जगातल्या 5 विषारी वनस्पती, काही सेकंदात घेऊ शकतात कुणाचाही जीव!

| Updated on: Jul 06, 2021 | 2:57 PM

अशा काही वनस्पती अशा आहेत की ज्या काही सेकंदांमध्ये कुणाचाही जीव घेऊ शकतात... या वनस्पती आपल्याला माहिती आहेत का? चला तर मग जाणून घेऊया जगातील सगळ्यात विषारी पाच वनस्पती कोणत्या...??

जगातल्या 5 विषारी वनस्पती, काही सेकंदात घेऊ शकतात कुणाचाही जीव!
Dangerous Plant
Follow us on

Dangerous Plant : झाडं, वेली, वनस्पती वातावरणामध्ये सकारात्मकता आणतात… पर्यावरणामध्ये सुंदरता आणतात… परंतु काही वनस्पती अशा आहेत की ज्या काही सेकंदांमध्ये कुणाचाही जीव घेऊ शकतात… या वनस्पती आपल्याला माहिती आहेत का? चला तर मग जाणून घेऊया जगातील सगळ्यात विषारी पाच वनस्पती कोणत्या…?? (5 most Dangerous plant For health)

सुसाईड ट्री

धोकादायक आणि विषारी वनस्पतींबद्दल बोलायचं झालं तर, मनात येणारी पहिली वनस्पती म्हणजे सुसाईड ट्री… या वनस्पतीचं नावच सुसाइड ट्री आहे. केरळ आणि आसपासच्या किनारपट्टी भागात ही वनस्पती आढळते. या वनस्पतीमुळे केरळमध्ये आतापर्यंत बरेच मृत्यू झाले आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या वनस्पकीच्या बियांमध्ये अल्कॉईड्स आढळतात, जे हृदय आणि श्वासासाठी खूप विषारी असतात….

कनेर या

कनेर या झाड बहुतेकदा बागेत आढळतं आणि त्याची पिवळ्या फुले देखील आकर्षक देखील असतात. परंतु हे झाड फार विषारी आहे हे फारच कमी लोकांना ठाऊक असेल. कनेर वनस्पती एक अतिशय धोकादायक आणि प्राणघातक वनस्पती मानली जाते. याचे सेवन केल्याने उलट्या, चक्कर येणे, लूज मोशन अशा प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.

इतकंच नाही तर एखाद्या व्यक्तीने चुकून त्याचं सेवन केलं तर तो कोमामध्ये जाऊ शकतो. जर वनस्पतीच्या पानाचा आपल्या शरीराला स्पर्श झाला तर खाज सुटणं सुरु होतं. कनेर इतकं विषारी आहे की त्याच्या फुलावर बसलेल्या मधमाश्यांपासून बनविलेले मध खाणे एखाद्या व्यक्तीला आजारी पडू शकतं.

रोजरी पी

या प्रकारची आणखी एक विषारी आणि प्राणघातक वनस्पती आहे, रोझरी पी…. या वनस्पतीला रोजरी पी असं म्हणतात… कारण त्याच्या बियांचा दागदागिन्यांमध्ये वापर होतो. त्याच्या बिया धोकादायक नाही परंतु त्या बिया चावल्यास ते प्राणघातक ठरू शकतात. यामध्ये एब्रिन आढळतो, त्यापैकी केवळ 3 मायक्रो ग्रॅम माणसाला मारण्यासाठी पुरेसे आहे.

एरंड

एरंडाबद्दल बहुतेक लोकांना माहित असते. एरंडापासूनच कॅस्टर ऑईल काढलं जाते. परंतु एरंड बिया बऱ्याच विषारी आहेत. त्याच्या बिया इतक्या विषारी आहे की एक किंवा दोन बिया खाल्ल्याने छोट्या मुलांचा मृत्यू देखील होऊ शकतो. आणि आठएक बिया खाल्ल्यानंतर एक वृद्ध व्यक्तीचा देखील मृत्यू होऊ शकतो. त्यात रिकिन नावाचे विष असते जे पेशींच्या आत प्रथिने बनविण्याची प्रक्रिया थांबवते. यामुळे, प्रथम उलट्या आणि लूज मोशन होण्यास सुरुवात होतेआणि नंतर त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.

व्हाईट स्नेकरुट

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची आई नॅन्सी हॅन्क्स या वनस्पतीमुळे मरण पावली होती. ही एक पांढरी फुले असलेली वनस्पती आहे. ट्रेमाटॉल नावाचा एक विषारी अल्कोहोल त्यात आढळतो. अब्राहम लिंकनची आई थेट वनस्पतीपासून मरण पावली नाही. ही वनस्पती खाल्लेल्या गायीचे दूध त्यांनी प्यायली होतं. वास्तविक, जर एखाद्या प्राण्याने ते खाल्ले तर त्याचे मांस आणि दूध खाणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात विष पसरते आणि त्याचा मृत्यू होऊ शकतो.

(5 most Dangerous plant For health)

हे ही वाचा :

PHOTO | अबब! एका द्राक्षाची किंमत तब्बल 35 हजार रुपये!

पावसाचा दगा, पेरलेलं बी-बियाणं, खतं वाया गेलं, राज्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट