कमी खर्चात LLB करण्यासाठी उत्तम देश कोणते?
Top Budget-Friendly Countries For LLB : कमी पैशात तेही परदेशात एलएलबीचं शिक्षण घेणं आता सोपं झालं आहे. अनेक देशात आता वकीलीचं शिक्षण घेणे फायदेशीर होत आहे. आज आपण असे देश पाहणार आहोत ज्या देशात तुमच्या बजेटमध्ये मुलांना एलएलबी करता येईल...

तुम्हालाही कमी खर्चात परदेशातून कायद्याचे शिक्षण ( LLB ) घेण्याची इच्छा आहे का? मग ही तुमच्यासाठी अत्यंत चांगली संधी आहे. अनेक देशांमध्ये कायद्याचं शिक्षण अत्यंत स्वस्त दरात दिलं जातं. स्वस्त असण्यासोबतंच या डिग्रीला जगभर मान्यता देखील असते. त्यामुळे तुम्ही ही डिग्री घेऊन जगभरात कुठेही तुमचा वकिलीचा व्यवसाय सुरु करु शकता.
जर्मनी, फ्रान्स, स्पेन आणि पोर्तुगाल हे युरोपियन देश LLB साठी कमी ट्युशन फी आणि स्वस्त राहणीमानासाठी प्रसिद्ध आहेत. या देशांमधील सरकारी विद्यापीठांमध्ये मोफत शिक्षण दिले जाते. ज्या ठिकाणी ट्युशन फी घेतली जाते ती देखील अत्यंत कमी असते. त्यामुळे परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे देश उत्तम पर्याय ठरु शकतात.
भारतमध्येही कायद्याचं शिक्षण स्वस्तात मिळतं. विशेषतः लहान शहरांतील खासगी महाविद्यालयांमधील LLB ची फी ही 10 हजारांपासून ते दीड लाखांपर्यंत असते.
बांग्लादेश हा भारताचा शेजारी देश असून, इथं LLB साठी वार्षिक ट्यूशन फी 30 हजारांपासून सुरु होते. तर याच देशातील काही ठिकाणी 1 लाखांपर्यंत फी घेतली जाते. या ठिकाणची भाषा, राहणीमान आणि संस्कृती भारतासारखीच असल्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी शिक्षण घेणे सोप्पे ठरते.
नेपाळमध्येही LLB साठी 40 हजारांपासून ते 1, 20 हजारांपर्यंत फी आहे. दोन्ही देश भारताचे शेजारी देश आहेत. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांसाठी अधिक अनुकुल मानले जातात.
रशिया आणि तुर्कीमध्येही LLB शिक्षण कमी खर्चात करता येऊ शकते. मात्र या देशांमध्ये तुमचा राहण्याचा किंवा इतर खर्च जीवनावश्यक खर्च थोडे जास्त आहेत. त्यामुळे इतर दोन देशांच्या तुलनेत रशिया आणि तुर्कीमध्ये शिक्षणाचा खर्च थोडा जास्त असु शकतो.
स्वस्तात LLB करण्यासाठी उत्तम देश
1. बांग्लादेश- 30 हजार ते 1 लाखांपर्यंत फी
2. नेपाळ- 40 हजारांपासून ते 1, 20 हजारांपर्यंत फी
3. रशिया आणि तुर्की- शिक्षणासाठी कमी खर्च मात्र जीवनावश्यक खर्च जास्त आहेत.