखवीनेच हाफिज सईदला मुंबई हल्ल्याचा कट रचून दिल्याचं उघड झालं होतं.

मुंबईवरील हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानात जकीउर रहमान लखवीला अटक करण्यात आली होती. मात्र पाकिस्तान सरकारने त्याला एप्रिल 2015मध्ये सोडलं होतं. लखवी विरोधात कोणतेही आरोप नसल्याचं कारण पुढे करत त्याला सोडून देण्यात आलं होतं. तुरुंगात असतानाही त्याच्या दहशतवादी कारवाया सुरूच होत्या. आता त्याला टेरर फंडिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. अतिरेक्यांना मदत आणि आर्थिक रसद पोहोचवल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.

10 ठिकाणी दहशतवादी हल्ले

26 नोव्हेंबर 2008 च्या रात्री दहशतवाद्यांनी मुंबईत एकूण दहा ठिकाणी एकत्रित हल्ले चढविले. यामध्ये आठ हल्ले दक्षिण मुंबई येथी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या परिसरात हल्ले झाले. या सर्व ठिकाणी दहशतवाद्यांनी लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला आणि हातबॉम्ब फेकले. याव्यतिरिक्त माझगांव डॉक येथे एक बॉम्बस्फोट व विलेपार्ले येथे एका टॅक्सी मध्ये स्फोट घडवून आणला होता. (Zaki-ur-Rehman Lakhvi arrested in Pakistan)

हल्ले करणाऱ्या 10 पैकी 9 दहशतवाद्यांना मुंबई पोलीस आणि एनएसजीच्या कमांडोंनी कंठस्नान घातले तर अजमल आमीर कसाब हा दहशतवादी पोलिसांच्या तावडीत जिवंत सापडला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व हल्लेखोर पाकिस्तानी होते आणि या हल्ल्यांमागे लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात होता. (Zaki-ur-Rehman Lakhvi arrested in Pakistan)

 

संबंधित बातम्या:

मुंबईवरील 26 /11 दहशतवादी हल्ल्याची 12 वर्षे, पाकिस्तानची पोलखोल करणारे ‘सात मुद्दे’

मुंबई हल्ल्यामागचा सूत्रधार हाफिज सईदला 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

मुंबईवर मोठ्या दहशतवादी हल्ल्याचं सावट; ड्रोन उड्डाणांवर बंदी

(Zaki-ur-Rehman Lakhvi arrested in Pakistan)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI