लिफ्ट नो-सिग्नल झोन का बनते? याचे ‘हे’ कारण जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

लिफ्टमध्ये गेल्यावर आपल्या फोनमधील नेटवर्क गायब होते. म्हणजेच लिफ्टच्या आता फोन कॉल किंवा डेटा वापरला जाऊ शकत नाही आणि हे प्रत्येकाला माहितच आहे. पण असे का होते या मागचं नेमकं कारण काय आहे ते आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

लिफ्ट नो-सिग्नल झोन का बनते? याचे हे कारण जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
lift
Image Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Feb 23, 2026 | 6:14 PM

बऱ्याचदा लिफ्टमध्ये फोनमधील नेटवर्क गायब होतं किंवा सिग्नल एवढं कमकुवत होते की तुम्ही जर कॉल असाल आणि लिफ्टमध्ये शिरल्यावर आवाज ब्रेक होतो. तर कधी डेटा वापरणे कठीण होते. तर आपल्या स्मार्टफोन मध्ये कम्युनिकेशनसाठी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिओ लहरींचा वापर होतो. आजच्या काळात तंत्रज्ञान अत्यंत प्रगत झाले आहे. टेलिकॉम कंपन्यांच्या नेटवर्क सिस्टम अपग्रेड झाल्यामुळे, स्मार्टफोनमधील मोडेम देखील अधिक प्रगत झाले आहेत. तर एवढे ॲडव्हाँस गोष्टी असताना सुद्धा लिफ्टमध्ये असे काय आहे ज्यामुळे मोबाईल सिग्नल दिसत नाही. चला तर मग आजच्या लेखात आपण यामागचं योग्य कोणतं कारण आहे ते जाणून घेऊयात.

लिफ्टमध्ये मोबाईल सिग्नल का नाही?

लिफ्टमध्ये शिरताच मोबाईल सिग्नल ब्लॉक होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे लिफ्टमधील बांधकाम साहित्य. हो यामध्ये वीट, काँक्रीट आणि स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले लिफ्ट हे सिग्नल ब्लॉक होण्याचे प्रमुख घटक आहेत. पाऊस, गारा आणि बर्फाचा प्रतिकार करू शकणारे कोणतेही साहित्य मोबाईल सिग्नल प्रभावीपणे ब्लॉक करू शकते. हे साहित्य इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल शोषून घेऊ शकते किंवा परावर्तित करू शकते, ज्यामुळे नेटवर्क पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाही.

कोणत्याही इमारतीचा लिफ्ट ची जागा ते ठिकाण वीट, सिमेंट आणि काँक्रीटपासून बनवलेला असतो. त्यात लिफ्ट कॅबिनेट नंतर स्टेनलेस स्टीलपासून बनवला जातो. शिवाय, लिफ्ट कॅबिनेटच्या भिंती बहुस्तरीय असतात. इमारतीतील शाफ्टवर वर आणि खाली हलणारी धातूची लिफ्ट डिझाइनसाठी कार्पेट, टाइल्स किंवा लॅमिनेटने फिनिशिंग केलेली असते. काही लिफ्ट रॉक शीट किंवा वॉलपेपर देखील लावले असते. यामुळे मोबाईल सिग्नल लक्षणीयरीत्या ब्लॉक होतात.

लिफ्टमध्ये नेटवर्क नसल्यास काय करावे?

जर तुमच्याकडे लिफ्टमध्ये गेल्यावर फोनमध्ये नेटवर्क अॅक्सेस नसेल, तर धीर धरा. लिफ्टमधून बाहेर पडा आणि कॉल किंवा डेटा कनेक्शन वापरा. ​​तुम्ही जर दुर्दैवाने लिफ्टमध्ये अडकला असाल आणि तुमचा मोबाईल फोन काम करत नसेल, तर लिफ्ट इंटरकॉम वापरा. ​​अनेक लिफ्टमध्ये यासाठी कॉल बटण देखील असते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)