AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील या गावात फक्त ‘लव्ह मॅरेज’ होतात, तीन पिढ्यांची परंपरा; महाराष्ट्रापासून…

गुजरातच्या भाटपोर गावात 90% पेक्षा जास्त प्रेमविवाह होतात. तीन दशकांपासून चालत असलेली ही परंपरा गावाच्या संस्कृतीचा भाग बनली आहे. आईवडिलांचा आणि बुजुर्गांचा याला पूर्ण पाठिंबा आहे. स्वातंत्र्याने जोडीदार निवडण्याची आणि प्रेमावर आधारित नातेसंबंध निर्माण करण्याची ही एक अनोखी प्रथा आहे.

भारतातील या गावात फक्त 'लव्ह मॅरेज' होतात, तीन पिढ्यांची परंपरा; महाराष्ट्रापासून...
| Edited By: | Updated on: Feb 25, 2025 | 3:32 PM
Share

भारतीय समाजात लग्न ही एक पवित्र गोष्ट मानल्या जाते. खासकरून आईवडिलांच्या मर्जीने मुलांची लग्न लावण्याची प्रथा भारतात आहे. भारतात लव्ह मॅरेज होतात. पण ती प्रथा म्हणून अजूनही स्वीकारली गेली नाही. शिवाय लव्ह मॅरेजचं प्रमाण अत्यंत कमी आहे. पण महाराष्ट्रापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गुजरातमध्ये मात्र लव्ह मॅरेजची अनोखी प्रथा आहे. गुजरातच्या भाटपोर गावातील लोकांची विचारसरणी काही औरच आहे. या गावातील 90 टक्क्याहून अधिक लोक प्रेम विवाह करतात. लव्ह मॅरेजची ही परंपरा गेल्या तीन दशकापासून या गावात सुरू आहे. लव्ह मॅरेजचं गाव म्हणूनच हे गाव संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे.

भाटपोर गाव सुरतच्या जवळ आहे. या ठिकाणी जवळपास 90 टक्के विवाह गावातच होतात. या गावातील लोक आपला जीवनसाथी स्वत: निवडतात. जोडीदार निवडीचं हे स्वातंत्र्य या गावालाही मान्य आहे. गावातील तरुण आपल्या कुटुंबाच्या सहमतीने विवाह करतात. विशेष म्हणजे या लव्ह मॅरेजच्या परंपरेला गावातील बुजुर्गांचाही पाठिंबा असतो. कुठूनही विरोधाचा सूर येत नाही. कारण या गावातील आजी-आजोबांनीही लव्ह मॅरेज केलेलं आहे. त्याममुळे त्यांना लव्ह मॅरेजबद्दल काहीच वावगं वाटत नाही.

गावातल्या गावातच सोयरीक

लव्ह मॅरेजची ही परंपरा गावातील अनेक पिढ्यांपासून सुरू आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, आपल्याच गावातील मुला मुलींना गावातच प्रेम विवाह करण्याची आमच्या गावची परंपरा आहे. ही परंपरा आजकालची नाही. गेल्या दोन तीन पिढ्यांपासूनची ही परंपरा आहे. आम्हाला या परंपरेचा अभिमान आहे. गावातील बुजुर्गही या परंपरेला पूर्ण पाठिंबा देत आहेत. ही पंरपरा निव्वळ परंपरा नाही, तर ही आमच्या गावची ओळख आहे, असं या गावातील बुजुर्गांचं म्हणणं आहे. तसेच या गावातील लोक गावाच्या बाहेर लग्न करत नाही. म्हणजे बाहेरच्या गावातील मुला किंवा मुलीशी लग्न करत नाहीत. आपल्याच गावातील मुला, मुलींशी विवाह करतात.

ट्रेंड नाही, परंपरा

भाटपोर गावातील लव्ह मॅरेज हा एक ट्रेंड नाहीये. ही एक परंपरा बनललेली आहे. प्रेमातून निर्माण झालेलं नातं अत्यंत मजबूत असतं असं या गावातील लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळेच या गावातील लोक आपला जीवन साथी स्वत: निवडतात. या गावातील होणारी लग्नही इतर गावांपेक्षा वेगळीच असतात. कारण लव्ह मॅरेजच्या निर्णयात घरातील लोक हस्तक्षेप करत नाही. त्यांना तशी गरजही पडत नाही.

या शिवाय गावातील लोक नात्याला पूर्णपणे स्वतंत्रपणे पाहतात. मुलगा आणि मुलगी जर एकमेकांना पसंत करत असतील तर ते लग्न करण्यासाठी स्वतंत्र आहेत, असं कुटुंबाचं म्हणणं असतं. या गावातील बुजुर्ग सुद्धा आपली मुलं आणि नातवांच्या निर्णयावर विश्वास ठेवतात. त्यामुळेच नाती मजबूत असतात. परिणामी घटस्फोट घेण्याचं आणि महिलांवरील अत्याचाराचं प्रमाणही अत्यंत कमी आहे.

भारतात सर्वाधिक लोक अरेंज मॅरेजवर विश्वास ठेवतात. अरेंज मॅरेज त्यांना योग्य वाटतं. पण भाटपोर गावातील उदाहरण वेगळंच आहे. या गावातील पंरपरा आणि संस्कृती जरा हटकेच आहे. गावातील लोक ही परंपरा अभिमानाने निभावत असतात. तसेच येणाऱ्या पिढ्यांनाही या परंपरेत प्रोत्साहन देतात.

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.