AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानचे बासमती तांदूळ मुस्लिम देशांना ‘नकली’ का वाटतात?; वाचा स्पेशल रिपोर्ट!

देशांतर्गत महागाईने आधीच पिचलेल्या पाकिस्तानला आणखी एक दणका बसला आहे. (India move to get Basmati rice registered in the European Union )

पाकिस्तानचे बासमती तांदूळ मुस्लिम देशांना 'नकली' का वाटतात?; वाचा स्पेशल रिपोर्ट!
| Updated on: Dec 28, 2020 | 6:09 PM
Share

इस्लामाबाद: देशांतर्गत महागाईने आधीच पिचलेल्या पाकिस्तानला आणखी एक दणका बसला आहे. भारताने बासमती तांदळाला GIचा टॅग मिळावा म्हणून यूरोपीयन यूनियनमध्ये अर्ज केला आहे. या बातमीमुळे पाकिस्तानची झोपच उडाली आहे. भारताला GIचा टॅग मिळाला तर जगभरात भारताच्या बासमती तांदळाची मागणी वाढेल. त्यामुळे पाकिस्तानचा धंदाच बसणार आहे. विशेष म्हणजे मुस्लिम देशांचा पाकिस्तानच्या बासमती तांदळावर भरवसा राहिला नसून त्यांनी भारताच्या बासमतीला पसंती दिल्याचं चित्रं आहे. (India move to get Basmati rice registered in the European Union )

भारताने बासमती तांदळाला जिओग्राफिकल इंडेक्स टॅग (GI) मिळावा म्हणून अर्ज केला आहे. हा टॅग मिळाल्यास भारताला बासमतीचे पेटंट मिळतील. त्यामुळे बासमतीवर संपूर्णपणे भारताचा अधिकार असेल. त्यामुळेच पाकिस्तानच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

आमचेही शेतकरी बासमती तांदळाचं पीक घेतात, असं सांगून पाकिस्तानने भारताला टॅग देण्यास विरोध केला होता. दोन दशकांपूर्वी अमेरिकेतील तांदळाला बासमती तांदूळ दाखवून जीआय टॅग घेण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी भारत आणि पाकिस्तानने मिळून वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायजेशनमध्ये त्याला कडाडून विरोध केला होता. त्यामध्ये भारत आणि पाकिस्तानचा विजय झाला होता. त्यानंतर दोन्ही देशांनी जीआय टॅग मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

पाकिस्तानच्या तांदळावर भरोसा का नाही

दोन्ही देशांच्या पंजाब प्रांतात बासमती तांदळाचं पीक घेतलं जातं. ग्लोबल बासमती मार्केटमध्ये भारताची भागिदारी 65 टक्के आहे. तर उरलेली पाकिस्तानची आहे. यूरोपीयन यूनियनमध्ये पाकिस्तान जीआय टॅग मिळवण्यात अपयशी ठरल्यास त्यांच्या निर्यातीवर त्याचा प्रचंड परिणाम होणाीर आहे. पाकिस्तानमधून दरवर्षी यूरोपमध्ये अर्धा अब्ज डॉलरच्या किमतीचे तांदूळ निर्यात केले जातात. भारताने टॅग मिळवल्यास मध्यपूर्वेतील पाकिस्तानच्या तांदळाची मागणी घटणार आहे. सध्या मध्यपूर्वेत भारतातील बासमती तांदळावर सर्वाधिक भरवसा केला जात आहे. टॅग नसेल तर बासमती तांदळाला जी किंमत मिळायला हवी ती मिळत नाही. एखाद्या वस्तू, फळ किंवा मिठाईला टॅग मिळाल्यास या सर्व गोष्टी त्या देशाची स्पेशालिटी मानली जाते. त्यामुळे त्या वस्तूंना त्या देशाच्या नावाने ओळखले जाते. तसेच या वस्तूचा दर्जाही सर्वोत्तम असल्याचं मानलं जातं. शिवाय शेतकऱ्यांनाही त्याचा चांगला भाव मिळतो.

पाकिस्तानच्या दैनिक ‘डॉन’मधील वृत्तानुसार मार्च 2020मध्ये जीआय टॅगसाठी कायदा तयार करण्यात आला आहे. मात्र, त्याचे नियम अजून अंतिम करण्यात आलेले नाहीत. जीआयसाठी देशांतर्गत चांगले कायदे असायला हवेत. तेव्हाच यूरोपीयन यूनियनमध्ये जाणं शक्य होतं. एकदा का जीआय टॅगची व्यवस्था निर्माण झाली तर सिंध आणि पंजाब प्रांतातील वाद सोडवणं कठिण जाणार नसल्याचंही या वृत्तात म्हटलं आहे.

आता पाकिस्तानचं काय होणार?

पाकिस्तानची अर्थव्यवस्था आधीच डळमळीत झाली आहे. यूरोपीयन यूनियनमध्ये पराभूत झाल्यास पाकिस्तानचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. कारण मुस्लिम देश आधीपासूनच भारताकडूनच मोठ्याप्रमाणावर बासमती तांदूळ खरेदी करतात. पाकिस्तानचे तांदूळ नकली वाटत असल्याने हे मुस्लिम देश भारताकडूनच बासमती तांदूळ खरेदी करण्यावर भर देतात. जगात भारतातच बासमती तांदळाची पैदास होत असल्याचा विश्वास असल्याने मुस्लिम देश पाकिस्तानऐवजी भारताच्या बासमतीला अधिक पसंती देतात. त्यामुळे पाकिस्तानला टॅग न मिळाल्यास त्यांच्यासमोरी अडचणीत आणखीनच वाढ होणार आहे. (India move to get Basmati rice registered in the European Union )

संबंधित बातम्या:

वुहानची हकिकत मांडण महागात, महिला पत्रकाराला चीनच्या कोर्टाकडून 4 वर्षे तुरुंगवास

जपानने बनवला थेट लाकडाचा उपग्रह, थक्क करणारी आहेत वैशिष्ट्ये

इराणमध्ये भयावह वातावरण, प्रचंड बर्फवृष्टी आणि वादळ, दहा गिर्यारोहकांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

(India move to get Basmati rice registered in the European Union )

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.