Fact Check : 18-40 वयोगटातील लाभार्थ्यांना केंद्राकडून वेतन? खात्यात 1800 रुपये?

Fact Check : 18-40 वयोगटातील लाभार्थ्यांना केंद्राकडून वेतन? खात्यात 1800 रुपये?
प्रातिनिधीक फोटो
Image Credit source: tv9

केंद्र सरकारच्या (CENTRAL GOVERNMENT) अखत्यारितील माध्यम संस्था पीआयबीने व्हायरल दाव्याचं तथ्यशोधन केलं आहे. संपूर्ण अर्ज बनावट असून सरकारद्वारे कोणत्याही प्रकारची पेन्शन दिली जात नसल्याचं पीआयबीनं स्पष्ट केलं आहे.

दादासाहेब कारंडे

|

May 03, 2022 | 10:35 PM

नवी दिल्लीसोशल मीडियावर प्रधानमंत्री (Pm Modi) मानधन योजनेच्या (PM MANDHAN YOJNA) संबंधित ऑनलाईन अर्ज व्हायरल होत आहे. अर्ज दाखल करणाऱ्या व्यक्तीला 1800 रुपये पेन्शन मिळणार असल्याचा दावा अर्जाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. योजनेसाठी पात्र होण्यासाठी वयाची मर्यादा 18-40 असल्याचे अर्जात म्हटलं आहे. अर्ज करण्यासाठी लिंक देण्यात आली आहे. लिंकवर क्लिक करण्याद्वारे अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या (CENTRAL GOVERNMENT) अखत्यारितील माध्यम संस्था पीआयबीने व्हायरल दाव्याचं तथ्यशोधन केलं आहे. संपूर्ण अर्ज बनावट असून सरकारद्वारे कोणत्याही प्रकारची पेन्शन दिली जात नसल्याचं पीआयबीनं स्पष्ट केलं आहे. पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेतून केवळ 60 वर्षांपुढील लाभार्थ्यांनाच पेन्शन दिली जाते. 18 ते 40 वयोगटातील लाभार्थ्यांना पेन्शन देण्याची कोणत्याही प्रकारची तरतूद नाही.

…तरतूदच नाही:

पीआयबीनं फॅक्ट चेकचे नावे स्वतंत्र ट्विटर हँडल देखील सुरू केले आहे. या ट्विटर हँडलच्या माध्यमातून प्रधानमंत्री मानधन योजना अभियान अंतर्गत दावा करण्यात येत असलेल्या बाबी पूर्णपणे खोट्या आहेत. या योजनेअंतर्गत 18-40 वयोगटातील व्यक्तींना पेन्शनची कोणत्याही प्रकारची तरतूद नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

श्रम योगी मानधन योजना?

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत देशातील 42 कोटी मजुरांना लाभ मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. या योजनेत 18 ते ४० वर्षे वयोगटातील मजूर अर्ज करण्यासाठी पात्र ठरू शकतात. त्यांना 60 वर्षे वयापर्यंत प्रत्येक महिन्याला 55-200 रुपये हप्ता भरावा लागेल. वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यानंतर कामगारांना थेट निवृत्तीवेतनाचा लाभ सुरू होईल.

कसं कराल फॅक्ट चेक?

तुमच्याकडे अशाच स्वरुपाचे मेसेज येत असल्यास अशाप्रकारच्या मेसेजचे सत्य जाणून घेण्यासाठी फॅक्ट चेक करू शकता. तुम्हाला पीआयबीच्या माध्यमातून फॅक्ट चेकचा पर्याय उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला अधिकृत लिंक https://factcheck.pib.gov.in/ वर क्लिक करावे लागेल. यासोबतच तुम्ही व्हॉट्सअॅप नंबर +918799711259 किंवा ईमेल pibfactcheck@gmail.com यावर तथ्य शोधन करू शकतात.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें