AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Analog Paneer : ॲनालॉग पनीर म्हणजे काय? महाराष्ट्रात तुकाराम मुंढेंनी का घातली बंदी? पनीर अस्सल की बनावट कसं ओळखावं?

Analog Paneer : एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्रात ॲनालॉग पनीवर वर्षभर बंदी घातली आहे. ॲनालॉग पनीर म्हणजे काय, ते कसं बनवलं जातं आणि आरोग्यावर त्याचे काय परिणाम होतात, याविषयी सविस्तर जाणून घ्या..

Analog Paneer : ॲनालॉग पनीर म्हणजे काय? महाराष्ट्रात तुकाराम मुंढेंनी का घातली बंदी? पनीर अस्सल की बनावट कसं ओळखावं?
पनीरImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 07, 2026 | 3:03 PM
Share

Analog Paneer : महाराष्ट्र सरकारने ॲनालॉग (नॉन डेअरी) पनीरचं उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर एका वर्षासाठी बंदी घातली आहे. या निर्णयानंतर ‘ॲनालॉग पनीर’ हे नाव तुफान चर्चेत आलं आहे. सर्वसामान्यांना पनीर तर माहितच आहे, पण हा ॲनालॉग पनीर काय प्रकार आहे, असा सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे. अनेकांनी ॲनालॉग पनीरबद्दल पहिल्यांदाच ऐकलं आहे आणि त्यांना प्रश्न पडला आहे की ते नक्की काय आहे? ॲनालॉग पनीर नकली आहे का, ते कसं बनवलं जातं आणि ते खाण्यासाठी सुरक्षित आहे का, असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील, तर हा लेख नक्की वाचा. ॲनालॉग पनीर म्हणजे काय, महाराष्ट्रात त्याबद्दल इतका टोकाचा निर्णय का घेण्यात आला आहे, हे सोप्या भाषेत समजून घ्या..

ॲनालॉग पनीर म्हणजे काय?

सर्वसामान्य पनीर हे दूधापासून बनवलं जातं, हे सर्वांनाच माहीत आहे. पण ॲनालॉग पनीर हे एक असं खाद्यपदार्थ आहे, जे दिसायला आणि चवीला अगदी पनीरसारखंच असतं, परंतु ते बनवण्याची प्रक्रिया पूर्णपणे वेगळी आहे. ॲनालॉग पनीर हे फक्त दूधापासून बनत नाही. त्यासाठी वनस्पती तेल, दूध पावडर, स्टार्च आणि इतर खाद्यसामग्रीचा वापर केला जातो. काही खाद्य उद्योग, रेस्टॉरंट्स आणि प्रोसेस्ड फूड बनवणाऱ्या कंपन्या खर्च कमी करण्यासाठी आणि एकाच प्रकारची गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी ॲनालॉग पनीरचा वापर करतात.

जिथे पारंपरिक पनीर हे दूध फाटल्यानंतर बनवलं जातं, तिथे ॲनालॉग पनीरमध्ये वनस्पतीजन्य चरबी, प्रोटीन, इमस्लिफायर, स्टार्च आणि फ्लेवरिंग एजंट्स मिळून पनीरसारखाच दिसणारा आणि चवीला असणारा पदार्थ बनवला जातो.

ॲनालॉग पनीर हे बनावट पनीर असतं का?

ॲनालॉग पनीर हे बनावट असेलच असं नाही. ठरलेल्या खाद्यमानकांनुसार जर ते बनवलं गेलं असेल आणि त्यावर त्याची अचूक माहिती दिली असेल तर त्याला बनावट किंवा अवैध म्हणता येणार नाही. पण ही गोष्ट जर पारंपरिक पनीर म्हणून विकली जात असेल तर ती खरी समस्या आहे. ॲनालॉग पनीरमध्ये जर प्रोसेस्ड फॅट, मीठ किंवा दुसरे एडिटिव्स अधिक प्रमाणात असतील, तर त्याचं वारंवार सेवन करणं आरोग्यासाठी चांगलं नाही. पण जर तेच खाद्यमानकांनुसार योग्य पद्धतीने बनवलं गेलं असेल तर ते सेवन करण्यास सुरक्षित असू शकतं.

महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर बंदी का?

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नियुक्तीनंतर महाराष्ट्रात कारवाईचा धडाकाच सुरू केला आहे. दुधातील भेसळ उघड केल्यानंतर आता त्यांनी ॲनालॉग पनीरवर वर्षभरासाठी बंदी आणली आहे. यामागचं कारण म्हणजे महाराष्ट्राच चाचणीदरम्यान अनेक नमुने निकृष्ट दर्जाचे आणि आरोग्यासाठी असुरक्षित असल्याचे आढळून आले. अनेक नमुन्यांमध्ये नैसर्गिक दुधाच्या फॅटऐवजी इतर दुग्धविरहित घटकांचा वापर केल्याचं चाचणीत निष्पन्न झालं. या ॲनालॉग पनीरच्या उत्पादनासाठी स्पष्ट खाद्यमानकं निश्चित केलेली नाहीत, असं विभागाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा विचार करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे अशा भेसळयुक्त उत्पादकांवर कठोर कारवाई करत असल्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

ॲनालॉग पनीर खाल्ल्याने काय होतं?

अस्सल पनीर हे दुधापासून बनवलं जातं. ज्यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन आणि आवश्यक पोषक तत्वे असतात. याउलट ॲनालॉग पनीरमध्ये दुधाची पोषक तत्त्वे कमी किंवा अजिबात नसतात. त्यामुळे शरीराला अपेक्षित फायदे मिळत नाहीत. काही ॲनालॉग पनीरमध्ये वनस्पती तेल किंवा इतर चरबीयुक्त पदार्थांचा वापर केला जातो. त्याचं अधिक प्रमाणात सेवन केल्यास कॅलरीज वाढू शकतात आणि वजन वाढण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. जर त्यात निकृष्ट दर्जाचं तेल किंवा जास्त प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट वापरलं असेल, तर दीर्घकाळ सेवन केल्यास हृदयाच्या आरोग्यासाठी ते चिंतेचं कारण ठरू शकतं.

अस्सल आणि ॲनालॉग पनीरमधील फरक कसा ओळखायचा?

  • अस्सल पनीरला सहसा दुधाळ सुगंध असतो आणि तो अत्यंत मऊ असतो.
  • ॲनालॉग पनीर थोडंफार रबरासारखं किंवा कमी मऊ असू शकतं.
  • पॅकबंद पनीर विकत घेताना लेबलवरील घटकपदार्थ नक्की वाचून घ्या.
  • फक्त विश्वासार्ह ब्रँड्स किंवा प्रमाणित दुकानांमधूनच पनीर खरेदी करा.

दुधातली भेसळ

तुकाराम मुंढे यांनी याआधी दूध भेसळीबाबतही धक्कादायक खुलासा केला होता. राज्यभरात मोठ्या प्रमाणात तपासणी मोहीम सुरू असून अनेक ठिकाणी भेसळयुक्त दूध आणि अन्नपदार्थांवर कारवाई केली जात आहे. तुकाराम मुंढे यांची एफडीएच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यापासून राज्यभरात दररोज वीसहून अधिक ठिकाणी तपासणी केली जाते. आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त करण्यात आला आहे. यात भेसळयुक्त दुधाचारी समावेश आहे. या तपासणीदरम्यान काही ठिकाणी दुधात स्किम्ड मिल्क पावडर, विविध रासायनिक द्रव्ये, इमल्सिफायर, कॉस्टिक सोडा, काही प्रकरणांमध्ये तर शॅम्पूसारखे पदार्थही आढळले आहेत. हे सर्व विशिष्ट प्रमाणात मिसळून दुधासारखा दिसणारा द्रव तयार केला जातो.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?