AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी, ते प्रकरण भोवले, नवनीत राणा यांना कोर्टाची नोटिस

नवनीत राणा 2019 मध्ये अमरावतीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने खासदारकीची निवडणूक लढवून खासदार बनल्या होत्या. त्यानंतर अचानक त्यांनी भाजपासाठी काम करणे सुरु केले होते. नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्याने महाविकास आघाडी सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात मोहिमच उघडली होती.

मोठी बातमी, ते प्रकरण भोवले, नवनीत राणा यांना कोर्टाची नोटिस
avneet rana has court summon
| Updated on: Feb 22, 2025 | 11:10 PM
Share

भाजपाच्या नेत्या, अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना कोर्टाने नोटिस धाडली असून येत्या २८ फेब्रुवारी रोजी कोर्टात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. हैदराबादमध्ये एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना धमकी दिल्या प्रकरणात नवनीत राणा यांना कोर्टाने ही नोटिस बजावली आहे. नवनीत राणा यांनी ओवैसी यांना एका भाषणात आव्हान देत त्यांनी धमकी दिली होती. याच प्रकरणात कोर्टाने ही नोटिस बजावली आहे.

अमरावतीतील भाजपाच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा निवडणूकीच्या दरम्यान ओवैसी भावांना आव्हान दिले होते. या प्रकरणी असदुद्दीन ओवैसी यांचे धाकटे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांनी लोकसभा दरम्यान १५ मिनिटांसाठी पोलिस हटवा मग आम्ही दाखवतो. आम्ही काय करु शकतो ते ? असे वक्तव्य केले होते. या प्रकरणात हैदराबादमधील भाजपा उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी केलेल्या भाषणात भाजपाच्या नेत्या नवनीत राणा यांनी ओवैसी भावांना प्रत्युत्तर देताना त्यांचे नाव न घेता धाकटा भाऊ बोलतो की १५ मिनिटांसाठी पोलिसांना हटवा आणि मग आम्ही तुम्हाला दाखवू की आम्ही काय करतो ते पण मी म्हणते जर १५ सेकंदांसाठी पोलिसांना हटवले तर ओवैसी भावांचा पत्ता देखील लागणार नाही ते कुठेन आले होते आणि कुठे गेले होते.

नवनीत राणा साल 2019 अपक्ष खासदार झाल्या

2019 मध्ये अमरावतीतून नवनीत राणा यांनी शरद पवार यांच्या अखंड राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने खासदारकीची निवडणूक लढवून त्या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर अचानक त्यांनी भाजपासाठी काम करणे सुरु केले होते. आमदार रवी राणा यांचा स्वत:चा पक्ष आहे हे परंतू महाविकास आघाडीच्या काळात दोघा पती – पत्नी भाजपाच्या कळपात जाऊन तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील कलानगर या निवासस्थानी जाऊन हनुमान चालीसा म्हणण्याचे आंदोलन केले होते. त्यानंतर नवनीत राणा यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर बक्षिस म्हणून भाजपाने त्यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीवेळी भाजपात अधिकृत प्रवेश केला होता.

ओवैसी गेले 19 वर्षांपासून लागोपाठ हैदराबादचे खासदार म्हणून निवडून येत आहेत. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिममीन (AIMIM) पक्षाचे अध्यक्ष देखील आहेत. असदुद्दीन ओवैसी याने एक तास देण्याची घोषणा केली आहे.

नवनीत राणा यांच्या वक्तव्यानंतर असदुद्दीन ओवैसी आणि कांग्रेस पक्षाने भाजपा नेता नवनीत राणा यांच्यावर टीका केली होती.ओवैसी यांनी म्हटले होती की, “मी पंतप्रधान मोदींकडून 15 सेकंद,नव्हे एक तास देण्याची मागणी करतो, आम्हाला कोणतीही भीती नाही.आम्ही पाहू इच्छतो की मानवता किती शिल्लक राखली आहे.”

या संपूर्ण विवादानंतर, हैदराबाद कोर्टाने नवनीत राणा यांना नोटिस जारी केली आहे त्यांना 28 फेब्रुवारी रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आता ही कायदेशीर लढाई कुठल्या पातळीवर जाणार हे येणारा काळच ठरवणार आहे.

निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.