AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

National Science Day 2024 : 28 फेब्रुवारीला का साजरा केला जातो राष्ट्रीय विज्ञान दिन, इतिहास आणि महत्त्व

सीव्ही रमण यांचा उत्कृष्ट शोध रमण इफेक्टबद्दल आणि हा शोध कसा लागला याबद्दल जाणून घेऊया. एकदा रमण लंडनहून भारतात येत असताना समुद्राचे निळे पाणी पाहून त्यांच्या मनात एक कुतूहल निर्माण झाले की हे पाणी निळे का आहे. त्यांनी भारतात येऊन यावर संशोधन केले...

National Science Day 2024 : 28 फेब्रुवारीला का साजरा केला जातो राष्ट्रीय विज्ञान दिन, इतिहास आणि महत्त्व
सीव्ही रमणImage Credit source: Social Media
| Updated on: Feb 27, 2024 | 7:45 PM
Share

मुंबई : महान भारतीय शास्त्रज्ञ डॉ. सी.व्ही. रमण (CV Raman) यांनी केलेल्या रामन प्रभावाचा शोध साजरा करण्यासाठी दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी देशात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. या दिवशी सर सीव्ही रामन यांनी रामन इफेक्टचा शोध जाहीर केला. दरवर्षी हा दिवस वेगळ्या थीमने साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे प्रेरित करणे आणि सर्वसामान्यांना विज्ञान आणि वैज्ञानिक कामगिरीची जाणीव करून देणे हा आहे. या दिवशी शाळा, महाविद्यालयांमध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात.

राष्ट्रीय विज्ञान दिन 2024 : या वर्षीची थीम

दरवर्षी हा दिवस थीमवर आधारित साजरा केला जातो. या वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन 2024 ची थीम ‘विकसित भारतासाठी भारतीय स्वदेशी तंत्रज्ञान’ अशी निश्चित करण्यात आली आहे. 1987 मध्ये प्रथमच तो साजरा करण्यात आला. 28 फेब्रुवारी हा दिवस आहे ज्या दिवशी जगप्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ सीव्ही रमण यांनी रमन इफेक्टचा (Raman Effect) शोध लावला होता. या शोधासाठी त्यांना 1930 मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले.

1986 मध्ये, सीव्ही रामन यांच्या या महान आविष्काराच्या सन्मानार्थ, भारत सरकारने ठरवले की दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जाईल. पहिला राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी 1987 रोजी साजरा करण्यात आला. या वर्षीची थीम केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केली होती.

राष्ट्रीय विज्ञान दिन 2024: रामन प्रभाव कसा शोधला गेला

सीव्ही रमण यांचा उत्कृष्ट शोध रमण इफेक्टबद्दल आणि हा शोध कसा लागला याबद्दल जाणून घेऊया. एकदा रमण लंडनहून भारतात येत असताना समुद्राचे निळे पाणी पाहून त्यांच्या मनात एक कुतूहल निर्माण झाले की हे पाणी निळे का आहे. त्यांनी भारतात येऊन यावर संशोधन केले. पारदर्शक पदार्थातून जाताना प्रकाशकिरणांमध्ये होणाऱ्या बदलाबाबत त्यांनी लावलेला महत्त्वाचा शोध रामन इफेक्ट म्हणून ओळखला जातो. प्रकाशाची किरणे जेव्हा वेगवेगळ्या वस्तूंवर आदळतात किंवा त्यांच्यातून जातात तेव्हा लहरींवर काय परिणाम होतो आणि विखुरल्यानंतर त्यांचा वेग काय असतो, हे सर्व त्यांच्या शोधाने सांगितले. रामन इफेक्टचा शोध आज जगभर वापरला जात आहे. 1954 मध्ये भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला. भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवणारे रमण हे भारतातीलच नव्हे तर आशियातील पहिले शास्त्रज्ञ होते.

सीव्ही रामन यांच्याशी संबंधित महत्त्वाची माहिती

  • सीव्ही रमण यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर वेंकट रमन होते.
  • त्यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1888 रोजी तामिळनाडूमध्ये झाला.
  • सीव्ही रमण यांनी प्रेसिडेन्सी कॉलेजमधून उच्च शिक्षण घेतले.
  • 1907 ते 1933 दरम्यान, कोलकाता येथील इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्समध्ये काम करताना त्यांनी भौतिकशास्त्राच्या क्षेत्रात महत्त्वाचे शोध लावले.
  • 1930 मध्ये त्यांना भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.