Knowledge : हॉटेल,रेस्टॉरंट्समध्ये वेटर एका हातानेच का करतात सर्व्ह ? 99% लोकांना माहीत नसेल हे सीक्रेट
आपल्यापैकी अनेकांना प्रश्न पडला असेल की हॉटेलमधील वेटर एका हाताने जेवण का वाढतात. यामागे केवळ स्टाईल नसून व्यावसायिक शिष्टाचार, पाहुण्यांची सोय आणि स्वच्छतेची काळजी ही प्रमुख कारणे आहेत. आंतरराष्ट्रीय ट्रेनिंगचा भाग असलेल्या या पद्धतीमुळे अपघात टाळता येतात आणि हॉटेलची व्यावसायिक प्रतिमा जपली जाते.

आपल्यापैकी बहुतांश लोक हे कधी ना कधी चांगल्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले असतीलच. तिथे गेल्यावर, टेबलवर विराजमान झाल्यावर मेन्यूकार्ड पाहून जेवणाची किंवा खाण्याची ऑर्डर दिली जाते. थोड्या वेळाने तयार पदार्थ घेऊन वेटर किंवा वेट्रस टेबलजवळ येतात आणि एका हातानेच ती डिश सांभाळत सर्वही करतात. बहुतांश ठिकाणी वेटर्स एका हाताने जेवण सर्व करतात, पण हे असं का असतं असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का ? हे फक्त स्टाईलसाठी केलं जात नाही तर त्यामागे एक विशेष कारण असतं. अनेक प्रोफेशनल आणि व्यावहारिक कारणं आहे, ती जाणून घेऊया.
1. प्रोफेशनल एटीकेट आणि ट्रेनिंग
हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये, वेटरना उजव्या हाताने जेवण वाढण्याचे आणि डाव्या हाताने ट्रे किंवा प्लेट धरण्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. हे आंतरराष्ट्रीय सर्व्हिंग एटीकेट म्हणजेच शिष्टाचाराचा एक भाग आहे. यामुळे सर्व्हिंग प्रोसेस ही व्यवस्थित आणि आकर्षक दिसते, ज्यावरून हॉटेलची प्रोफेशनल इमेजही दिसते.
2. पाहुण्यांची सोय
बहुतांश लोकं हे उजव्या हाताने जेवतात. म्हणून वेटर डाव्या हाताने प्लेट धरतो आणि उजव्या हाताने वाढतो जेणेकरून पाहुण्यांना त्रास होऊ नये आणि टेबलावर पुरेशी जागा राहावी. पाहुण्यांना आराम आणि सुविधा मिळावी यासाठी ही पद्धत अवलंबली जाते.
3. बॅलेन्स आणि सुरक्षा
एका हाताने सर्व्ह करणे म्हणजे वेटरचा दुसरा हात मोकळा राहतो. यामुळे तो ट्रे बॅलेन्स करू शकतो आणि गरज पडल्यास तो पडण्यापासून रोखू शकतो. या पद्धतीमुळे अपघात कमी होतात आणि सर्व्ह करणे अधिक सुरक्षित होते.
4.स्वच्छतेची काळजी
दोन्ही हातांनी प्लेट धरताना बोटांचा अन्नाला स्पर्श होऊ शकतो. ज्यामुळे स्वच्छतेवर परिणाम होतो. एका हाताने सर्व्हिंग केल्याने हा धोका कमी होतो आणि स्वच्छता राखली जाते.
5. प्रोफेशनल इम्प्रेशन
एकहाती सर्व्हिंग करणं किंवा अन्न वाढणं, हे त्या हॉटेलची व्यावसायिकता आणि शिस्त दर्शवते. यामुळे पाहुण्यांना असे वाटते की सर्व्हिंग करणारा कर्मचारी प्रशिक्षित आहे आणि प्रत्येक टप्प्यावर नियमांचे पालन करतो. हे इंप्रेशन पडणं चांगले असते.
हॉटेल्समध्ये एका हाताने जेवण वाढणे हे केवळ स्टाईल स्टेटमेंट नाही तर सुरक्षितता, सुविधा, स्वच्छता आणि व्यावसायिक शिष्टाचाराचा एक भाग आहे. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये जाल आणि वेटरला अशा प्रकारे सेवा देताना पहाल तेव्हा समजून घ्या की ही एक विचारपूर्वक केलेली पद्धत आहे. जी ग्राहकांची सोय आणि हॉटेलची गुणवत्ता दोन्ही राखण्यासाठी अवलंबली जाते.
