AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Traffic Rules : रस्त्यावर गाडी चालवताना ‘हे’ 9 नियम जरुर पाळा, अन्यथा भरावा लागेल जबर दंड !

रस्त्यावरून गाडी चालवताना नियमांचे पालन करणे अतिशय आवश्यक आहे. ट्रॅफिकच्या नियमांचे (Traffic Rules) पालन न केल्यास दंड तर भरावाच लागतो, मात्र नियमांकडे दुर्लक्ष केल्यास अपघातही होऊ शकतो.

Traffic Rules : रस्त्यावर गाडी चालवताना 'हे' 9 नियम जरुर पाळा, अन्यथा भरावा लागेल जबर दंड !
Image Credit source: social
| Updated on: Aug 07, 2022 | 11:28 AM
Share

भारतात ड्रायव्हिंगचे नियम (Driving rules) अतिशय कडक आहे. रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी नियम मोडल्यावर भरावी लागणारी दंडाची (Challan) रक्कमही पूर्वीपेक्षा वाढवण्यात आली आहे. त्यामुळे तरी लोकं वाहतुकीचे नियम पाळतील. ट्रॅफिकच्या नियमांचे पालन न केल्यास दंड तर भरावाच लागतो, मात्र नियमांकडे दुर्लक्ष केल्यास (accidents) अपघातही होऊ शकतो. हा अपघात कधीकधी जीवघेणाही ठरू शकतो. त्यामुळेच ड्रायव्हिंग करताना सर्व नियमांचे पालन करणे (follow these rules) अत्यंत महत्वपूर्ण आहे. सुरक्षितपणे प्रवास करण्याची इच्छा असेल तर ‘नियम पाळा, अपघात टाळा’ या उक्तीप्रमाणेच ड्रायव्हिंग करावे. स्वत:सोबतच इतरांच्या जीवाचाही विचार करावा. ड्रायव्हिंग करताना खाली दिलेल्या नियमांचे पालन अवश्य करा, अन्यथा जबर दंड भरावा लागू शकतो.

1) नेहमी सीटबेल्ट लावावा

कारमधून प्रवास करताना सीटबेल्ट लावणे हा सर्वात पहिला आणि महत्वपूर्ण नियम आहे. सीटबेल्टशिवाय प्रवास करणे दंडनीय अपराध आहे. तुम्ही कार ड्राइव्ह करत असाल किंवा बाजूला अथवा मागे बसला असाल, तर प्रवासात सीटबेल्ट लावणे गरजेचे असते. त्याशिवाय अपघात झाल्यास सीटबेल्टमुळे तुम्हाला कमीत कमी त्रास होतो आणि जीवही वाचतो. मोटार वाहन कायदा, कलम 138 (3) सीएमव्हीआर 177 एमव्हीए अंतर्गत कार चालवताना सीटबेल्ट न लावल्यास दंड भरावा लागतो.

2) गाडी चालवताना रस्त्यावर लक्ष ठेवावे

‘नजर हटी, दुर्घटना घटी’, असे म्हणतात. बऱ्याच वेळेस गाडी चालवताना आपले लक्ष रस्त्यावरून हटते किंवा आपण आपल्याच विचारात असतो. अशा वेळेस अपघात होण्याचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे गाडी चालवताना संपूर्ण लक्ष ड्रायव्हिंगवरच ठेवावे.

3) वेगमर्यादा पाळा

वाहन चालवताना एक विशिष्ट वेगमर्यादा पाळणे हे वाहनातून प्रवास करणाऱ्या व्यक्तींसोबतच रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही महत्वाचे असते. त्याशिवाय, कमी वाहतुकीच्या रस्त्यावरून वेगानने गाडी चालवल्यास गाडीवरील नियंत्रण गमावणे किंवा अचानक ब्रेक फेल होणे, यासारख्या गोष्टींमुळे दुर्घटनाही होऊ शकते.

4) ट्रॅफिक सिग्नलचे पालन करा

ट्रॅफिक सिग्नलचे पालन न केल्यासही दुर्घटना होऊ शकते. वाहनाचे नुकसान तर होतेच, पण त्यामधील प्रवाशांना शारीरिक इजाही होऊ शकते, कधीकधी हे जीवघेणेही ठरू शकते. त्यामुळे ट्रफिक नियमांचे पालन करावे.

5) मद्यपान करून गाडी चालवू नये

मद्यपान करून गाडी चालवल्यास अपघात होण्याची शक्यता वाढते. तसेच मोठा दंडही भरावा लागू शकतो.

6) गाडीची नियमितपमे देखभाल करा :

आपल्या गाडीची नियमितपणे देखभाल करणे, वेळोवेळी त्याचे सर्व्हिसिंग करणे महत्वाचे असते. खराब टायर्स बदलणे, तुटलेले हेडलाइट्स दुरुस्त करणे, साइड मिरर नीट करणे तसेच इंजिन ऑईल बदलणे, गरजेचे असते. अन्यथा दुर्घटना होऊ शकते.

7) आपल्या लेनमध्येच गाडी चालवा

भारतात रस्त्यांवरून लाखो गाड्या धावत असतात, त्यामुळे शिस्तीचे पालन करणे महत्वाचे आहे. गजबजलेल्या रस्त्यांवर लेन बदलून कधीही कार ओव्हरटेक करू नये. लेन बदलायची असेल तर न विसरता आधी सिग्नल द्यावा. अन्यथा तेही अपघाताचे कारण ठरू शकते.

8) सुरक्षित अंतर पाळा

गाडी चालवताना समोरच्या व आपल्या गाडीदरम्यान सुरक्षित अंतर पाळणे गरजेचे असते. समोरची गाडी अचानक थांबल्यास टक्कर होण्याची शक्यता असते. सुरक्षित अंतरामुळे हा धोका टळतो व प्रवाशांचा जीव वाचतो.

9) उजव्या बाजूने ओव्हरटेक करावे

भारतात राईट-हँड ड्रायव्हिंग पाळले जाते. त्यामुळे एखाद्या गाडीला ओव्हरटेक करायचे असल्यास, नेहमी उजव्या बाजूने करावे.

तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.