पृथ्वीच्या एका भागात कसा पसरला अंधार, अंतराळ स्थानकातून NASA ने घेतलेल्या या फोटोचे रहस्य काय ?

डीप स्पेस क्लायमेट ऑब्जर्वेटरी ( DSCOVR ) वरील नासाच्या अर्थ पॉलीक्रोमॅटीक इमेजिंग कॅमेऱ्याने सुर्यग्रहणाच्या त्या क्षणाला अचूक टीपले आहे.

पृथ्वीच्या एका भागात कसा पसरला अंधार, अंतराळ स्थानकातून NASA ने घेतलेल्या या फोटोचे रहस्य काय ?
earth
Image Credit source: socialmedia
| Updated on: Oct 20, 2023 | 9:43 PM

नवी दिल्ली | 20 ऑक्टोबर 2023 : नासाच्या वातावरणाचा अभ्यास करणाऱ्या अंतराळ स्थानकाने तब्बल 15 लाख किमीवरुन पृथ्वीचा काढलेला एक फोटो सध्या खूपच चर्चेत आला आहे. या फोटोत पृथ्वीच्या एका कोपऱ्या काळी सावली पसरली आहे. वास्तविक हा फोटो एका खगोलीय घटनेचा आहे. गेल्या आठवड्यात सुर्यग्रहण लागले होते. या सुर्य ग्रहणात चंद्राने सुर्य बिंबाला पूर्ण झाकल्याने ‘रिंग ऑफ फायर’ हा खगोलीय चमत्कार पाहायला मिळाला. भारतीयांना हे सुर्यग्रहण पाहायला मिळाले नाही. तेव्हा सुर्य अमेरिका आणि कॅनाडाकडे पृथ्वीच्या दुसऱ्या बाजूला होता. त्यावेळी नासाच्या अंतराळ स्थानकाने हे छायाचित्र काढले आहे.

डीप स्पेस क्लायमेट ऑब्जर्वेटरी ( DSCOVR ) वरील नासाच्या अर्थ पॉलीक्रोमॅटीक इमेजिंग कॅमेऱ्याने सुर्यग्रहणाच्या त्या क्षणाला अचूक टीपले आहे. चंद्र आणि सुर्य एका सरळ रेषेत आल्याने पृथ्वीवर चंद्राची सावली पडली. 14 ऑक्टोबरला सुर्यग्रहणावेळी जेव्हा चंद्र सुर्याच्या समोरुन जात होता तेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडली आणि DSCOVR, NASA, NOAA आणि अमेरिकन वायू सेनेच्या संयुक्त उपग्रहाने पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किमीवरुन हा फोटो काढला आहे.

अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने आपल्या ट्वीटर ( एक्स ) अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. त्यात त्यांनी कॅप्शन लिहीली की वार्षिक सुर्यग्रहणाचा हा एक शानदार फोटो, सुमारे 15 लाख किमीवरुन चंद्राची सावली कि उपसावली टेक्सासच्या दक्षिण पूर्वी किनारी भागात पडलेली दिसत आहे. डीएससीओव्हीआर उपग्रहावरील ईपीआयसी उपकरणाने 14 ऑक्टोबरला हा फोटो काढला आहे.

येथे पाहा ट्वीट –

DSCOVR काय आहे ?

नासाच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनूसार DSCOVR हे एक अंतराळ हवामान स्थानक आहे. हे सौर हवेतील बदलांवर लक्ष ठेवते. हवामानातील बदल, भू-चुंबकीय वादळे याचे पूर्वअंदाज देते. ही चुंबकीय वादळामुळे वीजेचे ग्रीड, उपग्रह, दूरसंचार,विमानसेवा आणि जीपीएस यंत्रणा बंद पडू शकते.