या देशात फक्त 40 मिनिटासाठी होतो सूर्यास्त
पृथ्वीवर असे काही देश आहेत जिथे दिवस असतो तेव्हा दीर्घ दिवस असतो आणि जेव्हा रात्र असते तेव्हा दीर्घ वेळ रात्रच असते.

पृथ्वीवर अशी अनेक ठिकाणे आहेत जी अतिशय मनोरंजक आहेत. प्रत्येक देशाचं आपापलं वैशिष्ट्य असतं. पृथ्वीवरील काही ठिकाणे इतकी गूढ आहेत की त्यांचा विचार करून तुमचं डोकं गोंधळून जाईल. आपल्याला माहितेय पृथ्वी स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याभोवती सुद्धा फिरते, ज्यामुळे वर्षे आणि दिवस आणि रात्र असतात. सर्वसाधारणपणे दिवस आणि रात्रीचा क्रम 24 तासांचा असतो, परंतु पृथ्वीवर असे काही देश आहेत जिथे दिवस असतो तेव्हा दीर्घ दिवस असतो आणि जेव्हा रात्र असते तेव्हा दीर्घ वेळ रात्रच असते. नॉर्वे हा त्यापैकीच एक देश आहे. नॉर्वेला कंट्री ऑफ मिडनाईट म्हणूनही ओळखले जाते.
नॉर्वे हा देश युरोप खंडाच्या उत्तरेस वसलेला आहे. नॉर्वे उत्तर ध्रुवाच्या सर्वात जवळ आहे. उत्तर ध्रुवाचा हा भाग सर्वात थंड आहे. नॉर्वे आर्क्टिक सर्कलमध्ये येतो इथे सुमारे अडीच महिन्यांत फक्त 40 मिनिटांची रात्र असते, म्हणजे सलग अडीच महिने दिवस असतो. नॉर्वेमध्ये रात्री 12:45 वाजता सूर्य मावळतो आणि 1:30वाजता पुन्हा उगवतो. म्हणजे सूर्य फक्त 30 मिनिटांसाठी मावळतो.
सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे 76 दिवस सलग दिवस असूनही इथे उष्णता नसते. नॉर्वेमध्ये आपल्याला उंच शिखरे दिसतील जी बऱ्याचदा बर्फाने झाकलेली असतात. नॉर्वे हे अतिशय सुंदर ठिकाण आहे, इथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की नॉर्वेचा जगातील अशा देशांमध्ये समावेश होतो ज्यांच्याकडे सर्वाधिक पैसा आहे. अंटार्क्टिकाबद्दल आपल्यापैकी बहुतेकांना माहित आहे, इथे फक्त दोनच ऋतू आहेत, पहिला म्हणजे हिवाळा आणि दुसरा उन्हाळा, कारण जेव्हा रात्र असते तेव्हा 6 महिने रात्र असते आणि जेव्हा दिवस असतो तेव्हा 6 महिने दिवस असतो.
