NEET 2021 Paper Leak : नीट परीक्षा पेपर लीक प्रकरण, 30 लाखांची डील, जयपूर पोलिसांकडून रॅकेट उद्धवस्त

नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून रविवारी देशभरात नीट यूजी परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. देशभरात विविध परीक्षा केंद्रावर नीट परीक्षा पार पडली. परीक्षा सुरु असतानाच प्रश्नपत्रिका लीक झाली होती.

NEET 2021 Paper Leak : नीट परीक्षा पेपर लीक प्रकरण, 30 लाखांची डील, जयपूर पोलिसांकडून रॅकेट उद्धवस्त
प्रातिनिधिक फोटो


जयपूर: नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून रविवारी देशभरात नीट यूजी परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. देशभरात विविध परीक्षा केंद्रावर नीट परीक्षा पार पडली. परीक्षा सुरु असतानाच प्रश्नपत्रिका लीक झाली होती. जयपूर पोलिसांनी या प्रकरणी 8 जणांना अटक केली आहे. परीक्षार्थीसह पोलिसांनी तिच्या कुटंबातील सदस्य, परीक्षा केंद्र सुपरवायझर आणि इतरांना अटक केली होती. जयपूर पोलिसांनी प्रश्नपत्रिका लीक प्रकरणाची डील 30 लाखांना ठरल्याची माहिती दिली आहे.

जयपूरमध्ये दिनेश्वरी कुमारी ही विद्यार्थिनी, तिचे काका, पर्यवेक्षक राम सिंग, परीक्षा केंद्राचा प्रमुख मुकेश आणि इतर चार जणांना अटक केली आहे. डीसीपी रिचा तोमर यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली आहे. प्रश्नपत्रिका लीक करण्यासाठी मोबाईल फोनचा वापर करण्यात आला. प्रश्नपत्रिकेचे फोटो मोबाईलवर काढून सोडवून घेण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यात आली, असी माहिती रिचा तोमर यांनी दिली.

पेपर कसा लीक झाला?

रिचा तोमर यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. आरोपी राम सिंग तोमर आणि मुकेश यांनी त्यांच्या मोबाईल फोनमध्ये प्रश्नपत्रिकेचे फोटो काढले. हे फोटो जयपूरमधील चित्रकूट भागातील एका अप्राटमेंटमधील दोन व्यक्तींना व्हाटसअ‌ॅप द्वारे पाठवण्यात आले. तिथून ते पेपर सिकरमध्ये पाठवण्यात आले. सिकरमध्ये असलेल्या व्यक्तीनं याची उत्तरतालिका चित्रकूटमधील दोघांकडे पाठवली. चित्रकूटमधील दोघांनी ती मुकेश आणि रामसिंगला पाठवली. रामसिंग यानं दिनेश्वरीला पेपर सोडवण्यासाठी उत्तरतालिका देऊन मदत केली, अशी माहिती रिचा तोमर यांनी दिली आहे.

30 लाखांची डील

नीट परीक्षेची उत्तर तालिका मिळवण्याची डील 30 लाखांना ठरली होती. यामधील पहिले 10 लाख रुपये परीक्षा झाल्यावर देण्यात येणार होते. दिनेश्वरी च्या काकांना परीक्षा केंद्राबाहेरुन ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्याकडे 10 लाख रुपयांची रोख रक्कम आढळली, असं देखील त्यांनी सांगितल. 10 लाख रुपये आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. पोलिसांची एक टीम सिकरमध्ये उत्तरतालिका देणाऱ्या व्यक्तीच्या शोधात रवाना झाली आहे. पोलिसांनी ई मित्र सेंटरचे अनिल आणि अलवार मधील कोचिंग सेंटरमधील बन्सूरला अटक केली आहे. अनिल यानं मध्यस्थ म्हणून काम केलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

202 शहरात परीक्षा

राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट यूजी 2021 परीक्षा रविवारी पार पडली. नीट यूजी परीक्षेचं आयोजन देशभरातील आणि परदेशातील 202 शहरातील केंद्रावर करण्यात आलं. परीक्षेसाठी 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होतं. परिक्षेचं आयोजन दुपारी 2 ते 5 च्या दरम्यान केलं गेलं. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं परीक्षेला उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या.

इतर बातम्या:

NEET UG 2021 : नीट परीक्षा यूजी परीक्षेच्या प्रवेशपत्रावर केंद्राचा चुकीचा उल्लेख, विद्यार्थ्यांना मनस्ताप

NEET UG 2021: नीट यूजी परीक्षेला आजपासून सुरुवात, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर

NEET 2021 Paper Leak Racket Busted by Jaipur Police eight people arrested including candidate

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI