Sniffer Dog : कुत्र्यांची वास घेण्याची क्षमता किती खोलवर असते? धारलीमध्ये गाडलेल्या लोकांना कसं शोधणार?
उत्तराखंडमधील उत्तरकाशीत ढगफुटीमुळे धारलीमध्ये हाहाकार माजला. आतापर्यंत 190 जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं आहे. मात्र अजूनही काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. अशा स्थितीत शोध मोहिमेत कुत्र्यांची मदत घेतली जात आहे. चला जाणून घेऊयात त्याच्या वास घेण्याच्या क्षमेतबाबत...

उत्तराखंडमधील उत्तरकाशीत अचानक झालेल्या ढगफुटीमुळे जीवितहानी झाली आहे. आतापर्यंत 190 जणांना या दुर्घटनेतून सुखरूपरित्या बाहेर काढलं आहे. दिवसागणिक मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. कारण गाव ढिगाऱ्याखाली गेलं आहे. त्यामुळे मृतांची संख्या अधिक असू शकते. बेपत्ता असलेल्यांना शोधण्यासाठी लष्कर, आयटीबीपी, एसडीआरएफ आणि स्थानिक लोक मदतीला उतरले आहे. या दरम्यान कुत्र्यांची देखील मदत घेतली जात आहे. यामुळे मृतदेह शोधण्यात मदत होणार आहे. स्निफर डॉगच्या मदतीने बेपत्ता लोकांना शोधणं सोपं जाणार आहे. कारण या कुत्र्यांची वास घेण्याची क्षमता अधिक आहे. मृतदेह शोधणाऱ्या कुत्र्यांना कॅडेव्हर डॉग म्हणतात. हवेत पसरलेला थोडासा वासाचा अंशदेखील त्यांना पुरेसा असतो. पण किती खोलवर कुत्रे वास घेऊ शकतात हा देखील प्रश्न आहे. त्यामुळे या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात
स्निफर डॉग इतके खास का आहेत?
स्निफर कुत्र्यांची वास घेण्याची क्षमता अधिक असते. त्यांना प्रशिक्षण देऊन अधिक सक्षम बनवलं जातं. कारण स्निफर कुत्र्यांमध्ये सुमारे 50 कोटी घाणेंद्रियाचे रिसेप्टर्स असतात. मानवाच्या तुलनेत अधिक असतात. मानवात सुमार 50 लाख घाणेंद्रियांचे रिसेप्टर्स असतात. म्हणजेच मानवाच्या तुलनेत त्यांची क्षमता दहा पट अधिक असते. त्यांची ही क्षमता ओळखूनच त्यांना प्रशिक्षित केलं जातं. त्यांना वेगवेगळे वास ओळखण्याचे प्रशिक्षण दिलं जातं. जसं की, कोकेनचा वास, मानवाचा वास वगैरे.. वास ओळखल्यानंतर लगेचच तिथे बसून पंजा मारून किंवा भुंकून इशारा करतात.
स्निपर कुत्र्यांना संशयास्पद ठिकाणी नेलं जातं. त्यानंतर परिचित वास आल्यानंतर ते विशेष संकेत देतात. मग उर्वरित टीम पुढचं पाऊल उचलते. साधारणत: मऊ मातील कुत्रे 5 ते 6 फूट खोलीपर्यंत मृतदेहाचा वास घेऊ शकतात. वाळू किंवा सैल माती आणि बर्फात हीच क्षमता 10 फुटापर्यंत असते. पाण्याच्या बाबतीत त्यांची वास घेण्याची क्षमता तितकी नसते. शोध श्वान पथकात जर्मन शेफर्ड, लॅब्राडोर, बेल्जियन मॅलिनॉइस आणि कॉकर स्पॅनियल जाती खूप सक्रिय, चपळ आणि बुद्धिमान मानल्या जातात.
