AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

न्यूड पार्टीत काय काय चालतं? नाच, नशा अन्…भारतात असा कारनामा केल्यास काय होतं?

सध्या सर्वत्र एका न्यूड पार्टीचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या पोस्टरवरुन मोठा वाद देखील झाला. पण न्यूड पार्टी म्हणजे नेमकं काय असतं? अशी पार्टी भारतात करण्याची खरच परवानगी आहे का? असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत. चला जाणून घेऊया...

न्यूड पार्टीत काय काय चालतं? नाच, नशा अन्…भारतात असा कारनामा केल्यास काय होतं?
Nude PartyImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Sep 27, 2025 | 1:21 PM
Share

नुकतेच छत्तीसगडच्या राजधानीत एका न्यूड पार्टीच्या पोस्टर प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत पाच आयोजकांना अटक केली आहे. या न्यूड पार्टीचे (Nude Party) पोस्टर सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून सतत व्हायरल होत आहे. यामुळे लोकांना याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. ही न्यूड पार्टी नेमकी काय असते आणि ती कशी आयोजित केली जाते? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तसेच अनेकांना यासंबंधी नियमही जाणून घ्यायचे आहेत. चला, जाणून घेऊया न्यूड पार्टीविषयी सविस्तर..

न्यूड पार्टी म्हणजे काय?

न्यूड पार्टी म्हणजे अनेक लोक एका ठिकाणी एकत्र जमतात. एका गटातील लोक खास जागी भेटतात आणि कोणीही कपडे घालत नाही. हे लोक निर्वस्त्र राहून त्या ठिकाणी वेळ घालवतात, ज्यामध्ये अनेक प्रकारच्या अॅक्टीविटी देखील होतात. असे म्हटले जाते की, अशा प्रकारे कपड्यांशिवाय एकमेकांना भेटणे म्हणजे नैसर्गिकरित्या मोकळेपणाचा अनुभव घेणे आहे. काही देशांमध्ये याला सामाजिक किंवा सांस्कृतिक अनुभव असेही म्हटले गेले आहे.

वाचा: रशिया, इस्रायल आणि इराण… जिथे-जिथे युद्ध झाले कंडोमची विक्री झपाट्याने वाढली, नेमके काय आहे कनेक्शन?

खरं तर, न्यूड पार्टीचा उद्देश आपल्या शरीराबद्दल सहजता आणि आत्मविश्वास वाढवणे हा असतो. लोक अशा पार्टीत यासाठी जातात की, ते कोणत्याही भीती, लाज, संकोच किंवा सामाजिक टीकेच्या दबावापासून मुक्त होऊन वेळ घालवू शकतात. काहींनी याला सामाजिक जोडणीचे साधन मानले आहे, तर काहींनी याला मानसिक आणि भावनिक स्वातंत्र्याचे नाव दिले आहे.

न्यूड पार्टीसाठी असलेले नियम

प्रत्येक न्यूड पार्टीसाठी काही नियम असतात, जेणेकरून त्यात सहभागी होणारे लोक सुरक्षित आणि बिनधास्त फिरु शकतील. येथे प्रत्येक सदस्य स्वेच्छेने येतो, कोणालाही दबाव टाकून आणलं जाऊ शकत नाही. येथे बाहेरील लोकांच्या प्रवेशावर निषेद असतो आणि पार्टीचं ठिकाणही खूप सुरक्षित व खाजगी असते. येथे सर्व सदस्य एकमेकांशी समान वर्तन करतात, कोणीही कोणाला पाहून टीका करू शकत नाही. येथे कॅमेरा, व्हिडीओग्राफी किंवा फोटोग्राफी पूर्णपणे बंदी असते.

भारतात अशा पार्ट्यांवर बंदी?

खरं पाहता, न्यूड पार्टीला समर्थन देणारे लोक याला मानसिक दबाव कमी करण्याचं साधन मानतात. अशी जागा जिथे तुम्ही सामाजिक आणि मानसिक दबावापासून मुक्त होऊन, कोणाच्याही टीकेच्या भयाशिवाय मोकळेपणाने जगू शकता. पाश्चिमात्य देशांमध्ये (Nude Party in Western Culture) अशा न्यूड पार्ट्या होतात, परंतु भारतात अशा प्रकारच्या पार्टीसाठी कोणत्याही प्रकारची परवानगी दिली जात नाही. त्यामुळे अशी पार्टी आयोजित करणाऱ्यांना छत्तीसगड येथील राजपूरमधून अटक करण्यात आली आहे.

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.