AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Train: ट्रेनची साखळी ओढल्याबरोबर ड्रायव्हर आणि गार्डला तो डब्बा कसा कळतो? कसे मिळते सिग्नल?

Train Chain Pulling: भारतीय रेल्वे प्रवासात अनेकदा अचानकच धावती रेल्वे मध्येच थांबते कारण काही जण रेल्वेची साखळी ओढतात. रेल्वेतील डब्यात काही घटना घडल्यास तात्काळ ही चेन ओढल्या जाते.परिणामी रेल्वे थांबते. पण साखळी ओढल्याबरोबर ड्रायव्हर आणि गार्डला तो डब्बा कसा कळतो?

Train: ट्रेनची साखळी ओढल्याबरोबर ड्रायव्हर आणि गार्डला तो डब्बा कसा कळतो? कसे मिळते सिग्नल?
| Updated on: Jul 25, 2026 | 4:51 PM
Share

Train Chain Pulling: भारतीय रेल्वेच्या डब्यात एक खास सोय असते. तुम्ही साखळी ओढून इमर्जन्सी ब्रेक लावू शकता. अर्थात आपात्कालीन स्थितीत ट्रेनमधील ही साखळी ओढता येते. विना कारण, अगदी महत्त्वाची घटना घडल्याशिवाय ट्रेन थांबवणे बेकायदेशीर मानले जाता. असे केल्यास शिक्षा पण मिळू शकते. चेन ओढताच, साखळी ओढताच इमर्जन्सी ब्रेक सिस्टम काम करते. धावती रेल्वे काही क्षणातच थांबते. पण साखळी ओढल्याबरोबर ड्रायव्हर आणि गार्डला तो डब्बा कसा कळतो? असा प्रश्न अनेकांना पडतो.

ड्रायव्हरला कळते तरी कसे?

भारतीय रेल्वेमध्ये प्रत्येक कोचमध्ये एक आपात्कालीन साखळी लावलेली असते. त्याचा वापर केवळ अत्यावश्यक स्थिती केली जाते. जेव्हा एखादा प्रवासी ट्रेनची चेन ओढतो. तेव्हा त्याचा ट्रेनच्या ब्रेकिंग सिस्टिमवर परिणाम होतो. ट्रेनचा वेग कमी होऊन जातो. रेल्वेतील साखळी खेचल्यानंतर ट्रेनच्या ब्रेक पाईपमध्ये हवेचा दबाव कमी होतो. त्याचे सिग्नल इंजिनपर्यंत पोहचते. ड्रायव्हरला दबाव कमी झाल्याचे जाणवते. त्याला त्यावेळी कोणत्या कोचमध्ये आपात्कालीन परिस्थिती उद्भवली आणि साखळी खेचण्यात आली हे कळते. ट्रेन थांबताच गार्ड प्रत्येक कोचमध्ये जातो. ज्या डब्ब्यात गार्ड जातात, तिथला ACP (Alarm Chain Pulling) इंडिकेटर सक्रिय होतो. त्यावरून रेल्वे कर्मचाऱ्याला याच डब्यातील साखळी ओढल्या गेल्याचे लक्षात येते.

नाहीतर दंडाचा फटका

जर विनाकारण रेल्वे डब्यातील साखळी ओढली, तर हे रेल्वे नियमाचे उल्लंघन मानल्या जाते. अशा प्रकरणात प्रवाशाला दंड लावल्या जाऊ शकतो. गरज पडल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येते. रेल्वे डब्यात आग लागल्यास, आरोग्यविषयक आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास, एखाद्या प्रवाशाचा जीव धोक्यात आल्यास अथवा गंभीर स्थिती उद्भवल्यास चेन ओढल्यास कारवाई होत नाही. पण जर विनाकारण रेल्वेची साखळी ओढल्यास इतर प्रवाशांना, दूरच्या प्रवाशांना नाहक त्रास होतो. त्यांचे वेळेचे नियोजन हुकते. काहींना मोठे नुकसान सहन करावे लागते. रेल्वेने विद्यार्थी, प्रवाशी, कर्मचारी, रुग्ण हे पण प्रवास करतात. त्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. अशावेळी ट्रेनची चेन ओढणाऱ्याला दंडाची शिक्षा होते.

Follow Us
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...