AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनंत अंबानींकडे हिऱ्यांनी मढवलेलं 12 कोटींचं ‘शिव’ घड्याळ, आध्यात्माशी का आहे खास कनेक्शन?

अनंत अंबानी यांच्याकडे आहे 12 कोटींचं शिव घड्याळ. ज्याची जगभरात होतेय प्रचंड चर्चा. हिऱ्यांपासून तयार झालेल्या घड्याळाचा आहे आध्यात्माशी संबंध, ऐकून तुम्ही देखील कराल कौतुक.

अनंत अंबानींकडे हिऱ्यांनी मढवलेलं 12 कोटींचं ‘शिव’ घड्याळ, आध्यात्माशी का आहे खास कनेक्शन?
| Updated on: Apr 25, 2026 | 2:48 PM
Share

देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे कुटुंब त्यांच्या आलिशान आणि वेगळ्या लाइफस्टाइलसाठी नेहमीच सोशल मीडियावर आणि देशभरात चर्चेत असते. अलीकडेच त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याने घातलेल्या एका खास घड्याळाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.

‘ओपेरा गॉडफादर बॅगेट शिवा’ नावाचे हे घड्याळ केवळ लक्झरी आयटम नसून कला, तंत्रज्ञान आणि अध्यात्म यांचा अनोखा संगम मानले जात आहे. हे खास घड्याळ जगप्रसिद्ध Jacob & Co. या कंपनीने तयार केले असून त्याची किंमत तब्बल 12 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते.

घड्याळात हजारहून अधिक हिरे

या घड्याळाचा बाह्य भाग 18 कॅरेट रोज गोल्डपासून बनवण्यात आला आहे. यामध्ये 300 पेक्षा अधिक बॅगेट कट हिरे जडवण्यात आले आहेत तर एकूणच या घड्याळात हजारहून अधिक हिरे वापरण्यात आले आहेत. त्यामुळे हे घड्याळ म्हणजे केवळ वेळ दाखवणारे साधन नसून एक उत्कृष्ट कलाकृती म्हणूनही ओळखले जाते.

या घड्याळाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्याच्या मध्यभागी ध्यानमुद्रेत विराजमान असलेली भगवान शिव यांची मूर्ती. त्याचबरोबर ‘ॐ’ हे पवित्र चिन्हही कोरलेले आहे. शिवाची ध्यानमुद्रा ही शांती, एकाग्रता आणि अंतर्गत शक्तीचे प्रतीक मानली जाते. या रूपातून हे दर्शवले जाते की खरे सुख बाह्य जगात नसून आपल्या अंतर्मनात आहे.

120 सुरांचे संगीत यंत्र

योग आणि ध्यान साधनेसाठी शिवाचे हे रूप आदर्श मानले जाते, कारण ते अस्थिर मनाला स्थिर करण्याची प्रेरणा देते आणि ब्रह्मांडीय ऊर्जेशी जोडण्याचा संदेश देते. सनातन धर्मात ‘ॐ’ हे सर्वोच्च आणि पवित्र ध्वनी मानले जाते. याला ‘प्रणव मंत्र’ असेही संबोधले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, ॐ ही संपूर्ण सृष्टीची मूलभूत ध्वनी असून ती परमेश्वराचे प्रतीक आहे. ॐ चा जप केल्याने मनाला शांती मिळते, सकारात्मक ऊर्जा वाढते, आरोग्य सुधारते आणि मानसिक स्थैर्य मिळते असे मानले जाते.

विशेष म्हणजे, हे एक म्युझिकल घड्याळ देखील आहे. यामध्ये 120 सुरांचे संगीत यंत्र बसवण्यात आले असून एका बटणावर The Godfather या प्रसिद्ध चित्रपटातील गाणे वाजते. गाणे सुरू असताना घड्याळातील आतील यंत्रणा हलताना दिसते, जे पाहणे ही एक वेगळीच अनुभूती ठरते.

Follow Us
61 तासांच्या आंदोलनाला अखेर यश, 3900 + 100 + 200 चा फॉर्म्युला मान्य..
Raju Shetti On Sugarcane Farmers Protest : 61 तासांच्या आंदोलनाला अखेर यश, 3900 + 100 + 200 चा फॉर्म्युला मान्य; राजू शेट्टींकडून आंदोलन मागे
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? तटकरेंच्या विधानावर अनिल....
NCP Merger : आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? सुनील तटकरेंच्या विधानावर अनिल देशमुखांचा थेट सवाल
गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Raj Thackeray On Gokul : गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर राज ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता...
NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता; त्या बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं मोठं विधान
Sunil Tatkare : अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं  मोठं विधान
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या.....
Devendra Fadnavis Calls Supriya Sule : मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या प्रकृतीची घेतली सविस्तर माहिती
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र...
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या; सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ..
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ आणि सुनेत्रा पवारांबाबत काय म्हणाले?