गुगल पेमधून अवघ्या 1 मिनिटात मिळणार 25 हजार रुपयांचं कर्ज! जाणून घ्या कसे

गुगल पेच्या मदतीने तुम्ही 25,000 रुपयांपासून ते 1 लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन सहज मिळवू शकता.

गुगल पेमधून अवघ्या 1 मिनिटात मिळणार 25 हजार रुपयांचं कर्ज! जाणून घ्या कसे
Follow us
| Updated on: Nov 28, 2024 | 5:05 PM

आजच्या डिजिटल इंडियामुळे प्रत्येकाच्या फोनमध्ये आता फोन पे आणि गुगल पे आलेलं आहे. यामुळे तुम्ही केव्हाही ऑनलाईन शॉपिंग करू शकता. तसेच तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करून वस्तू खरेदी करू शकता. त्यामुळे व्यवहार देखील सोयीचे आणि सुरक्षित झाले आहे. अश्यातच आता गुगल पेच्या मदतीने तुम्ही 25,000 रुपयांपासून ते 1 लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन सहज मिळवू शकता. गुगल पेने विविध बँका आणि वित्तीय संस्थांशी भागीदारी केली असून, ही प्रक्रिया सोपी आणि जलद झाली आहे. जाणून घ्या कश्या पद्धतीने लोन मिळवता येईल.

1. गुगल पे ॲप अपडेट करा:

सर्वप्रथम, आपले गुगल पे ॲप नवीनतम आवृत्तीवर अपडेट करा.

2. कर्जाचे पर्याय शोधा:

ॲप ओपन करा आणि “लोन” किंवा “फायनान्स” विभागात जा.

तुमच्या खात्यासाठी कर्जाचा पर्याय उपलब्ध असेल तर तो तिथे दिसेल.

3. कर्जाची रक्कम निवडा:

तुमच्या गरजेनुसार 25,000 ते 1,00,000 रुपयांदरम्यान रक्कम निवडा.

4. केवायसी प्रक्रिया पूर्ण करा:

आता समोर दिलेल्या भागात आधार कार्ड आणि पॅन कार्डची माहिती भरा.

५. कर्ज मंजुरी :

आपल्या सिबिल स्कोअर आणि उत्पन्नाच्या पुष्टीच्या आधारे कर्ज मंजूर केले जाईल.

मंजुरीनंतर कर्जाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात वर्ग होईल.

६. ईएमआय पर्याय निवडा:

कर्जाची परतफेड करण्यासाठी ईएमआय कालावधी (3 महिने ते 36 महिन्यांपर्यंत) निवडा.

कर्ज घेण्याच्या अटी :

तुम्हाला जर कर्ज हवे असल्यास तुमचे वय २१ ते ६० वर्षे असणे गरजेचे आहे.

त्यातच तुमचा बँकेचा सिबिल स्कोअर (650 किंवा त्यापेक्षा जास्त) चांगला असणे आवश्यक आहे.

हे ही लक्षात ठेवा की गुगल पेशी जोडलेले सक्रिय बँक खाते आवश्यक आहे.

फायदे

कर्जाच्या अर्जापासून रक्कम प्राप्त करण्यापर्यंत सर्व काही डिजिटल आणि झटपट प्रक्रिया केली जाते.

कागदोपत्री अडचण नाही : फक्त आधार आणि पॅनआवश्यक आहे.

तुमच्या सोयीनुसार ईएमआय निवडता येईल.

सतर्कता

व्याजदर वेगवेगळे असू शकतात, म्हणून अर्ज करण्यापूर्वी अटी काळजीपूर्वक वाचा.

ईएमआय वेळेवर भरा, जेणेकरून तुमचा सिबिल स्कोअर खराब होणार नाही.

टीप: गुगल पेचे कर्ज पर्याय क्षेत्रानुसार उपलब्ध असू शकतात. जर ते आपल्या ॲपमध्ये दिसत नसेल तर ते सध्या तुमच्यासाठी उपलब्ध नसेल.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.