AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे आहे करोडपती शेतकऱ्यांचं गाव, नापीक जमिनीतून करतात कोट्यवधींची कमाई, श्रीमंती पाहून व्हाल थक्क

या गावात प्रत्येक शेतकरी आहे कोट्यवधींचा मालक. बंगला, महागड्या गाड्या. नापीक शेती असून देखील या गावातील शेतकरी करतो शेतातून कोट्यवधींची कमाई. नेमकी कशी? जाणून घ्या सविस्तर

हे आहे करोडपती शेतकऱ्यांचं गाव, नापीक जमिनीतून करतात कोट्यवधींची कमाई, श्रीमंती पाहून व्हाल थक्क
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 15, 2026 | 5:29 PM
Share

एकेकाळी नापीक आणि पाण्याच्या कमतरतेमुळे त्रस्त असलेली जमीन आज शेतकऱ्यांसाठी लाखो-कोट्यवधींच्या उत्पन्नाचा स्रोत बनली आहे. राजस्थानमधील गुढ़ा खुमावतन हे गाव आधुनिक शेती तंत्रज्ञानामुळे चर्चेत आले आहे. जयपूरजवळील जोबनेर तहसीलमध्ये असलेल्या या गावाला ‘मिनी इस्रायल’ म्हणून ओळखले जाते. येथे पॉलीहाऊसच्या मदतीने शेती करून अनेक शेतकरी चांगले उत्पन्न मिळवत असल्याचे सांगितले जाते.

या गावातील शेतकरी खेमाराम चौधरी यांनी 2012 मध्ये राजस्थान सरकारच्या माध्यमातून इस्रायलला भेट दिली होती. तेथे त्यांनी पॉलीहाऊसमधील संरक्षित शेतीचे तंत्रज्ञान शिकून घेतले आणि गावात परतल्यानंतर त्याचा वापर सुरू केला. सुरुवातीला एका पॉलीहाऊसमधून केलेल्या प्रयोगाला चांगले यश मिळाले. अवघ्या तीन महिन्यांत शिमला मिरचीच्या पिकातून १३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

त्यानंतर गावातील इतर शेतकऱ्यांनीही या तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यास सुरुवात केली. आज परिसरात अनेक पॉलीहाऊस उभारण्यात आले असून, शेतकरी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक पद्धतींचा वापर करत आहेत.

पाण्याची कमतरता असूनही शेतीत यश

या भागात पाण्याची मोठी समस्या आहे. भूगर्भातील पाणी खोलवर असून ते खारट असल्यामुळे शेतीसाठी त्याचा वापर करणे कठीण जाते. यावर उपाय म्हणून शेतकरी पावसाचे पाणी शेततळ्यांमध्ये साठवतात आणि ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पिकांना पाणी देतात.

या पद्धतीमुळे पाण्याचा काटकसरीने वापर करता येतो. पॉलीहाऊसमध्ये नियंत्रित वातावरणात शेती करता येत असल्याने प्रतिकूल हवामानाचा परिणामही कमी करण्यास मदत होते.

शिमला मिरची, काकडीच्या शेतीतून मोठा नफा

पॉलीहाऊसमध्ये शिमला मिरची, काकडी आणि इतर भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. हंगामाबाहेरही भाजीपाला पिकवून बाजारात विक्री करण्याची संधी शेतकऱ्यांना मिळते. त्यामुळे योग्य बाजारभाव मिळाल्यास उत्पन्नात वाढ होऊ शकते.

गावातील शेतकरी बाबूलाल यांच्याकडे नऊ पॉलीहाऊस असल्याचे सांगितले जाते. शेतीतून वर्षाला सुमारे एक कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत असून, त्यापैकी 40 ते 50 लाख रुपयांची बचत होत असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यांनी शेतीच्या उत्पन्नातून आलिशान फार्महाऊसही उभारले आहे.

उत्पन्नाच्या जोरावर घर आणि गाड्या

पॉलीहाऊस उभारण्यासाठी सरकारी अनुदानाची मदत मिळत असल्याने या पद्धतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. गावातील अनेक शेतकरी शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या जोरावर चांगली घरे आणि महागड्या गाड्या खरेदी करत असल्याचे सांगितले जाते.

Follow Us
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?