AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : रेल्वे रुळांच्या बाजूला पिवळ्या पाटीवर W/L वा ‘सी/फा’ का लिहीलेले असते ?

ट्रेन संबंधी माहीती नेहमीच लोकांना वाचायला आवडते. सर्वसामान्यांना रेल्वेचे माहीती व्हावी यासाठी रेल्वे संबंधी माहीती समाजमाध्यमावर नेहमीच व्हायरल केली जात असते. काय असतो अशा बोर्डाचा अर्थ पाहा...

GK : रेल्वे रुळांच्या बाजूला पिवळ्या पाटीवर W/L वा 'सी/फा' का लिहीलेले असते ?
Railway Board signs in india Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jul 01, 2024 | 1:16 PM
Share

मुंबई : भारतीय रेल्वेचे नेटवर्क जगातील चौथे सर्वात मोठे नेटवर्क मानले जाते. रेल्वेने दररोज अडीच कोटी भारतीय प्रवास करीत असतात. युरोपातील काही देशांची लोकसंख्या अडीच कोटी आहे. तेवढे प्रवासी रेल्वेतून दररोज प्रवास करीत असतात. भारतीय रेल्वेचा प्रवास जगात सर्वात स्वस्त आहे. हा प्रवास सबसिडीमुळे स्वस्त होतो. भारतीय रेल्वे त्यातून होणारा तोटा मालगाड्या चालवून भरुन काढण्याचा प्रयत्न करीत असते. ट्रेनच्या प्रवास रुळांच्या शेजारी पिवळ्या पाटीवर W/L वा ‘सी/फा’ का लिहीलेले असते. काय आहे त्याचा अर्थ पाहूयात …

रेल्वेची माहीती देणाऱ्या युट्युब चॅनल @RailwayJasoos वर अलिकडेच एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यात रेल्वेशी संबंधित अनेक महत्वाची माहीती दिली आहे. या व्हिडीओत ट्रॅकच्या शेजारी एक व्यक्ती उभी असलेली दिसत आहे. त्याच्या शेजारी एका लोखंडी खांबावर एक पिवळा बोर्ड लावलेला दिसत आहे. अशा प्रकारचे बोर्ड वारंवार आपल्याला रेल्वे प्रवासात दिसत असतात.

भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशाना अशा प्रकारचे पिवळ्या बोर्डांना पाहण्याची सवय झाली असेल, परंतू फारच कमी जणांना या पिवळ्या बोर्डावरील अक्षरांचा अर्थ माहिती असेल व्हिडीओत दिलेल्या माहीतीनूसार ‘सी/फा’ याचा अर्थ ‘सीटी’ आणि ‘फाटक’ नाही असा होतो. ‘W/L’ या इंग्रजीतील अद्याक्षरांचाअर्थ Whistle आणि Level Crossing असा होतो. हा बोर्ड ट्रेनच्या ड्रायव्हर अर्थात लोको पायलट यांच्यासाठी एक प्रकारचा संदेश असतो. याचा अर्थ ट्रेन जेव्हा येथे पोहचेल तेव्हा येथून ट्रेनचा हॉर्न वाजविण्यात यावी. सावधानता बाळगा पुढे एक रेल्वे फाटक येणार आहे. येथील फाटकावरील रुळ ओलांडणाऱ्या लोकांना हा एक प्रकारचा दिलेला संकेत आहे. त्यामुळे ट्रेन येत असल्याने लोकांनी सावध व्हावे रुळ ओलांडू नयेत यासाठी दिलेला हा संकेत असतो.

पिवळ्या ब्राईट रंगाचा वापर होतो

अशा प्रकारचे बोर्ड नेहमीच पिवळ्या रंगांनी रंगविलेले असतात. हा पिवळा रंग खूपच ब्राईट असतो. त्यामुळे लोको पायलटना लांबूनही तो सहज ओळखता येतो. या पिवळ्या  साईन बोर्डवर अक्षरे पाहीली की ट्रेनचे लोको पायलटना समजते की 250 मीटर असतावर रेल्वे फाटक आहे. त्यामुळे ते नागरिकांना सावध होण्यासाठी ट्रेनचा हॉर्न जोराने वाजतात.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.