AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Most Expensive School : 1 कोटी फी आणि शाही थाट, जगातील सर्वात महागडी शाळा कोणती ?

World Most Expensive School : जगभरात अनेक मोठ्या आणि महागड्या शाळा आहेत, पण जगात एक शाळा अशी आहे ज्याची फीच कोट्यावधी रुपयांची आहे.

World Most Expensive School : 1 कोटी फी आणि शाही थाट, जगातील सर्वात महागडी शाळा कोणती ?
जगातील सर्वात महागडी शाळा कोणती ?
| Updated on: Sep 06, 2025 | 11:24 AM
Share

आजच्या काळात शिक्षण फक्त ज्ञानापुरते मर्यादित राहिलेलं नाही, तर आज ते जीवनशैली आणि प्रतिष्ठेचे प्रतीकही बनलं आहे. आजच्या जगात अशा अनेक शाळा आहे ज्यांची फी खूप आहे, त्या महागड्याही आहेत. पण आज आपण अशा एका शाळेबद्दल जाणून घेणार आहोत ज्याची वार्षिक फी 1 कोटींपेक्षा जास्त आहे. अशा शाळेत नक्की काय शिकवतात, आणि एवढी फी घेण्यासारखं तिथे काय आहे, कोणत्या सुविधा आहेत, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना. चला जाणून घेऊया. स्वित्झर्लंडच्या रोले शहरात असलेली Institut Le Rosey हे जगातील सर्वात महागडे आणि प्रतिष्ठित बोर्डिंग स्कूल मानले जाते.

खरंतर या शाळेची स्थापना पॉल-एमिल कॉर्नेल यांनी 1880 साली केली होती. याला ‘स्कूल ऑफ किंग्ज’ असेही म्हणतात. शाळेच्या असाधारण इतिहासामुळे आणि प्रतिष्ठेमुळे, अनेक संस्थाने आणि देशांच्या राजघराण्यातील मुलांनी येथे शिक्षण घेतले आहे.

काय आहे वैशिष्ट्य ?

रिपोर्ट्सनुसार, स्वित्झर्लंडमधील या शाळेची वार्षिक फी सुमारे 1 कोटी 13 लाख, 73 हजार 789 रुपये इतकी आहे. म्हणजे वार्षिक फीच एक कोटीचा आकडा ओलांडते. विशेष म्हणजे या फीमध्ये निवास अर्थात राहण्याची सोय, जेवण, अभ्यास तसेच संगीत, खेळ, घोडेस्वारी यासारख्या अनेक अतिरिक्त ॲक्टिव्हिटीजचाही समावेश आहे.

या देशात जवळपास 60 देशांमधील एकूण 450 विद्यार्थी शिक्षण घेतात. तर त्यांना शिकवण्यासाठी जवळपास 120 शिक्षक शाळेने नियुक्त केले आहेत. म्हणजेच प्रत्येत 3 ते 4 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक आहे.

​Institut Le Rosey येथे मुलांना इंटरनॅशनल बॅकलॅरिएट (IB) आणि फ्रेंच बॅकलॅरिएट सारखे उत्कृष्ट अभ्यासक्रम मिळतात. आधुनिक क्लासरूम्स, भलमोठं क्रीडा संकुल, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट यासारख्या सुविधा उपलब्ध असून त्या विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासात मदत करतात.

विशेष म्हणजे ही शाळा उन्हाळ्यात रोले शहरात भरते तर आणि हिवाळ्यात गस्टाड या रिसॉर्टमध्ये मुलांचे शिक्षण सुरू असते. गस्टाड कॅम्पस विशेषतः स्नोबोर्डिंग, स्कीइंग आणि आइस हॉकीसारख्या हिवाळी खेळांसाठी प्रसिद्ध आहे.

अतिशय महागडी फी असूनही या शाळेची संपूर्ण जगात स्वतःची वेगळी ओळख आहे. दरवर्षी फक्त काही निवडक विद्यार्थ्यांनाच येथे प्रवेश मिळतो, ज्यामुळे शिक्षणाचा स्तर खूप उच्च राहतो.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.