AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Social Media : सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर बाजारापर्यंत पोहचले, असे करतात कोट्यवधी रुपयांची अफरातफर

सायबर गुन्हेगार आता शेअर बाजारातही पोहचले. युट्यूब, फेसबूक, इंस्टाग्रामवर शेअर बाजार एक्सपर्ट म्हणून माहिती देतात. रजीस्ट्रेशन करवले जाते. व्हॉट्सअपवर मॅसेज येतात. स्टॉक मार्केटमध्ये पैसे लावा, असं सांगितलं जातं.

Social Media : सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर बाजारापर्यंत पोहचले, असे करतात कोट्यवधी रुपयांची अफरातफर
| Updated on: Sep 09, 2023 | 4:02 PM
Share

नवी दिल्ली, ९ सप्टेंबर २०२३ : डेरीकला शेयर बाजारात आवड होती. नोकरीवर असताना संधी मिळत नव्हती. रिटायर झाले, मुल मोठी झाली. आता ते सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या माध्यमांशी शेयर मार्केटच्या टिप्स घ्यायला लागले. मिळालेल्या टिप्सनुसार एकदम नव्या कंपनीत काही गुंतवणूक केली. काही दिवसात पैसे दुप्पट झाले. अशारीतीने त्यांचा उत्साह वाढत गेला. गुंतवणूकही वाढवली. मॉर्निंग वाकच्या वेळी त्यांनी आपल्या गोष्टी इतर मित्रांसोबत शेअर केल्या. काही मित्र त्यात आवड दाखवायला लागले. महिन्याभरात सगळ्यांना खूप फायदा झाला. जवळ-जवळ दहा-बारा मित्रांनी आपली मोठी कमाई केली. एक दिवस माहीत झाले की, कंपनीचे शेयर घसरायला लागले. असे तीन-चार दिवसपर्यंत राहिले. डेरीक सोशल मीडियावर याबाबत समजण्याचा प्रयत्न करत होता. तोपर्यंत रक्कम अजून खाली येत होती. आता नफाच काय तर राहिलेली जमापुंजीही नाममात्र शिल्लक राहिली.

साइबर फ्रॉडचा हा एक प्रकार समोर आला. यात सोशल मीडिया हे एक अस्त्र आहे. शेअर बाजाराच्या टिप्स घेऊन सांगितलेले घोटाळेबाज दररोज येऊ लागले. ते छोट्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास सांगतात. त्यांच्याबद्दल कोणालाच माहिती नसते. पण हे शेअर्स काही काळासाठीच खूप चढतात. वेळ पाहून गुन्हेगार पैसे काढून बाहेर निघतात.

एक्सपर्ट म्हणून सांगणारे ज्ञान देणारे ठग

मोठ्या संख्येने यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्रामवरील ठग शेयर बाजारचे एक्सपर्ट म्हणून ज्ञान देतात. नंबर रजिस्टर केल्यानंतर तेथे आपल्याला व्हाट्सएपवर माहिती येऊ लागते. आज कुठे पैसा लावायचा. ठगांचा हा धंदा काही टीव्ही चॅनलवर पहायला मिळतो. या टोळीतील प्रत्येक व्यक्ती निश्चित माहिती अगोदर देत आहे. पण तज्ज्ञ कधी काही सांगतात आणि कधीतरी करून दाखवतात म्हणून सामान्य माणूस विश्वास करतो.

वेगवेगळ्या भागात सुरू आहे ठगबाजीचा व्यवसाय

छोट्या कंपन्यावर सेबीची नजर जात नाही. देशातील काही भागात अशा ठगबाजांचे फावते. मोठ्या शहरात बसून ठगबाज फसवतात. सोशल मीडियावर याचे ब्रांडिंग करतात. लोकं शेअर खरेदी करतात. पैसे जमा झाल्यानंतर हे लोकं फसवणूक करतात. सेबीने सुमारे १७ शहरात ५० ठिकाणी छापेमारी करून अशी प्रकरणं समोर आणली आहेत.

फसवणुकीपासून असा करा बचाव

गेल्या ३० वर्षांपासून शेअर मार्केटमध्ये नजर ठेवणारे विनय कुमार मिश्र म्हणतात, तुम्हाला शेअर बाजारात आवड असेल तर बँकेत किंवा ब्रोकर्सशी संपर्क साधा. एसएसई-बीएसईच्या वेबसाईटवर सूचना अपडेट केल्या जातात. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना क्रास चेक केले पाहिजे. शेअर बाजारात जोखीम असली तरी सावधान असले पाहिजे.

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.