AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आधार’ तुमची ओळख नसेल तर या योजनांचा लाभ कसा मिळणार? जाणून घ्या रेशनपासून पेन्शनपर्यंत सर्वकाही

आधारकार्ड हा महत्त्वाचा दस्ताऐवज आहे. अनेक जण या पुराव्याच्या आधारे देशात अनधिकृतपणे वास्तव्य करत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. पण सर्वोच्च न्यायालयाच्या मते आधार ही ओळख असू शकत नाही. त्यामुळे सरकारी योजनांमध्ये अत्यावश्यक असलेल्या आधाराचं नेमकं काय होईल? जाणून घ्या.

'आधार' तुमची ओळख नसेल तर या योजनांचा लाभ कसा मिळणार? जाणून घ्या रेशनपासून पेन्शनपर्यंत सर्वकाही
'आधार' तुमची ओळख नसेल तर या योजनांचा लाभ कसा मिळणार? जाणून घ्या रेशनपासून पेन्शनपर्यंत सर्वकाही
| Updated on: Aug 12, 2025 | 7:17 PM
Share

देशात एकदा का आधारकार्ड तयार झालं की सुटकेचा निश्वास सोडला जातो. कारण सर्व सरकारी कामांसाठी आधारकार्ड अत्यावश्यक दस्ताऐवज आहे. त्याच्याशिवाय पान हळू शकत नाही. यावरून आधारकार्डचं महत्त्व अधोरेखित होतं. पण मंगळवारी बिहारच्या मतदार याद्यांप्रकरणी सुरु असलेल्या एका सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने आधारबाबत आपलं स्पष्ट मत मांडलं. आधार हा ओळखीचा पुरावा होऊ शकत नाही. त्यातही पडताळणीनंतरच ते स्वीकारले पाहीजे. मतदार पात्रता सिद्ध करण्यासाठी आधार पुरेसा नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने म्हटले की, आधार कायद्यातही ते पुरावा म्हणून मानले गेलेले नाही .त्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे. जर आधार ही आपली ओळख नसेल तर सरकारी योजनांमध्ये ग्राह्य धरलं जातं. त्याचं पुढे काय होणार? रेशनिंग कार्डपासून पेन्शन योजना ते लाडकी बहीण योजनेसाठी आधारकार्ड अनिवार्य आहे. अशा स्थितीत न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे सरकारी योजनावर परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे.

कायदा काय म्हणतो?

रेशनकार्ड, पेन्शन, बँक खातं, गॅस सब्सिडी, डीबीटी ट्रान्सफर, मोबाईल सीम, बँकिंग केवायसी, लाडकी बहीण योजना आणि इतर सरकारी योजनांसाठी आधारकार्ड आवश्यक आहे. आधार कायदा, 2016 नुसार आधार हा ओळख आणि पत्त्याचा पुरावा असू शकतो. पण कायद्याने अनिवार्य केल्याशिवाय आधार क्रमांक नसल्यामुळे कोणालाही सेवा नाकारता येत नाही. 2018 मध्ये दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, आधार अनेक सरकारी योजनांमध्ये वापरता येते. परंतु सर्व सेवांसाठी ते अनिवार्य करता येत नाही.

दुसरीकडे, मुंबई हायकोर्टाने देखील एका सुनावणी दरम्यान या दस्ताऐवजबाबत महत्त्वाचं मत मांडलं आहे. न्यायालय म्हणते की आधार, पॅन आणि मतदार ओळखपत्र हे नागरिकत्वाचा पुरावा असू शकत नाहीत. या संपूर्ण प्रकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने नागरिकत्व कायदा 1955 चा दाखला दिला आहे. हे संपूर्ण प्रकरण बांगलादेशातून बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केलेल्या व्यक्तीला जामीन देण्याशी संबंधित आहे.

Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था