कसा नोंदवला जातो FIR? काय आहेत आपले हक्क? जाणून घ्या संपूर्ण माहिती…

कोणत्याही गुन्हेगारी घटनेचा कायदेशीररीत्या तपास करण्यासाठी एफआयआर (FIR) नोंदवणे ही पहिली पायरी आहे. एफआयआर नोंदवल्यानंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करतात. दंड प्रक्रिया संहिता, 1973मध्ये एफआयआरची संपूर्ण माहिती दिली आहे. अशा परिस्थितीत आपल्याला याबद्दल माहिती असणे महत्वाचे आहे.

कसा नोंदवला जातो FIR? काय आहेत आपले हक्क? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
एफआयआर
Follow us
| Updated on: Jun 28, 2021 | 12:39 PM

मुंबई : कोणत्याही गुन्हेगारी घटनेचा कायदेशीररीत्या तपास करण्यासाठी एफआयआर (FIR) नोंदवणे ही पहिली पायरी आहे. एफआयआर नोंदवल्यानंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करतात. परंतु, अशी काही प्रकरणे ऐकायला मिळाली आहेत की, पोलिसांनी एफआयआर नोंदवला नाही किंवा संबंधित कोणत्याही व्यक्तीने FIR नोंदवला नाही. दंड प्रक्रिया संहिता, 1973मध्ये एफआयआरची संपूर्ण माहिती दिली आहे. अशा परिस्थितीत आपल्याला याबद्दल माहिती असणे महत्वाचे आहे (Know details about FIR process who and how to file FIR).

एफआयआर (FIR) नोंदवण्याची प्रक्रिया काय आहे, हे आपल्याला माहित असले पाहिजे. यावेळी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल, यासंबंधी आपले काय अधिकार आहेत आणि पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यास नकार दिल्यास आपण काय करावे? या विषयी महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊया.

एफआयआर म्हणजे काय?

जेव्हा पोलिसांना एखाद्या गुन्ह्याबद्दल माहिती मिळते, त्यानंतर त्यांनी तयार केलेल्या प्रथम लेखी दस्तऐवजाला फर्स्‍ट इन्‍फॉर्मेशन रिपोर्ट अर्थात एफआयआर (FIR) म्हणतात. पोलिसांना एखाद्या घटनेची पहिली माहिती मिळते, तेव्हा एफआयआर हा त्याचा पहिला अहवाल असतो. हा सहसा पीडित व्यक्तीच्या तक्रारीनंतर लिहिलेला अहवाल असतो. कोणतीही व्यक्ती त्याच्यावर किंवा जवळच्या आणि प्रियजनांसोबत झालेल्या गुन्ह्याबद्दल पोलिसांत मौखिकरित्या किंवा लेखी तक्रार देऊ शकते. कॉलद्वारे देखील पोलिसांत तक्रार दाखल केली जाऊ शकते.

एका संज्ञेय गुन्ह्यात पोलिसांना एखाद्याला अटक करण्याचा अधिकार आहे. त्यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे अधिकारही दिले आहेत. यासाठी त्यांना कोर्टाची परवानगी घेण्याची गरज नाही. मात्र, अज्ञात गुन्ह्यामध्ये पोलिसांना ना कुठल्याही व्यक्तीला अटक करण्याचा अधिकार आहे आणि ना ते या खटल्याचा तपास करू शकतात.

एफआयआरचे महत्त्व काय?

कुठल्याही गुन्ह्यात किंवा घटनेच्या तपासासाठी एफआयआर (FIR) हा सर्वात महत्वाचा दस्तऐवज असतो, कारण त्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाते. एफआयआर लिहिल्यानंतरच पोलिस या प्रकरणाचा तपास सुरू करतात.

एफआयआर कोण दाखल करू शकतो?

एखाद्याला एखाद्या संज्ञेय घटनेची माहिती असल्यास, तो जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवू शकतो. ज्या व्यक्तीबरोबर ही घटना घडली आहे,  त्याच व्यक्तीने एफआयआर नोंदवणे आवश्यक आहे. एखाद्या पोलिस अधिकाऱ्याला एखाद्या संज्ञेय गुन्ह्याबद्दल माहिती मिळाल्यास, ते स्वत: देखील एफआयआर दाखल करू शकतात. आपल्यासोबत एखादी घटना घडली असेल, जर आपल्याला नकळत काही गुन्हा घडला असेल तर, किंवा या वेळी घटनास्थळी उपस्थित असेल, तर आपण एफआयआर दाखल करू शकता (Know details about FIR process who and how to file FIR).

एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया काय?

दंड प्रक्रिया संहिता, 1973च्या कलम 154मध्ये एफआयआर (FIR) नमूद केला आहे. जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या घटनेची / गुन्ह्यांची तोंडी माहिती देते, तेव्हा पोलिस ती लिहून घेतात. तक्रारदार किंवा माहिती देणाऱ्याला नागरिक म्हणून, आपण दिलेला मौखिक माहिती, पोलिसांना लिहून घेतल्यानंतर, पुन्हा वाचून दाखवण्याचा अधिकार आहे. आपण दिलेली माहिती पोलिसांनी लिहून काढल्यानंतर आपण त्यावर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे.

जर आपल्याला पोलिसांनी लिहिलेली माहिती योग्य आहे, आपले विधान किंवा तथ्ये तोड-फोड झालेली नाही, तरच त्यावर स्वाक्षरी करावी. ज्यांना लिहिता किंवा वाचता येत नाही, ते या अहवालावर अंगठा देखील लावू शकतात. एफआयआर नोंदवल्यानंतर त्याची प्रत अवश्य घ्यावी. एफआयआरची प्रत पूर्णपणे विनामूल्य मिळवणे, हा आपला अधिकार आहे.

एफआयआरमध्ये कोणत्या प्रकारची माहिती द्यावी?

एफआयआरमध्ये आपले नाव, पत्ता, तारीख, वेळ, रिपोर्ट देण्याचे ठिकाण इत्यादीबद्दल माहिती असलीच पाहिजे. घटनेची / गुन्ह्यांची खरी माहिती व त्यात तथ्य असणारी व्यक्तींची नावे व इतर माहिती तसेच काही प्रत्यक्षदर्शी असतील तर त्यांची माहितीही एफआयआरमध्ये द्यावी.

एफआयआर नोंदवताना आपण कोणतीही चुकीची माहिती सांगू नये किंवा वस्तुस्थिती बदल करून सांगू नये. असे केल्यास आपल्या विरूद्ध भारतीय दंड संहिता, 1860च्या कलम 203 अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. यात आपणास स्पष्ट माहिती नसलेले कोणतेही विधान असू नये.

जर आपला एफआयआर नोंदविला जात नसेल तर काय करावे?

जर आपला एफआयआर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवला जात नसेल, तर आपण पोलीस अधीक्षक (एसपी) किंवा त्याहून वरच्या पदाचे पोलीस उपनिरीक्षक (डीआयजी) आणि पोलिस महानिरीक्षक (आयजी) यांच्याकडे तक्रार दाखल करू शकता. आपण आपली तक्रार पोस्टाद्वारे या अधिकाऱ्यांना लेखी पाठवू शकता. ते त्यांच्या पातळीवरून या प्रकरणाची चौकशी करतील किंवा चौकशीचे निर्देश देतील. आपण इच्छित असल्यास, खाजगी स्तरावर कार्यक्षेत्रात येत असलेल्या न्यायालयात याबद्दल तक्रार करू शकता.

एफआयआर नोंदवूनही पोलीस या प्रकरणाचा तपास करु शकत नसतील तर?

आपण एफआयआर नोंदवल्यानंतर, जेव्हा प्रकरण फारसे गंभीर नसते तेव्हा पोलीस या प्रकरणाचा तपास करत नाहीत किंवा पोलिसांना वाटते की, या प्रकरणाची चौकशी करण्याचे कोणतेही पुरेसे कारण नाही. मात्र, यासाठी पोलीस या प्रकरणाची चौकशी का करत नाहीत, याची नोंद घ्यावी लागेल. त्यांनादेखील आपल्याला याबद्दल माहिती द्यावी लागेल.

(Know details about FIR process who and how to file FIR)

हेही वाचा :

प्रवासादरम्यान दिसणारे हिरव्या-पिवळ्या-पांढऱ्या रंगाचे मैलाचे दगड नेमकं काय सांगतात? जाणून घ्या या रंगांचा अर्थ!

बघता बघता गगनाला भिडले तेल, डाळ, मसाल्यांचे भाव! वर्षभरात अत्यावश्यक गोष्टींचे दर झाले दुप्पट!

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.