मुस्लीम देश असूनही या विमानतळाला दिले आहे हिंदूचे नाव, पाहा कुठला आहे तो देश?

अनेक जण भारतातून बाली येथे फिरायला जातात. बाली हे इंडोनेशियातील एक शहर आहे. पण तुम्हाला माहितीये की बाली येथील विमानतळाचे नाव हे गस्ती नागूर राय आंतरराष्ट्रीय विमानतळ असे आहे. या विमानतळावर विविध ठिकाणी हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती आहेत. इंडोनेशिया हा मुस्लीम देश आहे. 87 टक्के लोकसंख्या ही मुस्लीम आहे. येथे हिंदू फक्त 1.7 टक्के आहेत.  कोणाच्या […]

मुस्लीम देश असूनही या विमानतळाला दिले आहे हिंदूचे नाव, पाहा कुठला आहे तो देश?
airport
Follow us
| Updated on: Dec 26, 2023 | 6:14 PM

अनेक जण भारतातून बाली येथे फिरायला जातात. बाली हे इंडोनेशियातील एक शहर आहे. पण तुम्हाला माहितीये की बाली येथील विमानतळाचे नाव हे गस्ती नागूर राय आंतरराष्ट्रीय विमानतळ असे आहे. या विमानतळावर विविध ठिकाणी हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती आहेत. इंडोनेशिया हा मुस्लीम देश आहे. 87 टक्के लोकसंख्या ही मुस्लीम आहे. येथे हिंदू फक्त 1.7 टक्के आहेत.  कोणाच्या नावावरून विमानतळाला नाव देण्यात आले ते आपण जाणून घेऊयात.

कोण आहेत नगुराह राय

नगुराह राय यांचा जन्म येथेच झाला होत. नंतर ते सैन्यात भरती झाले. कर्नल पदापर्यंत पोहोचले. ते धर्माने हिंदू होते पण इंडोनेशियाला डचांच्या तावडीतून मुक्त करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. इंडोनेशियातील शूर सेनानी म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. देशात त्यांच्या नावाचे अनेक पुतळे असून त्यांच्या नावाचे टपाल तिकीटही काढण्यात आले आहे.

बालीच्या विमानतळावर सुबाहू यांचा पुतळा बसवला आहे. रामायणात सुबाहूचा उल्लेख आहे. तो लंकेचा राजा रावणाचा पुतण्या होता. तो एक राक्षस होता. रामायणानुसार विश्वामित्राच्या यज्ञाचे रक्षण करताना रामाने सुबाहूचा वध केला.

हे सुद्धा वाचा

बाली विमानतळावर ही भगवान विष्णू आणि त्यांच्या गरूणाची मूर्ती आहे. इंडोनेशियामध्ये भगवान विष्णूंची खूप पूजा केली जाते. तेथे त्यांची अनेक मंदिरे आहेत. 10 व 11 व्या शतकापर्यंत इंडोनेशियामध्ये हिंदू बहुसंख्य लोकसंख्या होती आणि राजेही हिंदूच होते, परंतु नंतर धर्मांतरानंतर हा देश मुस्लीम बहुसंख्य लोकसंख्येचा बनला.

बाली विमानतळावर विशाल हनुमानाची मूर्ती देखील आहे. ही मूर्ती प्रत्येकाचे लक्ष वेधून घेते. शिवाय येथे एक गरुड देखील आहे. जो भगवान विष्णूचे वाहन मानले जाते. इंडोनेशियातील बाली विमानतळावरही त्यांचा पुतळा ठळकपणे दिसतो. हिंदू मान्यतेनुसार गरुड हा पक्ष्यांचा राजा आणि भगवान विष्णूचे वाहन आहे. असे मानले जाते की गरुडाने भरत, श्री रामचा धाकटा भाऊ आणि राजा दशरथाचा दुसरा पुत्र म्हणून अवतार घेतला होता.

इंडोनेशियाची राजधानी बालीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बाहेर पडताच एका इमारतीवर भगवान विष्णूची भव्य मूर्ती स्थापित केलेली दिसते. एकेकाळी मलेशिया, इंडोनेशिया, मालदीव, कंबोडिया आणि थायलंडमध्ये हिंदू धर्म आणि संस्कृती होती, पण नंतर त्याची जागा बौद्ध किंवा मुस्लीम धर्माने घेतली, परंतु असे असूनही या सर्व देशांमध्ये हिंदू मंदिरे आणि संस्कृती आजही दिसून येतात.

भगवान विष्णू आणि गरुड यांची ही विशाल मूर्ती दुरूनच दिसते. विमानतळावरून बाहेर पडणारा कोणीही तो दुरून पाहू शकतो. सर्वांचे लक्ष वेधून घेणारा हा बाली विमानतळाच्या बाहेरच घटोत्कचाचा पुतळा आहे. घटोत्कच हा महाभारतातील पांडव योद्धा भीमाचा पुत्र होता, ज्याने कौरवांशी युद्धात हौतात्म्य पत्करले.

Non Stop LIVE Update
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.