AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील 5 सर्वात मास्टरमाइंड साप, ताकदीपेक्षा बुद्धीने करतात हल्ला, क्षणात शत्रूला देतात चकवा

जगातील पाच सर्वात भयंकर साप, जे ताकदीपेक्षा बुद्धीने करतात शत्रूला गार, काही क्षणात चकवा देऊन होतात फरार.

जगातील 5 सर्वात मास्टरमाइंड साप, ताकदीपेक्षा बुद्धीने करतात हल्ला, क्षणात शत्रूला देतात चकवा
Image Credit source: Social media
| Updated on: Apr 07, 2026 | 4:52 PM
Share

जगभरात सापांना नेहमीच भीती आणि रहस्याचं प्रतीक मानलं जातं. साधारणपणे आपण सापांना त्यांच्या विषारी दंशासाठी ओळखतो पण काही प्रजाती अशाही आहेत ज्या ताकदीपेक्षा बुद्धीचा अधिक वापर करतात. हे ‘सुपर साप’ आपल्या जीवाचे रक्षण करण्यासाठी आश्चर्यकारक डावपेच वापरतात. कॅमोफ्लाज, मरण्याचं नाटक आणि अगदी हवेत घसरण्यासारख्या कौशल्यांचा देखील वापर ते करतात.

मृत असल्याचं नाटक करणारा साप

हॉगनोज साप हा साप स्वतःचा बचाव करण्यासाठी ‘थॅनाटोसिस’ नावाची युक्ती वापरतो. धोका जाणवल्यावर तो आधी कोब्रासारखा फणा काढून घाबरवतो. पण ते उपयोगी पडलं नाही तर तो उलटा पडतो, जीभ बाहेर काढतो आणि स्वतःला मृत दाखवतो. कधी कधी तो तोंडातून रक्तस्राव झाल्यासारखंही भासवतो. यामुळे शत्रू फसतो आणि त्याला सोडून जातो.

विष नसतानाही धोकादायक दिसणारा साप

स्कारलेट किंग साप हा साप विषारी नाही पण दिसायला अत्यंत धोकादायक कोरल साप सारखा असतो. याला ‘बेट्सियन मिमिक्री’ म्हणतात. फक्त दिसण्यामुळेच शत्रू त्याला घाबरून दूर पळतो.

शिकाराची धडधड ओळखणारा साप

बोआ कंस्ट्रिक्टर हा साप आपल्या शिकाराला पकडताना विशेष सेन्सरचा वापर करतो. तो शिकाराच्या हृदयाची धडधड ओळखतो आणि ती थांबेपर्यंत घट्ट पकडून ठेवतो. यामुळे तो कमी ऊर्जा वापरून शिकार करतो.

अंधारातही अचूक शिकार

रॅटल साप याच्या डोळे आणि नाकाच्या मध्ये ‘लोरेल पिट्स’ नावाचे अवयव असतात. हे थर्मल सेन्सरसारखं काम करतात. अगदी अंधारातही हा साप उष्णतेच्या आधारे शिकार अचूक ओळखतो.

डोळ्यांवर विष फेकणारा कोब्रा

स्पिटिंग कोब्रा हा साप आपल्या दातांमधून विष फवारतो. तो शत्रूच्या डोळ्यांचा अचूक निशाणा साधतो. विष डोळ्यांत गेल्यावर तीव्र जळजळ आणि काही वेळ अंधत्व येतं आणि तोपर्यंत साप सुरक्षित पळून जातो.

जगातील सर्वात लांब विषारी साप

किंग कोब्रा हा जगातील सर्वात लांब विषारी साप मानला जातो. तो जवळपास 5.85 मीटरपर्यंत वाढू शकतो. धोका जाणवल्यावर तो शरीराचा मोठा भाग उंचावून फणा काढतो आणि शत्रूला घाबरवतो. विशेष म्हणजे, तो थेट हल्ला करण्यापेक्षा आधी समोरच्याला इशारा देणं पसंत करतो.

(डिस्क्लेमर: ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित असून, प्रत्यक्ष परिस्थितीत सापांपासून सुरक्षित अंतर ठेवणे आणि तज्ञांची मदत घेणे आवश्यक आहे.)

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा