AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुरुषांसाठी खतरनाक आहेत हे खाद्यपदार्थ, जादा सेवनाने स्पर्म काऊंट घटते, अहवालात खुलासा

काही खाद्यपदार्थांमुळे पुरुषांना सर्वाधिक धोका निर्माण होत आहे. त्यामुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर थेट परिणाम होत आहे. आणि पुरुषांचे स्पर्म काऊंट आणि सेक्स हार्मोन्सवर वाईट परिणाम होत आहे.

पुरुषांसाठी खतरनाक आहेत हे खाद्यपदार्थ, जादा सेवनाने स्पर्म काऊंट घटते, अहवालात खुलासा
ultra-processed food
| Updated on: Aug 31, 2025 | 6:52 PM
Share

तुमचा आहार जर सकस असेल तर चांगल्या आरोग्याचे ते लक्षण आहे.आपण जे काही खातो त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होत असतो. आजकालचे काही खाद्य पदार्थ तुमचे आरोग्य बिघडवू शकतात. आपण अल्ट्रा प्रोसेस्ड फूड संदर्भात बोलत आहोत. हे फूड्स तसे तर सर्वांसाठीच योग्य नाहीत. परंतू त्यापासून पुरुषांना सर्वाधिक नुकसान होते. अलिकडे झालेल्या संशोधनात अल्ट्रा प्रोसेस्ड फूड पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर मोठा विपरित परिणाम करते. या फूड्सच्या जादा सेवनाने स्पर्म काऊंट कमी होण्याचा धोकाही असतो. अल्ट्रा -प्रोसेस्ड फूडच्या सेवनाने कमी प्रोसेस्ड डायट्सच्या तुलनेत अधिक वजन वाढते, मग भलेही त्यात कॅलरीचे प्रमाण समान असो.

अल्‍ट्रा प्रोसेस्‍ड फूडची चव चांगली असली तरी आरोग्यासाठी ते विषापेक्षा कमी नाही. एका स्टडीत खुलासा झाला आहे की अल्ट्रा प्रोसेस्ड फूड पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर वाईट परिणाम करते. यामुळे पुरुषांच्या लैंगिक आरोग्यावरही परिणाम होतो. जर्नल सेल मेटाबॉलिझ्मची स्टडीला इकॉनॉमिक्स टाईम्सने प्रसिद्ध केले आहे.

43 पुरुषांचे सर्वेक्षण

सर्वात योग्य डाटा प्राप्त करण्यासाठी संशोधकांनी 43 पुरुषांचा सर्वे केला आहे. ज्या पुरुषांच्या वय, वजन, लांबी, एक्टीव्हीटी लेव्हलनुसार अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड खाल्ले, त्यांचे वजन आणि बॉडी फॅट त्या लोकांच्या तुलनेत जास्त वाढले ज्यांनी हेल्दी फूड खाल्ले. यांच्या मेटाबॉलिक रेटवर देखील परिणाम झाला. या स्टडीसाठी 20 ते 35 वर्षांच्या वयाचे 43 हेल्दी पुरुषांचा समावेश केला. ज्यांनी तीन आठवड्यापर्यंत दोन्ही डाएट्सचे पालन केले. ज्यात तीन महिन्यांचे ‘वॉशआऊट’ अंतर होते.

रिसर्चमध्ये पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर वाईट परिणाम

अहवालाच्या मते त्यांनी दोन्ही गटात वाटात वाटले. एक गटाला तीन आठवड्यापर्यंत जास्त अल्ट्रा- प्रोसेस्ड फूड आणि तीन आठवड्यांपर्यंत अनप्रोसेस्ड फूड दिलेले आहेत. दुसऱ्या ग्रुपला गरजेपेक्षा 500 कॅलरी जादा हाय कॅलरी फूड खायला दिले. यात आश्चर्यचकीत खुलासा झाला. या दरम्यान पाहिले गेले की अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडचा परिणाम पुरुषांची प्रजनन क्षमतेवर पडला.

पुरुषांच्या फर्टिल‍िटीवर पडतो परिणाम –

स्टडीमध्ये असे आढळले की जास्त अल्ट्रा प्रोसेस्ड फूड खाल्ल्याने पुरुषांच्या स्पर्म काऊंट कमी होऊ शकते. यामुळे त्यांची फर्टीलिटीवर देखील असर पडतो. तर हाय -कॅलरी, अल्ट्रा-प्रोसेस्ड डाएट घेणारे पुरुषात फॉलिकल-स्टीमुलेटिंग हार्मोन (FSH)चे लेव्हल कमी आढळली, जे स्पर्म बनवण्यासाठी खूप गरजेचे असते.

अल्ट्रा -प्रोसेस्ड फूडचा सेक्स हार्मोन्सवरही परिणाम

यात पुरुषांत स्पर्म मोटिलिटी (sperm motility) देखील कमी झाली. असे म्हटले जाते की याचे कारण एक केमिकल cxMINP होऊ शकते. हे एंडोक्राइन डिसरप्टर्स (endocrine-disruptors) हार्मोन लेव्हल मध्ये मोठे बदल आणू शकते. यामुळे अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडने वजन वाढण्यासोबत सेक्स हार्मोन्सवरही वाईट परिणाम होतो.

राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट.
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद.
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ.