AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाण्याच्या बाटलीच्या झाकणाच्या रंगात दडलंय मोठं रहस्य, 99 टक्के लोकांना माहीत नाही यामागचं कारण

तुम्ही कधी बाटलीच्या झाकणाच्या रंगाकडे लक्ष दिलंय का? निळा, पांढरा, काळा या प्रत्येक रंगाचा एक खास अर्थ असतो, जो बाटलीतल्या पाण्याबद्दलची महत्त्वाची माहिती देतो. चला, यामागील रहस्य जाणून घेऊया.

पाण्याच्या बाटलीच्या झाकणाच्या रंगात दडलंय मोठं रहस्य, 99 टक्के लोकांना माहीत नाही यामागचं कारण
Bottle cap colors
| Edited By: | Updated on: Sep 05, 2025 | 12:28 AM
Share

आपण बाहेर असताना तहान लागल्यावर लगेच पाण्याची बाटली विकत घेतो. पण बाटलीच्या झाकणाचा रंग कधी तुमच्या लक्षात आला आहे का? निळा, पांढरा, हिरवा, पिवळा किंवा काळा, प्रत्येक रंगाचा एक खास अर्थ असतो. हा रंग बाटलीत कोणत्या प्रकारचं पाणी आहे, हे सांगतो. चला, बाटलीच्या झाकणाच्या रंगांमागचं रहस्य जाणून घेऊया.

झाकणाच्या प्रत्येक रंगाचा असतो खास अर्थ

पाण्याच्या बाटलीच्या झाकणाचे रंग हे फक्त डिझाइनचा भाग नाहीत, तर ते त्यातील पाण्याची गुणवत्ता आणि स्त्रोत सांगतात.

1. निळे झाकण:

बाजारात तुम्हाला बहुतेक बाटल्या निळ्या झाकणाच्या दिसतील. निळ्या झाकणाचा अर्थ असा होतो की, हे पाणी थेट झऱ्यातून घेतलेले आहे, म्हणजेच हे मिनरल वॉटर आहे. हे पाणी आरोग्यासाठी खूप चांगलं मानलं जातं.

2. पांढरे झाकण:

निळ्या रंगाच्या झाकणानंतर सर्वात जास्त पांढऱ्या रंगाच्या झाकणांच्या बाटल्या दिसतात. पांढऱ्या झाकणाचा अर्थ असा आहे की, हे पाणी मशीनने शुद्ध केले आहे. म्हणजेच, हे पाणी आरओ प्लांट किंवा अशाच एखाद्या फिल्टर मशीनमधून शुद्ध करून भरले आहे. हे पाणीही पिण्यासाठी सुरक्षित आणि चांगलं असतं.

3. काळे झाकण:

काळ्या झाकणाच्या बाटल्या बाजारात कमी दिसतात, कारण हे पाणी खूप महाग असतं. या पाण्याला अल्कलाइन वॉटर म्हणतात. ते खास पद्धतीने शुद्ध केलं जातं आणि त्यात अनेक मिनरल्स असतात. हे पाणी जास्त करून सेलिब्रिटी आणि खेळाडू वापरतात.

4. पिवळे झाकण:

काही पाण्याच्या बाटल्यांना पिवळ्या रंगाचे झाकण असते. पिवळ्या झाकणाचा अर्थ असा आहे की, या पाण्यात व्हिटॅमिन आणि इलेक्ट्रोलाइट्स मिसळलेले आहेत. हे पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं मानलं जातं, कारण ते शरीराला ऊर्जा देतं.

5. हिरवे झाकण:

हिरव्या झाकणाच्या बाटल्यांमध्ये नैसर्गिकरित्या शुद्ध केलेले पाणी असते. हे पाणी नैसर्गिक स्त्रोतांपासून येते, जे थेट शुद्ध करून भरले जाते.

पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पाण्याची बाटली खरेदी कराल, तेव्हा झाकणाच्या रंगावर नक्की लक्ष द्या. यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्यानुसार आणि आवडीनुसार योग्य पाणी निवडता येईल.

Follow Us
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा..
Mumbai Cha Raja | हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा हार, व्हिडीओ होतोय व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल