देशातील संसदेमध्ये निवडून गेलेल्या खासदारांची संख्या जरी 543 असली तरी या संख्येत 420 नंबरची सीट मात्र असते गायब, नेमके काय आहे यामागील गूढ ?

| Updated on: Jan 28, 2022 | 5:52 PM

14 व्या लोकसभेच्या दरम्यान खासदारांना सीट नंबर अलॉट केले जात होते. त्यावेळी एका सदस्याला 420 नंबरची सीट वाट्याला आली, ज्यामुळे त्या सदस्याने वाट्याला आलेली ही सीट म्हणजे आपला अपमान असल्याचे सांगत अध्यक्षांना या क्रमांकाची सीटच रद्द करण्याची विनंती केली होती.

देशातील संसदेमध्ये निवडून गेलेल्या खासदारांची संख्या जरी  543 असली तरी या संख्येत 420 नंबरची सीट मात्र असते गायब, नेमके काय आहे यामागील गूढ ?
Parliament
Follow us on

Story of 420 Number Seat in Lok Sabha: आपल्या देशात दिशेला घेऊन नंबरांपर्यंत शुभ- अशुभ (Auspicious-Inauspicious) असे मानणारे अनेक लोक आहेत. नंबरांना आपल्या देशात खूप महत्त्व दिले जाते. कोणत्याही प्रकारचे शुभ काम करण्यासाठी आधी तारीख पाहिली जाते. यासाठी नंबर यांची गणना केली जाते, याशिवाय प्रत्येकाचा कोणता ना कोणता लकी नंबर (Parliament, Lok Sabha, MP, Seat No. 420, Mystery) हा असतोच. प्रत्येकाचे आपापले तर्कवितर्क असतात. याशिवाय काही लोक असे सुद्धा असतात, जे या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत. असाच एक नंबर आहे 420. या नंबरला आपल्या देशात योग्य समजले जात नाही आणि याचा परिणाम देशाच्या संसदेत (Parliament) सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला.

आता प्रश्न असा आहे की संसदेच्या सदनात लोकसभेत एकूण निवडलेले एकूण 543 सदस्य तेथे पोहोचत असतात, प्रत्येकासाठी तेथे सीट वाटप केली जाते. तर मग अशातच 420 नंबरची जी सीट असते त्या सीटवर नेमका कोणता सदस्य बसतो?

काय आहे 420 च्या मागील गूढ?

देशाच्या संसदेत 420 नंबरच्या सीटला जागा देण्यात आलेली नाही. चौदाव्या लोकसभेनंतरच कोणत्याही खासदाराला हा नंबर दिला जात नाही. खरंतर भारतीय दंड संहिता कलम 420 अंतर्गत फसवणुक अशा प्रकारचा गुन्हा दाखल केला जातो. यासाठी आपल्या देशात हा नंबर धोकेबाजीचे प्रतीक समजला जातो. अनेकदा बोलतानासुद्धा लोक 420 नंबरचा उल्लेख करत असल्यास यामागे फसवणुक केल्याची भावना असते.

तर काय लोकसभेत आहे 420 नंबर सीट?

तर या मागील गूढ असे आहे की,जेव्हा 14व्या लोकसभेदरम्यान देशातील वेग वेगळ्या भागातून निवडून आलेल्या खासदारांना संसदेत सीट नंबर चे वाटप चालू होते. याचदरम्यान एका सदस्यास 420 नंबरची सीट वाट्याला आली. यानंतर त्या सदस्याने हा आपला अपमान असल्याचे समजत ती रद्द करण्याची विनंती अध्यक्षांकडे केली. सदस्यांनी केलेल्या या विनंतीनंतर लोकसभेतील 420 नंबरची ही सीट रद्द करण्यात आली आणि त्याच्या जागी सीट नंबर 419-A अशा नावाची नवीन सीट तयार करण्यात आली.

कोण ठरवतं खासदारांच्या बसण्याची जागा?

लोकसभेत कोणता सदस्य कोठे बसणार या गोष्टीचा निर्णय घेण्याचा अधिकार लोकसभा स्पीकर म्हणजेच अध्यक्ष यांच्याकडे असतो. लोकसभेच्या या एकूण जागा 6 ब्लॉकमध्ये विभागीत करण्यात आल्या आहेत, तर या प्रत्येक ब्लॉकमध्ये अकरा लाईन आहेत.

कशी मिळाली होती 419-A सीट?

15व्या लोकसभेदरम्यान सीटचे वाटप करत असताना 420 नंबरची सीट आसाम युनायटेड डेमोक्रॅटीक फ्रंट (AIUDF) खासदार बदरुद्दीन अजमल यांना 420 नंबर ऐवजी 419-A या नंबरची सीट देण्यात आली. भारतीय संविधानात या बद्दलची तरतूद सुद्धा करण्यात आली आहे की संसदेची अधिकतर सदस्य संख्या ही 552 असेल.

इतर बातम्या

या वर्षी अन्नासाठी युध्द ? काय आहे नास्त्रेदमस यांच भाकीत जाणून घ्या…

Earth | कधी विचार केलाय…. पृथ्वी एक सेकंदासाठी थांबली तर काय होईल?