गॅसऐवजी वीजेवर स्वयंपाक करणं स्वस्त, एकदा पाणी गरम केलं, तरी इतकी बचत

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 09, 2021 | 1:02 AM

एलपीजी गॅसच्या किमतीत वाढ झाल्यानं दिल्लीत गॅसपेक्षा वीजेच्या साधनांवर स्वयंपाक करणं स्वस्त झालंय. गॅसवर स्वयंपाक करण्यात अधिक खर्च होतोय.

गॅसऐवजी वीजेवर स्वयंपाक करणं स्वस्त, एकदा पाणी गरम केलं, तरी इतकी बचत
Follow us

मुंबई : नुकत्याच एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ झालीय. 1 जुलैपासून देशभरात नवे दर लागू झालेत. राजधानी दिल्लीत तर 25.50 रुपयांची वाढ झालीय. त्यामुळे एकूणच सर्वसामान्यांचं आर्थिक गणित कोलमडत असल्याचं दिसतंय. एलपीजी गॅसच्या किमतीत वाढ झाल्यानं दिल्लीत गॅसपेक्षा वीजेच्या साधनांवर स्वयंपाक करणं स्वस्त झालंय. गॅसवर स्वयंपाक करण्यात अधिक खर्च होतोय. तोच स्वयंपाक वीजेवर चालणाऱ्या शेगडीवर गेला तर कमी खर्चात स्वयंपाक होतोय (LPG Gas cooking become expensive than electric due to price hike inflation).

दिल्लीत एलपीजी गॅसची किंमत वीजेपेक्षा अधिक झालीय. यात वर्ल्ड रिसोर्स इंस्टीट्यूटचे सहाय्यक संचालक दिपक श्रीरामकृष्णन यांच्या आकडेमोडीचा (Calculation) आधार घेण्यात आलाय. त्यानुसार एलीपीच्या तुलनेत इलेक्ट्रिक कुकिंग स्वस्त आहे, अशी माहिती बिजनेस स्टँडर्डच्या एका वृत्तात देण्यात आलीय.

इलेक्ट्रिक कुकिंग स्वस्त असल्याचं नेमकं गणित काय?

एलपीजी गॅस सिलेंडरने 10 लिटर पाणी गरम करण्यासाठी 10.15 रुपये खर्च येतो. दुसरीकडे इतकंच पाणी सारख्याच तापमानापर्यंत इलेक्ट्रिक स्टोव किंवा शेगडीवर तापवलं तर त्यासाठी 9.46 रुपये खर्च येतो. जर हे पाणी इंडक्शन स्टोवने पाणी गरम करण्याचा खर्च 8.33 रुपयेच येतो. केवळ 10 लिटर पाणी तापवण्यासाठी जर इतक्या खर्चाची तफावत असेल तर संपूर्ण स्वयंपाकासाठी किती बचत होईल याचा अंदाज येऊ शकतो.

इलेक्ट्रिक कुकिंगमध्ये इलेक्ट्रिक स्टोवपेक्षा जास्त बचत इंडक्शन स्टोवमध्ये होते. या आकडेमोडीत सिलिंडरच्या नव्या किमतींचा विचार करण्यात आलाय. तसेच वीजेचे दर 8 रुपये प्रती यूनिट गृहित धरले आहेत. त्यामुळे जर एखाद्या शहरात वीजदर 8 रुपयांपेक्षा अधिक असेल तर त्या शहरात एलपीजी सिलेंडरवरील कुकिंग स्वस्त पडू शकते. प्रत्येक राज्यातील सिलिंडर दर आणि वीजदर याप्रमाणे यात काही फरक होऊ शकतो. 1 जानेवारी ते 1 जुलै या काळात एलपीजी गॅसच्या किंमतीत 140 रुपयांची वाढ झालीय.

हेही वाचा :

इंधन दरवाढीविरोधात नागपुरात काँग्रेसची भर पावसात रॅली, नाना पटोले, सुनिल केदार यांच्यासह शेकडो लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते सहभागी

मोदी सरकारने आयातशुल्क घटवूनही बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर चढेच

घरगुती गॅस, इंधन दरवाढ, महागाई विरोधात राष्ट्रवादी आक्रमक, दोन दिवस राज्यव्यापी आंदोलन

व्हिडीओ पाहा :

LPG Gas cooking become expensive than electric due to price hike inflation

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI