AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या आजुबाजूला नाहीये ना ही वनस्पती? जगातील सर्वात विषारी ‘सुसाईड प्लांट’; स्पर्श करताच माणूस थेट वेडा होतो

अशी एक वनस्पती आहे जिच्या स्पर्शाने माणूस ठार वेडा होतो. किंवा स्वत:हून मरणं पसंत करतो. या वनस्पतीचा स्पर्श म्हणजे अत्यंत धोकादायक असतो. कधी अशा पद्धतीची वनस्पती दिसली तर चुकूनही हात लावू नका.

तुमच्या आजुबाजूला नाहीये ना ही वनस्पती? जगातील सर्वात विषारी 'सुसाईड प्लांट'; स्पर्श करताच माणूस थेट वेडा होतो
| Updated on: Dec 22, 2024 | 2:55 PM
Share

या वनस्पतीला बघून असे वाटत नाही की ते इतके धोकादायक असू शकते, परंतु चुकूनही एखाद्याने स्पर्श केला की हे लक्षात येते. असे केल्याने, त्याचे विष माणसाला इतके सतावते की तो जवळजवळ वेडा होतो.

जगातील सर्वात विषारी वनस्पती

जगात अशा अनेक वनस्पती आहेत ज्या अत्यंत धोकादायक मानल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे ‘सुसाईड प्लांट’. हो, या नावाप्रमाणेच ही वनस्पती असून तिला स्पर्श करताच माणूस वेडा होऊ शकतो इतकं त्या वनस्पतीत विष असतं. ते विष माणसाला इतके सतावतं की त्याच्या डोक्यावर परिणाम होऊ शकतो.

‘सुसाईड प्लांट’ वनस्पती विशेषतः तिच्या विषारी प्रभावासाठी प्रसिद्ध आहे. जिम्पी जिम्पी असंही या वनस्पतीला म्हणतात. पण या बघून असे वाटत नाही की ते इतके धोकादायक असू शकतं., मात्र चुकूनही एखाद्याने स्पर्श केला तर त्याचे विष माणसाला इतके सतावते की तो जवळजवळ वेडा होतो असं म्हणतात.

ही वनस्पती कुठे आढळते?

या वनस्पतीचे वैज्ञानिक नाव डेंड्रोकनाइड मोरॉइड्स आहे. हे मुळात ऑस्ट्रेलियाच्या वर्षावनांमध्ये आढळते, परंतु याशिवाय काही पूर्व आशियाई देशांमध्येही ते आढळते. त्याची खास गोष्ट म्हणजे त्याची फक्त पानेच नाही तर त्याच्या फांद्या आणि देठांवरही बारीक तंतू किंवा सुईसारखे काटे असतात.

स्पर्श करता तेव्हा काय होते?

या वनस्पतीच्या कोणत्याही भागाला स्पर्श करणे म्हणजे ‘सुसाईड करण्यासारखचं आहे. त्या वनस्पतीवर असलेले सुयांसारखे तंतू किंवा काटे यांसारखे बारीक अत्यंत विषारी असतात जे थेट मेंदूवर परिणाम करतात आणि माणसाला वेडेपणापर्यंत नेऊ शकतात. त्यांना फक्त स्पर्श केल्याने, एखाद्या व्यक्तीला विजेचा मोठा धक्का बसल्यासारखे वाटते आणि कमीतकमी पुढील 20-30 मिनिटांसाठी तीक्ष्ण जळजळ जाणवते, परंतु ही वेदना अनेक दिवसांपासून ते महिने टिकू शकते.

माणूस मरत तर नाही पण…

या वनस्पतीला स्पर्श केल्याने माणूस मरत नाही पण त्याची अवस्था इतकी वाईट होते की तो त्रास सहन करण्यापेक्षा मरणे पसंत करतो. कारण शास्त्रज्ञांचे म्हणण्यानुसार विंचवाच्या नांगीप्रमाणे किंवा कोळ्याच्या विषाप्रमाणे माणसाला या वनस्पतीचा एक काटाही पुरेसा आहे. ते म्हणतात की हे विष सामान्य विष नसून एक न्यूरोटॉक्सिक विष आहे ज्याचा थेट मेंदूवर परिणाम होतो.

वनस्पतीचा इतिहास काय आहे?

एका रिपोर्टनुसार या वनस्पतीबद्दल अनेक कथा आहेत, असे म्हटले जाते की त्याच्या बारीक काट्यांचा प्रभाव 1866 मध्ये पहिल्यांदा पाहिला गेला जेव्हा त्याचा परिणाम रस्त्याच्या सर्वेक्षकाच्या घोड्यावर दिसून आला. यानंतर, दुसऱ्या महायुद्धात, एका सैनिकाने त्याला स्पर्श केला होता त्यानंतर त्याच्यावर कित्येक आठवडे उपचार केले गेले, परंतु शेवटी तो वेडा झाला आणि मरण पावला. दुसऱ्या एका घटनेत असे म्हटले आहे की, एका व्यक्तीने जंगलात या वनस्पतीच्या पानांचा टॉयलेट पेपर म्हणून वापर केला होता आणि शेवटी त्याच्या झालेल्या त्रासाला कंटाळून त्याने स्वतःवर गोळी झाडली.

या वनस्पतीचे काटे कसे कार्य करतात यावर संशोधन चालू आहे. ज्यामध्ये शास्त्रज्ञांना अधिक आकर्षित करते ते म्हणजे त्याच्या स्पर्शाचा प्रभाव किती महिने टिकतो?तज्ज्ञ म्हणतात की या वनस्पतीला देखील एक चांगला पैलू आहे. त्याच्या वेदनादायक विषाचे घटक वेदनाशामक किंवा ऍनेस्थेटिक्समध्ये रूपांतरित केले जाऊ शकतात. यापासून बनवलेले वेदनाशामक औषध दीर्घकाळ प्रभावी राहू शकते आणि अनेक उपचारांमध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो, असे शास्त्रज्ञांना वाटते.

पण सध्या तरी या वनस्पतीपासून सावध राहणेच कधीही चांगले. तसेच अशा वनस्पतींसारख्या अनेक वनस्पती असतील ज्यांच्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. त्यामुळे कोणत्याही अनोळखी ठिकाणी किंवा जंगल सफारीला वैगरे गेल्यावर कोणत्याही झाडाला, फुलांना स्पर्श करणे टाळणेच योग्य आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.)

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.