AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

I Love You नव्हे… हा शब्द म्हटल्याशिवाय नाही पडत चैन.. सर्वाधिक वेळा म्हटल्या जाणारा शब्द कोणता?

Most Frequently Used Words: जगातील सर्वाधिक वेळा म्हटल्या जाणारा शब्द कोणता आहे? I Love You हा शब्द सर्वाधिक वेळा म्हटल्या जात असेल असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचा अंदाज चुकला. जगात सर्वाधिक वेळा हा शब्द म्हटल्या जातो...

I Love You नव्हे... हा शब्द म्हटल्याशिवाय नाही पडत चैन.. सर्वाधिक वेळा म्हटल्या जाणारा शब्द कोणता?
OKImage Credit source: एजन्सी
| Updated on: May 16, 2026 | 3:54 PM
Share

Most Frequently Used Words: आपण दिवसभरात हजारो शब्द बोलतो. पण जगात सर्वाधिक वेळा म्हटल्या जाणारा शब्द कोणता आहे हे तुम्हाला माहिती आहे का? विशेष म्हणजे हा शब्द अनेक भाषेतील लोक अगदी सहजपणे म्हणून जातात. तो शब्द त्यांना त्यांचाच वाटतो. अर्थात हा शब्द कोणत्या जुन्या ग्रंथातील मंत्र नाही. या शब्दाची सुरुवात अगदी गंमतीत झाली होती. एका चुकीच्या स्पेलिंगमुळे हा शब्द सर्व भाषिक मर्यादा तोडून प्रत्येक संस्कृतीचा भाग झाला आहे. कोणता आहे तो जादुई शब्द?

जगातील सर्वात लोकप्रिय शब्द

जगात हजारो भाषा आणि बोलिभाषा आहेत. पण OK हा एक असा शब्द आहे जो सर्वांनाच एकत्र गुंफतो. तुम्हाला इंग्रजी भाषा अवगत नसली तरी हा सर्वाधिक वेळा म्हटल्या जाणारा शब्द आहे. जगात एकाच दिवशी अनेक देशात कोट्यवधी लोक या शब्दाचा वापर करतात. रोजच्या वापरात हा शब्द इतका मिसळल्या गेला आहे की त्याचे वेगळे अस्तित्वच आपण विसरले गेलो आहे.

गंमतीत म्हटल्या गेला नि आज सर्वांच्या तोंडी

OK या शब्दाचा जन्म एकदम सहज झाला. वर्ष 1839 मध्ये अमेरिकेतली बोस्टन शहरात या शब्दाची सुरुवात झाली. त्यावेळी पत्रकार आणि लेखकांच्या एका मंडळात गंमती जमती चालत असत. काही शब्दांचे चुकीचे स्पेलिंग लिहिण्याचा प्रघात त्यावेळी सुरू झाला होता. लोक अनेक शब्दांचे शॉर्ट कट करत असत. त्यावेळी ‘All Correct’ हा शब्द गंमतीत ‘Oll Korrect’ असा लिहिण्यात आला आणि त्याचा उच्चार ‘OK’ असा झाला.

सुरुवातीला कोणी छापला शब्द?

काही इतिहासतज्ज्ञांच्या मते OK हा शब्द सर्वात अगोदर सार्वजनिकरित्या ‘बोस्टन मॉर्निंग पोस्ट’ (Boston Morning Post) या वृत्तपत्राने छापला. 23 मार्च 1839 रोजी एका लेखात संपादकांनी ‘Oll Korrect’ चे संक्षिप्त रुप म्हणून ‘OK’ या शब्दाचा प्रयोग केला होता. त्यावेळी हा शब्द जगात इतका लोकप्रिय होईल असे कुणाला स्वप्नातही वाटले नव्हते. आज या शब्दाचे जगावर गारूड आहे. इंग्रजीचा गंध नसलेल्या व्यक्तीलाही हा शब्द माहिती आहे.

जगभर कसा पोहचला ओके?

1840 मध्ये अमेरिकेच्या राष्ट्रपतींची निवडणूक झाली. त्यावेळी राष्ट्रपती पदाचे उमेदवार मार्टिन वान ब्युरन यांचे टोपणनाव ओल्ड किंडरहूक (Old Kinderhook) असे होते. त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी नावाचं लघुरूप ‘OK’ असं केलं आणि मग घोषणा दिली ‘OK is OK’. राजकीय आखाड्यातून हा शब्द नंतर जगभरात पोहचला.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?