वर्षभर बंद असलेल्या खाणीत सापडला तब्बल 50 लाखांचा हिरा, एका मुसळधार पावसातच..

नुकताच एक मोठी बातमी पुढे येतंय. मागील एक वर्षापासून घाण बंद होती. खाणीत काहीच मिळत नसल्याने ही खाण बंद करण्यात आली होती. मात्र, अचानक पाऊस झाला आणि मजूर खाणीकडे पोहोचले असता त्यांना माैल्यवान हिरा सापडला.

वर्षभर बंद असलेल्या खाणीत सापडला तब्बल 50 लाखांचा हिरा, एका मुसळधार पावसातच..
Precious diamond
| Updated on: Aug 14, 2026 | 2:48 PM

मध्य प्रदेशमध्ये एक खास घटना घडली. एक वर्षापासून काहीच मिळत नसल्याने एक खाण बंद होती. काहीच सापडत नसल्याने ती खाण बंद करण्यात आली. मात्र, अचानक पाऊस झाला आणि तिथे मजूर पोहोचले. यावेळी थेट त्यांना लाखोंच्या घरात किमत असलेला एक माैल्यवान हिरा मिळाला. गरीब आणि पोटावर काम असलेल्या मजूरांचे जीवनच या हिऱ्यामुळे बदलणार आहे. दोन वर्षांपूर्वी भाडेतत्वावर घेतलेल्या जमिनीमधून त्यांना हा हिरा मिळाला. या हिऱ्याचे वजन 16.96 कॅरेट आहे. हा एक नैसर्गिक हिऱ्यांच्या सर्वाेत्तम प्रकारांपैकी एक असल्याचे सांगितले जातंय. खनिज अधिकारी रवी पटेल यांनी सांगितले की, हा अत्यंत माैल्यवान हिरा आहे. या हिऱ्याची किमती 50 लाखांच्या आसपास असल्याचे सांगितले जातंय. पन्ना येथे हिरे कायमच सापडतात. पन्ना येथे जवळपास खाणकामगार रोजंदारीनुसार काम करतात.

या कामगारांना हिरा सापडला तरीही तो त्यांना मिळत नाही तर खाणीचा पट्टा घेणाऱ्याला मिळतो. वर्षभरापूर्वी ही खाण बंद होती. सोमवारी मुसळधार पाऊस झाल्यानंतर खाणीची पाहणी करण्यात आली. त्यावेळी त्यांना खडक दिसून आला. जवळपास तिथे दोन वर्ष काहीच सापडले नाही. तिथे काहीच मिळत नसल्याने त्यांनी काम बंद केले. त्यानंतर हे मजूर इतर ठिकाणी शोध घेते होते.

मुसळधार पावसानंतर हे मजूर खाणीची पाहणी करण्यासाठी पोहोचले असताना त्यांना हिरा आढळून आला. ऑक्टोबर महिन्यात या हिऱ्याचा लिलाव होणार आहे. हिऱ्याच्या आलेल्या रक्कमेतून 12 टक्के रॉलल्टी वजा करून या 7 मजूरांना समान पैसे वाटप केले जातील. या एका हिऱ्यामुळे या मजूरांचे जीवन बदलणार आहे.

ऑक्टोबरमध्ये या हिऱ्याचा लिलाव होणार आहे. हा हिरा खरेदी करण्यासाठी फक्त देशातूनच नाही तर विदेशातूनही लोक येणार आहेत, हा एक माैल्यवान हिरा आहे. एका हिऱ्याने या मजूरांचे नशीब बदलेल. सर्वात खास बाब म्हणजे एका वर्षापासून ही खाण बंद होती. या खाणीत काहीच मिळत नसल्याने शेवटी शोध बंद करण्यात आला.  अचानक मजूर तिथे पोहोचले असतानाच हा हिरा सापडला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us