AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अफगाणिस्तानमध्ये निर्वासितांच्या सरकारची स्थापना, उत्तर प्रदेशात ज्यांच्या नावानं विद्यापीठ स्थापन होतेय ते राजा महेंद्र प्रताप सिंह नेमके कोण?

त्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने दोन वर्षांपूर्वी राजा महेंद्र प्रताप सिंह यांच्या नावाने अलीगढमध्ये राज्यस्तरीय विद्यापीठ उघडण्याची घोषणा केली होती. राज्य सरकार राज्यातील अलीगड जिल्ह्यात नवीन विद्यापीठ उघडेल, अशी घोषणा योगी आदित्यनाथ सरकारने सप्टेंबर 2019 मध्ये घोषणा केली होती.

अफगाणिस्तानमध्ये निर्वासितांच्या सरकारची स्थापना, उत्तर प्रदेशात ज्यांच्या नावानं विद्यापीठ स्थापन होतेय ते राजा महेंद्र प्रताप सिंह नेमके कोण?
राजा महेंद्र प्रताप सिंह
| Edited By: | Updated on: Sep 14, 2021 | 2:36 PM
Share

लखनऊ: उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने दोन वर्षांपूर्वी राजा महेंद्र प्रताप सिंह यांच्या नावाने अलीगढमध्ये राज्यस्तरीय विद्यापीठ उघडण्याची घोषणा केली होती. राज्य सरकार राज्यातील अलीगड जिल्ह्यात नवीन विद्यापीठ उघडेल, अशी घोषणा योगी आदित्यनाथ सरकारने सप्टेंबर 2019 मध्ये घोषणा केली होती. यूपी सरकारच्या घोषणेनंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीगढ येथील राजा महेंद्र प्रताप सिंह विद्यापीठाची पायाभरणी केली आहे. राजा महेंद्र प्रताप सिंह विद्यापीठाबाबत बोलताना भाजपच्या वतीनं ते देशातील ज्या लोकांना आदर देत आहेत, ज्यांच्याकडे इतर सरकारांनी दुर्लक्ष केले होते, असं सांगण्यात आलं आहे.

राजा महेंद्र प्रताप सिंह कोण होते?

ज्या राजाच्या नावाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अलीगढमध्ये विद्यापीठाची पायाभरणी करणार आहेत त्यांना अलीकडच्या काळाता फार कमी लोक ओळखतात. जाट समाजातील बहुसंख्य लोकांना राजा महेंद्र प्रताप सिंह यांच्या बद्दल माहिती आहे, जे जाट समाजातील होते. याशिवाय पश्चिम उत्तर प्रदेशातील लोकांना राजा महेंद्र प्रताप सिंह यांच्याबद्दल माहिती असल्याचं दिसून येतं. आता उत्तर प्रदेश राजा महेंद्र प्रताप सिहं यांच्या नावाने अलिगढमध्ये विद्यापीठ बांधणार आहे. त्या राजाबद्दल जाणून घेणे फार महत्वाचे झाले आहे.

अफगाणिस्तानमध्ये सरकारची स्थापना

राजा महेंद्र प्रताप सिंह यांचा जन्म 1886 मध्ये उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झाला. महेंद्र प्रताप सिंह यांना शिक्षणाची आवड होती, म्हणून त्यांनी शिक्षण घेतले. राजा महेंद्र प्रताप सिंह त्याकाळातील उच्चशिक्षित व्यक्ती होते. स्वातंत्र्यसैनिक म्हणून काम करणाऱ्या राजा महेंद्र प्रताप यांनी लेखक आणि पत्रकार म्हणूनही काम केले. पुढील काळात ते हाथरसच्या मुरसान संस्थानचे राजा झाला. महेंद्र प्रताप सिंह पहिल्या महायुद्धाच्या वेळी अफगाणिस्तानात गेले आणि तेथे त्यांनी भारताचे पहिले निर्वासित सरकार स्थापन केले. ते स्वतः अफगाणिस्तानातील भारतातील पहिल्या निर्वासित सरकारचे अध्यक्षही झाले होते.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारखं काम

महेंद्र प्रताप सिंह यांनी 1 डिसेंबर 1915 रोजी अफगाणिस्तानात निर्वासित पहिल्या सरकारची घोषणा केली. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, राजा महेंद्र प्रताप यांनीही आपल्या आयुष्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याप्रमाणेच काम केले. कामाच्या दृष्टिकोनातून पाहिलं असता महेंद्र प्रताप सिंह आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यात अनेक साम्य दिसून येतात. नेताजी काँग्रेस पक्षाचे सदस्य असले तरी महेंद्र प्रताप अधिकृतपणे काँग्रेसचे सदस्य नव्हते. राजा महेंद्र प्रताप सिंह सुमारे 32 वर्षे भारताबाहेर राहिले आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांच्या स्तरावर बरेच प्रयत्न केले. त्यांनी स्वातंत्र्यासाठी जर्मनी, रशिया आणि जपान कडून मदतीची याचना केली पण त्यांना या देशांकडून कोणतीही मदत मिळाली नाही.

काँग्रेस पक्षाकडून दुर्लक्षित

देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी महेंद्र प्रताप सिंह 1946 मध्ये भारतात परतले. भारतात परतल्यानंतर त्यांची वर्धा येथे महात्मा गांधींशी भेट झाली. पण त्यावेळी त्यांच्याकडे काँग्रेस पक्षात विशेष लक्ष दिले गेले नाही. मात्र, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते राजकारणात सक्रिय राहिले. 1979 मध्ये राजा महेंद्र प्रताप सिंह यांचं निधन झाले.

इतर बातम्या:

NEET UG 2021 : नीट परीक्षा यूजी परीक्षेच्या प्रवेशपत्रावर केंद्राचा चुकीचा उल्लेख, विद्यार्थ्यांना मनस्ताप

NEET UG 2021: नीट यूजी परीक्षेला आजपासून सुरुवात, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर

Who is Raja Mahendra Pratap Singh in whose name a university will be built in Aligarh Narendra Modi laid foundation today

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.