AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Knowledge : विमानात सिगारेट ओढण्यास मनाई, मग टॉयलेटमध्ये का असतो ॲश-ट्रे ?

विमानात धूम्रपानास सक्त मनाई असते आणि या नियमाचे उल्लंघन केल्यास मोठा दंड आकारला जाऊ शकतो किंवा कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. तरीही, प्रत्येक विमानाच्या प्रसाधनगृहात (टॉयलेटमध्ये) एक लहान ॲश-ट्रे (राखेचे पात्र) असणं हेही आवश्यक असते. सुरक्षा यंत्रणांकडून कडक तपासणी करूनही आणि आगपेटी किंवा लायटर नेण्यावर बंदी असूनही, जर एखाद्या प्रवाशाने गुपचूपपणे नियमांचे उल्लंघन केले, तर विमानात आग लागण्याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी विमानाच्या नियमांमध्ये ही ॲशट्रे अनिवार्य का असतो? जाणून घ्या यामागील एक रंजक तथ्य.

Knowledge : विमानात सिगारेट ओढण्यास मनाई, मग टॉयलेटमध्ये का असतो ॲश-ट्रे ?
विमानात का असतो ॲश-ट्रे ?
| Updated on: Jun 09, 2026 | 2:28 PM
Share

विमानात धूम्रपानास किंवा सिगारेट ओढण्यास सक्त मनाई असते. पण एक काळ असा होता जेव्हा विमान प्रवासादरम्यान प्रवाशांना सिगारेट ओढण्याची परवानगी होती. विमानांमध्ये यासाठी विशेष ‘स्मोकिंग सेक्शन्स’ (धूम्रपान विभाग) तयार केले जायचे. आणि सीटचे आर्मरेस्ट्स व शौचालयांच्या दरवाजांवर ‘ॲश ट्रे’ बसवलेल्या असायच्या. परंतु कालांतराने, विमानातील धुरामुळे लागलेल्या आगीशी संबंधित काही गंभीर अपघात समोर आले. त्यानंतर हळूहळू निर्बंध लागू होऊ लागले आणि 2000 सालच्या सुरुवातीपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणांदरम्यान विमानात धूम्रपानावर पूर्ण बंदी घालण्यात आली.

मनाई असूनही का असतो ॲश-ट्रे ?

मग आता असा प्रश्न उपस्थित होतो की, जेव्हा विमानात सिगारेट पिण्यास बंदीच आहे, तेव्हा ॲश ट्रेचा उपयोग काय ? विमानात ते का असतं ? याचा थेट संबंध विमान वाहतूक क्षेत्रातील सुरक्षा नियमांशी आहे. विमान वाहतूक अधिकाऱ्यांचे असे मत आहे की, कडक नियम असूनही काही प्रवासी त्यांचे उल्लंघन करू शकतात. जर एखाद्या प्रवाशाने गुपचूप सिगारेट पेटवलीच, तर ती त्यासाठी एक सुरक्षित जागा असणे महत्त्वाचे आहे. जर पेटवलेली सिगारेट शौचालयाच्या कचरापेटीत टाकली, तर तिथे टिश्यू पेपर आणि इतर ज्वलनशील वस्तू असल्यामुळे त्यांना आग लागू शकते, पर्यायाने विमानात आग भडकू शकते ना.

लायटरशिवाय सिगारेट कशी पेटवणार ?

विमाता प्रवेश करण्याआधी कडक तपासणी केली जाते, ज्वलनशील पदार्थ, काडेपेटी, लायटर नेण्यास मनाई असते. मात्र कठोर सुरक्षा तपासणी असूनही, एखादा प्रवासी काडीपेटी किंवा लायटरसारख्या प्रतिबंधित वस्तू सोबत घेऊन जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारे त्या वस्तू विमानामध्ये चोरून नेण्यात एखाद्या व्यक्तीला यश मिळूही शकतं. तज्ज्ञांच्या मते, विमान वाहतूक क्षेत्रातील सुरक्षा नियम नेहमीच आदर्श परिस्थितीवर आधारित नसतात, तर ते ‘संभाव्य धोके’ लक्षात घेऊन तयार केले जातात.

म्हणजेच, एखाद्या व्यक्तीने नियमांचे उल्लंघन केले तरीही, विमानाची सुरक्षितता धोक्यात येऊ नये यासाठी खबरदारी घेतली जाते. याच शक्यतेमुळे, शौचालयात ‘ॲश-ट्रे’ ठेवल्या जातात, जेणेकरून कोणी सिगारेट प्यायललेच, ती ओढलीच तर जळती सिगारेट सुरक्षितपणे विझवून तिची विल्हेवाट लावता येईल आणि आगीचा धोका टाळता येईल.

विमान वाहतूक कायद्यातही ही तरतूद  

जगातील अनेक देशांच्या विमान वाहतूक नियमांनुसार, विमानातील प्रसाधनगृहात (टॉयलेटमध्ये) ॲश-ट्रे (राखेचे पात्र) ठेवणे कायदेशीररीत्या अनिवार्य आहे. म्हणूनच, ‘धूम्रपान करण्यास मनाई’ (No Smoking) अशी सूचना लावलेली असूनही, प्रसाधनगृहाच्या दरवाजांजवळ ॲश-ट्रे लावलेला दिसून येतो. हजारो फूट उंचीवर उडणाऱ्या विमानात आग लागणे ही अत्यंत गंभीर आणीबाणीची परिस्थिती असते. एखाद्या लहानशा ठिणगीमुळेही मोठी दुर्घटना घडू शकते. यापूर्वी धूम्रपानामुळे झालेल्या अपघातांनी विमानांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. म्हणूनच, संभाव्य धोके कमी करण्यासाठी ही अतिरिक्त खबरदारी घेतली जाते.

केवळ ॲश-ट्रेच नव्हे, सुरक्षेचे इतर पर्यायही उपलब्ध

आधुनिक विमानांमधील शौचालयांमध्ये केवळ ॲश-ट्रेच नसतात, तर त्यात अत्याधुनिक स्मोक डिटेक्टर, अग्निरोधक डस्टबीन आणि स्वयंचलित आग विझवणारी उपकरणे देखील बसवलेली असतात. शौचालयात किंचितही धूर आढळला तर, केबिन क्रूला तात्काळ सूचना मिळते आणि ते परिस्थितीची तपासणी करतात.

थोडक्यात सांगायचे तर, ॲश-ट्रे आहे म्हणजे प्रवाशांना धूम्रपान करण्याची मुभा मिळते असं नाही, तर मानवी स्वभावाचा विचार करून आणि आणीबाणीच्या प्रसंगांचा सामना करण्यासाठी तयार केलेल्या एका संरक्षक प्रणालीचा भाग म्हणून ॲश- ट्रे बसवलेला असतो, ज्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होतो.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा