AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक किलो भुईमुगाच्या शेंगातून किती तेल मिळते? तब्बल..

बाजारात आपल्याला शेंगदान्याच्या तेलाच्या किमतीमध्ये बऱ्याचदा मोठा बदल दिसतो. बाजारात भुईमुगाच्या शेंगा 100 ते 130 रुपये किलो मिळत आहेत. एका किलो शेंगांमधून नक्की किती तेल निघते आणि त्याची नक्की प्रक्रिया काय आहे हे जाणून घेऊयात.

एक किलो भुईमुगाच्या शेंगातून किती तेल मिळते? तब्बल..
Peanut oil
| Updated on: Jul 15, 2026 | 6:47 AM
Share

बाजारात सध्या शेंगदाण्याच्या तेलाच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. त्यामध्येच इराण आणि अमेरिका युद्धात खाद्यतेलाचेही भाव वाढत आहेत. बाजारात भुईमुगाच्या शेंगा 100 ते 130 रुपये किलो मिळत आहेत. जर आपण भाजी मंडईत या शेंगा घेतल्या तर यापेक्षाही अधिक स्वस्त मिळतील. मात्र, या शेंग्यांपासून तयार केलेले तेल 400 ते 450 मिली लीटर आहे. पण मग बाजारात शेंगदाणा तेलाचे 250 मिलीलीटरचे पाकीट 50 ते 70 रुपयांना कसे विकले जाते? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी, शेंगदाण्यापासून तेल निर्मिती प्रक्रिया कशी केली जाते, हे जाणून घेणे आवश्यक आहे. चांगल्या शेंगा असतील तर त्याच्यातून 45 ते 50 टक्के तेल निघते. पण यंत्रामधून सर्वच तेल बाहेर येत नाही. लाकडी दाबयंत्र किंवा कोल्ड प्रेस पद्धतीतून 350 ते 420 मिलीलीटर तेल मिळते. एक्सपेलर पद्धतीतून 400-480 मिलीलीटर तेल मिळते.

तेल निघाल्यानंतर जी उरलेले पेंड असते ते जनावरांचे खाद्य किंवा सेंद्रिय खत म्हणूनही त्याचा वापर हा केला जातो.  शेंगदाण्याचे संपूर्ण मूल्य केवळ तेलातच नसते, त्याच्या टरफलातही असते. आपल्याला अनेक दुकानांमध्ये 50 ते 60 रुपयांना मिळणारे 250 मिली तेल पाहून धक्का बसतो. इतक्या कमी दरात तेल कसे विकले जाते. चला तर मग त्यामागील अगदी सोपी कारणे जाणून घेऊयात.

बाजारात विकली जाणारी सर्वच तेल शुद्ध असतात. कारखान्यांमध्ये या तेलाचे उत्पादन केले जाते. जास्त उत्पादन असेल तर प्रति लीटरवरील खर्च हा कमी होतो. तेल काढल्यानंतर त्याची पेंड विकली जाते, त्यातूनही पैसा मिळतो. त्यामुळे उत्पन्न ते फक्त तेलावरच अवलंबून नाही. मुळात म्हणजे मोठे कारखानदार थेट शेतकऱ्यांकडून भुईमुगाच्या शेंगा खरेदी करतात. ज्यामुळे स्वस्त मिळतात. हजारो टनाची खरेदी शेतकऱ्यांकडून शेंगांची केली जाते, ज्यामुळे कच्च्या मालाची किमत कमी राहते. जास्त विक्री आणि नफा कमी असला तरीही उत्पन्न वाढल्याने थेट नफा अधिक मिळतो. त्यामुळेच भावात तफावत असते.

लाकडी घाण्यातून तेल हळूहळू काढले जाते. त्याच्यावर रासायनिक शुद्धीकरण केले जात नाही, ज्यामुळे खर्च कमी होतो. एक किलो भुईमुगाच्या शेंगातून साधारणपणे 400 ते 450 मिलीलीटर तेल मिळते. बाजारात मिळणारे तेल शुद्धीकरण प्रक्रिया केलेले असते. लाकडी घाण्यातून काढलेले तेल खरे असते पण त्याचे प्रमाण कमी असते आणि खर्च अधिक असतो. त्यामुळे त्याची किमत अधिक असते. त्यामुळे बाजारात मिळणाऱ्या तेलांच्या भावात तफावत असते. कारखानदार शेतकऱ्यांकडून सरळ भुईमुगाच्या शेंगा खरेदी करतात.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे