AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

118 वर्षानंतर कोणार्क मंदिराचे उघडतील गर्भद्वार, इतके वर्ष द्वार बंद होण्यामागे होते हे कारण…

Konark Temple History : कोणार्क मंदिर आज पुन्हा एकदा चर्चेत आले आहे यामागे कारण सुद्धा तसेच आहे. असे म्हटले जाते की, या मंदिरात जी माती ठेवली होती, ती मातीचे बाहेर काढली जाणार आहे.

118 वर्षानंतर कोणार्क मंदिराचे उघडतील गर्भद्वार, इतके वर्ष द्वार बंद होण्यामागे होते हे कारण...
कोणार्क सूर्य मंदिर, ओरिसा 13 व्या शतकातील सूर्य देवाला समर्पित मंदिर, कोणार्क सूर्य मंदिर हे एक आश्चर्य आहे. कलिंग आर्किटेक्चरल शैलीत बांधलेले हे मंदिर युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे, हे सूर्यमंदिर 24 चाकांच्या रथावर विराजमान आहे. हे ओडिशाच्या सर्वात महत्वाच्या प्राचीन स्थळांपैकी एक आहे.
| Edited By: | Updated on: Jan 06, 2022 | 10:16 PM
Share

ओडिशा येथील सुप्रसिद्ध कोणार्क सूर्य मंदिर आज (Konark Sun Templ) पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे, मीडिया रिपोर्ट नुसार कोणार्क मंदिर येथील जगमोहन किंवा मुखशाला परिसरात पुरण्यात आलेली माती सुरक्षितपणे काढण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (Archaeological Survey of India) यांच्या मते, 118 वर्षापूर्वी ब्रिटिशांनी या मंदिराला पडण्यापासून वाचवण्यासाठी मातीची भरणी केली होती. जर या परिसरातून या मातीला (Sun Temple Sand) बाहेर काढण्यात आले तर 100 वर्षांहून अधिक काळानंतर या मंदिरात असलेले जगमोहन मुखशाला आहे त्याचे द्वार उघडले जाईल.

हाती आलेल्या माहितीनुसार, सध्या पुरातत्त्व सर्वेक्षण संस्थेने(एएसआय) या बद्दलची प्रक्रिया करण्यास सुरुवात केली आहे आणि या पुढे हे मंदिर याच संस्थेच्या सुपूर्त करण्यात आले आहे. या प्रस्तावित कामासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे आणि लवकरच या मंदिराच्या परिसरात असलेले माती उकरण्याचे काम सुरू होईल.त्याच बरोबर अनेकांच्या मनात एक प्रश्न पडला असेल की नेमके असे काय कारण होते ज्यामुळे या परिसरात माती टाकण्यात आली तसेच ही माती कशी काढली जाईल व या मातीचे भविष्यात नेमके काय फायदे होतील या बद्दल जाणून घेणे गरजेचे आहे.

नेमका हा विषय काय आहे?.

इंडियन एक्स्प्रेस रिपोर्ट नुसार ,भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण ही संस्था ओडिशातील सूर्य मंदिराच्या आतील भागात असणारी माती अगदी सुरक्षितपणे बाहेर काढून टाकण्यासाठी एक रोडमॅप तयार करत आहे , या भागाला जगमोहन म्हणतात. हा या मंदिराचा मध्यवर्ती भाग आहे.आता तुम्हाला देखील असा प्रश्न पडला असेल की मंदिरातून माती बाहेर टाकणे हा विषय इतका गंभीर का आहे, खरतर अनेक वर्षांपूर्वी या मंदिर भग्न अवस्थेत गेले होते आणि हे मंदिर जमीनदोस्त होते की काय अशी शंका अनेकांच्या मनात येऊ लागली होती. मंदिर जमीनदोस्त होऊ नये म्हणुन या मंदिराला आधार देण्यासाठी मातीची भरणी करण्यात आली. कोणी केली होती मातीची भरणी…

या रिपोर्ट नुसारच 13 व्या शतकाच्या काळात जीर्णोद्धार झालेल्या या मंदिरात 1903 मध्ये मातीची भरणी करण्यात आली. लेफ्टनंट गव्हर्नर सर जॉन वुडबर्न यांनी 1900सालाच्या सुरुवातीला येथे भेट दिली होती त्यानंतर त्या काळातही या मंदिराची कीर्ती बरीच प्रसिद्ध होती. भारताच्या सर्वात भव्य इमारतींपैकी एक म्हणून या वास्तूची प्रसिध्दी घोषित करण्यात आली तसेच या भव्यतेचे वर्णन केले गेले होते. मंदिरात मातीची केली गेलेली भरणी बद्दल या सगळ्या घटनेवर आधारित अनेक वेगवगळे रिपोर्ट सुद्धा बनवले गेले. तसे पाहायला गेले तर हे मंदिर जमीनदोस्त होऊ नये तसेच याची कीर्ती लयाला जाऊ नये हा हेतू मनात ठेवून या मंदिरात मातीची भरणी केली गेली.

कश्या पद्धतीने करण्यात आली होती ही भरणी..

आपणास सांगू इच्छितो की,मंदिर ची संरचना की अगदी वेगळी आहे जर आपण प्रत्यक्ष जर पाहिले तर आपल्याला मंदिराचे फक्त गेट पाहायला मिळते आणि म्हणूनच मंदिराच्या आतील प्रत्येक रिकाम्या क्षेत्रात मातीची भरणी केली गेली जेणेकरून मंदिराचा कोणताही भाग पडून कोसळू नये.

काय आहे जगमोहन ?..

जर जगनमोहन बद्दल बोलायचे झाल्यास जगमोहन म्हणजे मंदिराच्या आतील सभामंडप होय. ओडिशा येथील हिंदू मंदिरात मधोमध एक हॉल असतो त्यालाच या भागात जगमोहन असे म्हणतात. खरेतर हे मंदिराचे प्रवेश द्वार आणि गर्भद्वार याच्यातील मधील जो परिसर असतो यालाच जगमोहन असे म्हटले जाते. हे मंदिर सुर्यदेवांना समर्पित केलेले आहे

.

मंदिराची ही आहेत काही ठळक वैशिष्ट्ये..

या मंदिरा बद्दल बोलायचे झाल्यास युनेस्कोच्या जागतिक वारसा संमेलनात 1884 मध्ये मंदिराचा समावेश करण्यात आला. या मंदिराच्या दोन्ही बाजूला 12 चाकांची रांग आहे. असे मानण्यात आले की हे 24 चाके आपल्या जीवनातील 24 तास दर्शवितात. अनेकदा आपण या एका चाकाचा फोटो 10 रुपयांच्या नोटमध्ये छापलेला पाहिला असेल. या मंदिराचे जिर्णोद्धार राजा नरसिंह देव यांनी केले होते. हे मंदिर त्याच्या शिल्पकलेसाठी व वास्तूशास्त्र मुळे जगभरात प्रसिद्ध आहे.

कथांच्या माध्यमातुन आले अनेकदा चर्चेत

अस म्हंटल जाते कि, 15 व्या शतकाच्या सुमारास मुस्लिम सैन्याने या मंदिरावर आक्रमण केले होते. त्यानंतर येथील पुजाऱ्यांनी सूर्यदेवतेची मूर्ती जगन्नाथ मंदिरात ठेवली. या मंदिराचा वरच्या बाजूला चुंबकीय दगड ठेवण्यात आलेला आहे ज्यामुळे समुद्रातून जाणारे कोणतेही जहाज या चुंबकीय दगडाच्या दिशेने आकर्षित होते. असेही म्हटले जाते कि, भिंतींचा समतोल राखण्यासाठी मंदिराच्या कळसावर चुंबक ठेवण्यात आले होते.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.