Treasure in Ship : खुल जा सिम सिम! 360 वर्षांपूर्वी बुडालेल्या जहाजातून मिळाला मोठा खजिना

Treasure in Ship : 891 टन वजनाचे स्पॅनिश जहाज 4 जानेवारी 1656 साली बुडाले होते. या जहाजामध्ये अनेक अनमोल रत्नं आणि वस्तू होत्या, असा दावा करण्यात येत आहे. ॲलन एक्स्प्लोरेशनने एका अभियानाअंतर्गत समुद्रातून या जहाजातील काही अनमोल वस्तूंचा शोध घेतला आहे.

Treasure in Ship : खुल जा सिम सिम! 360 वर्षांपूर्वी बुडालेल्या जहाजातून मिळाला मोठा खजिना
खुल जा सिम सिम! 360 वर्षांपूर्वी बुडालेल्या जहाजातून मिळाला मोठा खजिना Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 4:45 PM

नवी दिल्ली : सुमारे 360 वर्षांपूर्वी स्पेनमधील (Spain) एक जहाज क्यूबा येथून सेव्हिल येथे जात होते. मात्र 4 जानेवारी 1656 साली साली ते जहाज बहामाज (Bahamas) येथील ‘लिटील बहामा बँक’ जवळ एका मोठ्या खडकावर आदळले. आणि अवघ्या अर्ध्या तासात त्या जहाजाला जलसमाधी (Ship sank) मिळाली. या जहाजामध्ये मोठ्या प्रमाणात खजिना (Treasure buried in Sea) होता. सध्या समुद्रात या खजिन्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. खजिन्याचा शोध घेणाऱ्या लोकांनी असा दावा केला आहे की, खजिन्यातील अनेक वस्तू अजूनही समुद्राच्या तळाशी असू शकतात. मात्र हे जहाज बुडून 360 वर्षांहून अधिक काळ उलटल्याने खजिन्याचा शोध घेणे आव्हानात्मक आहे. 891 टन वजनाचे हे जहाज बुडाल्यानंतर तर त्याचे अनेक भाग कित्येक किलोमीटरपर्यंत पसरले होते, असे मानले जाते. त्यावेळी या जहाजावर 650 प्रवासी होते, मात्र दुर्दैवाने त्यापैकी केवळ 45 प्रवाशांचाच जीव वाचू शकला. ‘न्यूयॉर्क पोस्ट’च्या रिपोर्टनुसार, या जहाजावर खजिन्याचे 35 लाख पीस ( तुकडे) होते. मात्र 1656 ते 1990 या काळादरम्यान त्यापैकी केवळ 8 पीसच शोधण्यात यश मिळाले.

ॲलन एक्स्प्लोरेशन (Allen Exploration) चे संस्थापक कार्ल ॲलन (Carl Allen) यांनी ‘फॉक्स न्यूज डिजीटल’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान हे जहाज आणि खजिन्याबद्दल माहिती शेअर केली. कार्ल यांनी सांगितले की, त्यांनी व त्यांच्या टीमने 2020 साली Walker’s Cay बेटाजवळ ( आयलंड ) खजिन्यातील या बहुमूल्य कलाकृतींचा शोध घेण्यास सुरुवात केली. हे बेट बहामासच्या उत्तरेकडे आहे. त्यासाठी हाय रेझोल्यूशनचे मॅग्नोमीटर्स, जीपीएस, मेटल डिटेक्टर यांचा वापर करण्यात आला.

कार्ल ॲलन यांच्या सांगण्यानुसार, 360 वर्पांपूर्वी बुडालेल्या या जहाजाचा शोध घेण्यासाठी त्यांनी बहामास सरकारकडून परवानगी घेतली होती. बहामासच्या उत्तरेकडे त्याचा शोध घेण्यासाठी ही परवानगी आवश्यक होती. शोधमोहिम सुरु झाल्यानंतर अनेक अभूतपूर्व गोष्टी, वस्तू समोर आल्या.

हे सुद्धा वाचा

सोन्याची व चांदीची नाणी सापडली

कार्ल ॲलन यांनी सांगितले की, जहाजाचा शोध घेत असताना नलम, पन्ना यांसारखी रत्नं, तोफा, चांदीची 3000 नाणी आणि सोन्याची 25 नाणी सापडली. चायनीज पोर्सलिन, लोखंडाची चेन तसेच चांदीच्या तलवारीचे हँडलही सापडले. त्याशिवाय चार पेंडंट्स, धार्मिक चिन्हेही मिळाली. 88 ग्रॅम वजनाची, सोन्याची एक भरभक्कम साखळीही या शोधमोहिमेदरम्यान सापडल्याचे त्यांनी नमूद केले.

समुद्रतळाशी सापडलेल्या या वस्तूंवरून, तेव्हाची माणसं कशा प्रकारच्या वस्तू वापरायची हे दिसून येते, असे ॲलन एक्स्प्लोरेशनचे संशोधक जिम सिंक्लेअर यांनी सांगितले. तर ॲलन एक्स्प्लोरेशनचे प्रवक्ते बिल स्पिंगर यांच्या सांगण्यानुसार, त्यांच्या संस्थेद्वारे शोधमोहिमेतील कोणत्याही वस्तूंची विक्री अथवा लिलाव करण्यात येत नाही. समुद्रतळाशी सापडलेल्या खजिन्यातील या वस्तू अनमोल असून ॲलन एक्स्प्लोरेशनच्या बहामास मॅरिटाइम म्युझिअमचा भाग असतील व तेथे प्रदर्शनातच ठेवण्यात येतील. हे म्युझिअम फ्रीपोर्ट ( Free Port) मधील Port Lucaya Marketplace येथे आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.